Subscribe Us

मराठी कविता संग्रह, Marathi kavita, कविता मराठी, कविता दाखवा, मराठी कविता आई, marathi poems, मराठी कविता प्रेम, मराठी कविता व्हिडिओ, मराठी कविता प्रेम, मराठी कविता मैत्री, zpps tech, zpps tech guruji


✳️ कविता- ऋण आईवडिलांचे



ऋण आईवडिलांचे

सदैव चंदनी परिमळ

चौफेर दरवळ

आयुष्यात


सुंदर आयुष्यासाठी

सतत धडपड आईवडिलांची

मुलांच्या सुखाची

मनीषा


जाणून मनीषा

पुरवणं आहे इच्छा

त्यागून स्वेच्छा

जीवनी


तेच जीवन

सुंदरतेने असे बहरलेले

सदैव फुलले

आशीर्वादाने


आशीर्वाद मिळवू

ऋण जाणून आईवडिलांचे

दिन सुखाचे

जीवनी


श्रीमती.रेणुका पांचाळ

तालुका वसमत

जिल्हा हिंगोली.


✳️ कविता- निळ्या सूर्याची

विषय-तळपत्या निळ्या सूर्या


तळपत्या निळ्या सूर्या

तेज तुझे झळकते

आजही या ओठांवर

नाव तुझे चमकते


जनमन जागे केले

अज्ञानाला उठविले 

चेतवून असत्याला

सत्यवादी धडे दिले


चवदार तळ्याचा तू

केला सत्याग्रह उभा

तळ्याकाठी पाण्यासाठी

भरवली भव्य सभा


गोरगरीबांचा दाता

दिनदलीतांचा बाप

अन्यायाला झिडकारून

दिलेस न्यायाचे माप


अंधारल्या जीवनाचा

दूर केला अंधःकार

घटना लिहूनी जगी

बनलास शिल्पकार


✳️ कविता- नाम घेता तुझे


नाम घेता तुझे

सुख लाभे जिवा

हीच आशा उरे

घडो नित्य सेवा


जेथे देव उभा

तेथे सुखी प्रजा

देवा तुझ्या विना

नाही खरी मजा


तुझ्या नामातली

गोडी रोज चाखू

नित्य जपातून

देशी ओठी हसू


संग तुझा लाभो

देवा या जीवनी

तुझे नाम असे

प्रेम संजीवनी 


नको दुजे काही

राहो तुझ्या पायी

भक्ती रसात या

व्यापो दिशा दाही


✳️ कविता- अश्रू


थेंब थेंब ओघळतो

मन मोकळे करतो

डोळ्यातल्या अश्रूंमुळे

येथे स्वस्थ मी जगतो


अश्रू ओघळून जाता

होते दुःख हे हलके

पुन्हा नव्या उमेदीने

मन हळूच फुलते


अश्रू नसता जगात

काय किंमत जिण्याला

अश्रू तुझ्यामुळे येथे

येते भरती सुखाला


सुख दुःखात वाहती

डोळे भरून अश्रूंनी  

मंद झुळूक प्रेमाची

कधी वाहे ओसंडूनी


अश्रू शांत करी मन

देई दिशा जगण्याची

अश्रू अश्रूंची किंमत

येथे सदा करायची


✳️ कविता- वृक्षवल्ली


वसा हाती घेऊ

झाडे येथे लावू

त्याच्या छायेमध्ये

सदा सुखी राहू


झाडे तोडू नका

त्याची मिळे सजा

आज वारा कमी

जीवं घेती रजा


झाडा झाडासाठी

जीव तरसतो

वाटसरू होता

लाहीलाही होतो


झाड फळे देते

झाड फुले देते

गेल्या जीवासही

झाड वाचवते


असी वृक्षवल्ली

नाही तोडायची

जीवपाड त्याला

रोज जपायची


श्रीमती.रेणुका पांचाळ

तालुका वसमत

जिल्हा हिंगोली

आई माझी मायेचा सागर कविता आवश्य पाहा.👇👇

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 1

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 2 

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 3 

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.








Post a Comment

0 Comments