RTE-25% शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022 | ZPPS TECH GURUJI
![]() |
शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022 |
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
२. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका,
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व.
४. प्रशासन अधिकारी (नपा/मनपा) सर्व.
विषय :- सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.
🔰 संदर्भ : 👇
१. शासन निर्णय क्रमांक: आरटीई २०१८/प्र.क्र.१८० / एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०.
२. शासन निर्णय क्रमांक:- आरटीई २०११/प्र.क्र. १९९/ एस.डी.-१ दिनांक २५/०७/२०१९.
३. संचालनालयाचे पत्र जा. क्र. / प्राशिसं/ आरटीई-५२०/२०२१/४१९० दिनांक २०/ १२ / २०२९.
४.संचालनालयाचे पत्र जा. क्र. / प्राशिसं/ आरटीई-५२०/२०२२/ ७३६ दिनांक २८/०२/२०१२
उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
१. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे राहिल.👇👇
प्रवेशाचा वर्ग |
किमान वय |
कमाल वयोमर्यादा |
नर्सरी / प्ले ग्रुप |
3
वर्षे |
1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 |
पहिली पूर्वीचा दुसरा वर्ग Jr KG |
4
वर्षे |
1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 |
पहिली पूर्वीचा पहिला वर्ग Sr KG |
5
वर्षे |
1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 |
इयत्ता पहिली |
6
वर्षे |
1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016 |
२. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे.
३. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही. आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. सर्वसाधारण प्रवेशासाठी शासन निर्णयाप्रमाणे व संचालनालयाचे संदर्भ क्र. ३ च्या पत्रान्वये कळविलेल्या किमान वयोमर्यादेबाबतच्या तरतूदी लागू राहतील.
(दिनकर टेमकर)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
शिक्षण संचालनालय, पुणे १.
🔰 प्रत माहीतीस्तव सविनय सादर.👇
१) मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२) मा. आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे.
0 Comments