Subscribe Us

राज्यस्तरीय नवोपक्रम सादरीकरण | navopkram in marathi | नवोपक्रम नमुना | navopkram lekhan

राज्यस्तरीय नवोपक्रम सादरीकरण | navopkram in marathi | नवोपक्रम नमुना |  navopkram lekhan

navopkram lekhan, नवोपक्रम अहवाल लेखन
navopkram lekhan, नवोपक्रम अहवाल लेखन

 

✳️ नवोपक्रम नमुना, राज्यस्तरीय नवोपक्रम सादरीकरण.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२०-२०२१
                                
सादरकर्ते:- श्री.गजानन कोंडीबा चौधरी  (प्राथमिक शिक्षक)
शाळा:- जि.प.प्रा.शाळा पार्डी खुर्द ता.वसमत जि.हिंगोली.
मोबाईल नंबर:- 9405353535
 E Mail ID:-  igajananchoudhari353535@gmail.com

१.नवोपक्रमाचे शीर्षक :-
“अध्ययन अध्यापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर.”

२.नवोपक्रमाची गरज व महत्व:-
कोविड - 19 (लॉकडाऊन) च्या काळात प्रत्यक्ष गृहभेट देऊन रोज 100% विद्यार्थी भेट देणे शक्य होत नव्हते. कोरोना काळात विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहत आहेत.याची जाणीव झाल्याने मुलांना काहीतरी नाविन्यपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाची गोडी लावण्यासाठी हा नवोपक्रम मी हाती घेतला, युट्यूब च्या माध्यमातून ॲनिमेशन विविध इफेक्टचा वापर करून मनोरंजनात्मक पद्धतीने व्हिडिओ निर्मिती केली. युट्युब वरील व्हिडिओ विद्यार्थ्यांना सहज, कधीही व स्वयंध्ययन पद्धतीने अध्ययन करण्यास उपयुक्त ठरू लागली व  त्यापासून मिळणारे ज्ञान चिरकाल स्मरणात राहील या उद्देशाने मी या नाविन्यपूर्ण नवोपक्रमाकडे वळलो.

३. नवोपक्रमाची उद्दिष्ट्ये:-
1) 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे.
2) एकाच व्यक्तीने निर्माण केलेल्या डिजिटल साहित्याचा उपयोग एकाच वेळी हजारो/लाखो विद्यार्थ्यांना करून देणे.
3) युट्युब वरील शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना कधीही, कोठेही, विनामूल्य मिळतील व भविष्यात पण मिळतच राहतील.
3) कोवीड-19 किंवा आपतकालीन परिस्थितीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या (व्हिडिओच्या) माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंध्ययन करण्याची संधी निर्माण करणे.
4) श्रवण, भाषण, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी व्हिडिओजचा वापर करणे.
5) एकाच प्लॅटफॉर्मवर शैक्षणिक व्हिडिओज विद्यार्थ्यांना व पालकांना पूर्णपणे मोफत पुरवणे.

४. नियोजन व कार्यवाही:-
जि प प्रा शा पार्डी खुर्द उच्च प्राथमिक शाळामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत व या शैक्षणिक वर्षाचा एकूण पट सरासरी 250 पेक्षा जास्त आहे, इयत्ता दुसरीचा 40 पट आहे. COVID-19 च्या काळात प्रत्यक्ष गृह भेटीद्वारे रोज 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते त्यामुळे मनामध्ये एक बेचैनी होती की 100% विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचावे यातच SCERT मार्फत शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमा अंतर्गत रोज अभ्यासमाला येऊ लागल्या व ती अभ्यास मला मी व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करू लागलो. अभ्यासमालेचा मला खूप फायदा होऊ लागला व त्यातूनच मला एक कल्पना सुचली की जर मी प्रत्यक्ष गृहभेटी द्वारे रोज 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकत नसलो तरी व्हिडिओच्या माध्यमातून जर मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो तर विद्यार्थ्यांना पण आपला फोटो असलेला व्हिडिओ पाहायला मिळाला तर त्यांना किती जिव्हाळा,आवड निर्माण होईल त्यातच दीक्षा ॲप कन्टेन्ट निर्मितीसाठी झुमवर जूनमध्ये राज्यस्तरावरून एक ऑनलाईन कार्यशाळा झाली व त्यात मला E-content व्हिडिओ तयार करण्याची संधी व प्रशिक्षण मिळाले, यातूनच मला खरी प्रेरणा मिळाली.
संपूर्णतः लोकडाऊन असल्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता, शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीसाठी मोबाईल सॉफ्टवेअर, माईक,इत्यादी बाबींचा मी बारकाईने अभ्यास चालू केला.
माझ्याकडे इयत्ता दुसरीचा वर्ग असल्यामुळे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांचा पाया पक्का करण्यासाठी मी लोकडाऊन च्या काळात 200 पेक्षा अधिक शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती केली.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती, विषय मराठी व्याकरण,  समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द या दोन व्हिडिओची निवड दीक्षामध्ये झाली व त्याही व्हिडिओचा फायदा महाराष्ट्रातील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांना नक्कीच होत असेल. सदर व्हिडिओची निर्मिती Kinemaster ॲपवर केली व व्हिडिओ युट्युब वर अपलोड केले, युट्युब वर अपलोड केल्यानंतर सदर व्हिडिओची लिंक इयत्ता दुसरी व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केली. तसेच महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना व्हिडिओचा फायदा व्हावा यासाठी मी श्री. दीपक चामे सर लातूर व श्री.सतिश कोळी सर औरंगाबाद यांनी महाराष्ट्रभर जिल्हा वं तालुक्यानुसार 155 Whatsapp ग्रुपची निर्मिती केली होती त्या संबंधित  155 Whatsapp ग्रुपवर मी सहभागी होतो व सदर व्हिडिओची लिंक, Smart Pdf, प्लेलिस्ट पेज (अनेक व्हिडिओंचा समूह),  इत्यादी मी त्या 155 ग्रुपवर शेअर करू लागलो, सदर व्हिडीओ निर्मितीच्या माझ्या दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांना तर फायदा होऊच लागला परंतु महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा खूप फायदा होऊ लागला व राज्यभरातून व्हिडिओला खूप लाईक व कमेंट युट्युब वर येऊ लागल्या.
लॉकडाऊन काळात 200 व्हिडीओची निर्मिती केली त्यामध्ये इयत्ता दुसरी पाठ्यपुस्तकावर आधारित काही घटकांचे व्हिडिओ तसेच इयत्ता पहिली ते आठवीसाठी मराठी विषयासाठी उपयुक्त  समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द, प्राण्यांची नावे, पक्षांची नावे, फळांची नावे, भाज्यांची नावे, A ते Z पासून सुरु होणारे शब्द (ज्‍यामध्‍ये चित्रांचा समावेश केला) तसेच क ते ज्ञ पासून सुरु होणारे शब्द.
मराठी वाचण्यासाठी उपयुक्त 30 पेक्षा अधिक शब्दडोंगर व्हिडीओज बनवले यामुळे विद्यार्थी झटपट वाचण्यास शिकले व व्हिडिओ बघून स्वयंध्ययन केल्यामुळे त्याचा आनंद वेगळाच होता तसेच इंग्रजी वाचण्यासाठी उपयुक्त असे 38 शब्दडोंगर व्हिडिओज बनवले त्यामुळे इयत्ता दुसरीतील माझ्या विद्यार्थ्यांना तर फायदा झालाच पण हे व्हिडिओ इयत्ता पहिली ते चौथी मराठी,इंग्रजी वाचण्यासाठी महाराष्ट्रभर पाहिले जाऊ लागले.
सदर व्हिडिओ निर्मितीची दखल अनेक वृत्तपत्राने(लोकमत, दैशोन्नती) तसेच वरिष्ठांनी घेतली तसेच तयार केलेले व्हिडीओ ऑफलाइन पद्धतीने पेन ड्राईव्ह, मोबाईल मध्ये काही पालकांना दिले यामुळे ज्यांना इंटरनेटची समस्या आहे अश्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ लागला. मराठी व इंग्रजी शब्द डोंगर व्हिडिओज पाहून विद्यार्थी व्हिडिओ प्रमाणे वाचन करतानाचे व्हिडिओ बनवून मला व्हाट्सअपवर टाकू लागली.त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक आंतरक्रिया साध्य होऊ लागली.
मी ज्याप्रमाणे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली अगदी त्याच पध्दतीने राज्यभरातील इतर तंत्रस्नेही/उपक्रमशील शिक्षकांनी व्हिडिओ निर्मिती कशी करावी यासाठी मी मार्गदर्शन व्हिडिओ तयार करून युट्युबवर अपलोड केले.ज्यामध्ये शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती कशी करावी, युट्युबवर व्हिडिओ कसे अपलोड करावेत, स्मार्ट पीडिएफ कशी तयार करावी, गुगलवरून कॉपिराईट फ्रि फोटो कसे डाऊनलोड करावेत, व्हिडिओ निर्मितीसाठी संगीत कोठुन डाऊनलोड करावे, शैक्षणिक पोस्टर/ बॅनर कसे तयार करावे, ऑनलाईन टेस्ट निर्मिती कशी करावी, इत्यादी मार्गदर्शक व्हिडीओ बनवून मी युट्युबवर अपलोड केले ज्याला महाराष्ट्र भरातून हजारो शिक्षक मित्रांनी पाहिले व याचा निश्चितच त्यांना फायदा झाला.

५. नवोपक्रमाची फलनिष्पत्ती उद्दिष्टानुसार:-
1) इयत्ता दुसरीची 100% विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आली.
2) एकाच वेळी हजारो/लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनात फायदा झाला.
3) यूट्यूबला या एकाच  प्लॅटफॉर्मवर 200 पेक्षा अधिक शैक्षणिक व्हिडिओज पालकांना विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत मिळाले व भविष्यात पण मिळत राहतील.
4) शिक्षक, विद्यार्थी व पालक आंतरक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर घडून आली.
5)कोविड-19 च्या काळात विद्यार्थ्यांना स्वयंध्ययन करण्याची संधी निर्माण करुन दिली.

६. समारोप :- 
सदर नवोपक्रम एकाच वेळी माझ्या दुसरीच्या 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी तर उपयुक्त ठरलाच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहचले.शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून युट्युब या एकाच प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड केल्यामुळे विद्यार्थी/पालक  कधीही कोठेही व अगदी विनामूल्य पहायला मिळतील व भविष्यातही याचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.युट्युब वरील लाईक्स व प्रतिक्रियेमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक आंतरक्रिया घडून येऊ लागली.अद्याप पर्यंत युट्युबवर माझे 500 पेक्षा अधिक व्हिडिओ आहेत व ज्याला 13 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यामार्फत पाहिले गेले आहे, भविष्यातही अनेक शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा निश्चितच होईल ,हीच आशा बाळगतो.सदर शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीचा नवोपक्रम राबवण्यासाठी श्री.गणेश शिंदे साहेब DIET हिंगोली, ससाणे साहेब DIET हिंगोली, श्री.तान्हाजी भोसले साहेब ग.शि.अ, श्री.सुरेश सोनुने साहेब शि.वि.अ. बिट वसमत,  श्री.नारायण मोरे साहेब के.प्र.गिरगाव यांची प्रेरणा तसेच मुख्याध्यापक श्री.परळीकर सर ,सर्व शिक्षकवृंद पार्डी खुर्द,  SMC अध्यक्ष श्री.माधवराव नरवाडे, सर्व SMC सदस्य, सर्व ग्रामस्थ पार्डी खुर्द, बालाजी जबडे सर, श्रीमती.दावलबाजे मॅडम,  श्री.विजय बांगर सर, महेश  बोधने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

७) संदर्भसूची व परिशिष्टे :
संदर्भ सूची
1) युट्युब
2) Kinemaster Mobile Applicaton
3) Camtasia Studio Software
4) Whatsapp
5) दिक्षा राज्यस्तरीय E- Content कार्यशाळा
6) Video Downloader Application
7) Video Compressor Application
8) Google

✳️ नवोपक्रमासंबंधी व्हिडीओ पाहा.👇👇


✳️ राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळा व्हिडीओ पहा.👇





DIET हिंगोलीकडून मिळालेले सन्मानपत्र.

✳️ नवोपक्रम अहवाल लेखन नमुना Word फाईल डाऊनलोड करा.👇



✳️ नवोपक्रम अहवाल लेखन नमुना PDF फाईल डाऊनलोड करा.👇



राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा-2020-21 State Level Innovation Competition 2020-2021्

✳️ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत 2020-21 या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हि स्पर्धा Online पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्याचे निकाल प्रसिद्ध झालेला आहेत आणि बक्षीस वितरणाचे  कार्यक्रम आपण खालील व्हिडीओद्वारे पाहु शकता.विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

Big Congratulations.💐💐👍

दिनांक - ५ मार्च २०२१

✳️राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020 21 पारितोषिक वितरण समारंभ  व्हिडिओ आवश्य पहा.👇



✳️ राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा-2021-22 माहिती पत्रक पहा. 👇

त्यानुसार आपल्या अधिनस्त अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना

http://innovation.scertmaha.ac.in या लिंकवर दि. १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.

✳️ राज्यस्तरीय नवोपकम स्पर्धा प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करा. 👇



तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH





Post a Comment

1 Comments