Subscribe Us

NMMS परीक्षा स्वरूप, एन एम एम एस परीक्षा 2022, nmms परीक्षा माहिती | zpps tech guruji

NMMS परीक्षा स्वरूप, एन एम एम एस परीक्षा 2022, nmms परीक्षा माहिती

NMMS परीक्षा माहिती


NMMS- National Means cum Merit Scholarship Scheme Exam:-

✳️ राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)इ.८ वी साठी 

🔰 NMMS योजनेचे उद्दिष्ट :-

▶️ इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी.आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

🔰 NMMS परीक्षेचे स्वरुप :-

▶️ केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांनी 2007-08 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर मार्च महिन्यात घेण्यात येते  . 

▶️ शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

🔰NMMS परीक्षा देण्यासाठी पात्रता :👇👇

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.👇

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उपन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसिलदारांचा/तलाठयांचा मागील  आर्थिक वर्षाचा उपन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उपन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.👇

i) विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

ii) शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी. सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

✳️ सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत.

(SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

🔰 N.M.M.S. परीक्षेच्या तयारीसाठी सराव पेपरसाठी मार्गदर्शक व्हिडिओ पहा.👇


🔰 NMMS परीक्षेसाठी विषय :- 

✳️ सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) 
b) शालेय क्षमता चाचणी (SAT)

✳️ a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):-

 ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

✳️ b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- 

ही सामान्यत: इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये👇

१. सामान्य विज्ञान = ३५ गुण

२. समाजशास्त्र = ३५ गुण

३. गणित = २० गुण

असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.


उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

✳️ a. सामान्य विज्ञान=३५ गुण  त्यामध्ये.👇

▶️ भौतिकशास्त्र ११ गुण

▶️ रसानशास्त्र ११ गुण

▶️  जीवशास्त्र १३ गुण

✳️ b. समाजशास्त्र ३५ गुण :-

▶️ इतिहास १५ गुण

▶️ नागरिकशास्त्र ०५ गुण

▶️ भूगोल १५ गुण

✳️ c). गणित २० गुण.

🔰 NMMS परीक्षेचे माध्यम :-👇

प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणारआहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वुर्तळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्ष अधिक वुर्तळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटन/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

 ऑनलाईन अर्ज करण्याची  पध्दत :- 👇

www.mscepune.inhttp://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होतात. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व (अपंगत्व) प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व अपंगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही.

९. प्रवेशपत्रे :- 

ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in

http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतात. 

परीक्षेचे मूल्यमापन :-

विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व  विशेषमागासवर्गीयांसह अपंग विद्यार्थी आरक्षणातील केंद्रशासनाने निश्चित केलेल्या कोटयानुसार जिल्हयानिहाय,संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :- 👇

अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवतेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात 

शिष्यवृत्ती दर :- 

शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ.९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/(वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

🔰 शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.)

▶️ इ.१० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५%गुणांची आवश्यकता आहे.)

तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

🛑तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ जवाहार नवोदय फाॅर्म कसा भरावा.


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.



Post a Comment

1 Comments