navodaya marathi utare-18 | नवोदय मराठी उतारे-18
![]() |
navodaya marathi utare-18 | नवोदय मराठी उतारे-18 |
navodaya marathi utare-18, नवोदय मराठी उतारे-18
उतारा :- (18) रक्तचंदन
वाचा 👇👇
बऱ्याच काळापूर्वी, अरण्यात एक विशाल वृक्ष होता. तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगांपर्यंत पोहोचला होता. आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो, कारण झाडामधले लाकूड लाल दिसते. 'मी इथे का आहे ?' रक्तचंदनाने विचारले. दुःखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलणे ऐकू गेले नाही. 'माझे काम काय आहे? माझा काय उपयोग आहे ?' कुणीच उत्तर दिले नाही. रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरीच वर्षे उभा राहिला. सगळ्या झाडांची पाने बर्फामध्ये झडून गेली. पण ह्या वृक्षाला हिरव्या सुया होत्या, पाने नव्हती आणि तो वर्षभर हिरवा होता. त्यामुळेच पक्ष्यांना तो आवडत होता. इतक्या वर्षांमध्ये शेकडो पक्षिपरिवारांनी त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते. तो म्हणजे एक मोठे पक्ष्यांचे हॉटेलच होता. सूर्यास्ताच्या वेळी घरट्यांमधल्या पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा की हरिणांना झाडांच्या खोडांवर आपल्या पाठी घासता यायच्या नाहीत. पक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक व्हायचे.
निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली.
अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.
रक्तचंदन या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा 👇👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments