Subscribe Us

YCMOU B.Ed. Admission 2021-23..प्रवेश अर्ज कसा भरावा? पात्रता,?सविस्तर माहिती.

 

✳️ YCMOU B. Ed. Admission 2021-2023 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बी.एड.प्रवेश 2021-23.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत B. Ed. Admission फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. आज आपण याविषयी  माहिती समजून घेणार आहोत. यामध्ये,,,

➡️ B. Ed. Admission . शिक्षणक्रमासाठी असलेली पात्रता.

➡️ लागणारी कागदपत्रे.

➡️ उपलब्ध जागा.

➡️ B. Ed. Admission Online Form कसा भरावा याबाबत मार्गदर्शक व्हिडीओ.

➡️ B. Ed. Admission Online Form  शुल्क किती आहे.

➡️ तसेच इतर महत्वाच्या सूचना पाहणार आहोत.

बी.एड. शिक्षणक्रमासंबंधी माहिती:-

                                नियमित बी.एड. शिक्षणक्रम सेवांतर्गत शिक्षकांना करता येणे शक्य नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने सेवांतर्गत शिक्षकांसाठी नोकरी करताना पूर्ण करता येईल असा २ वर्षे कालावधीचा 'सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) १९९१ पासून सुरू केला. (२.१) कालावधी या शिक्षणक्रमाचा किमान कालावधी २ वर्षांचा व कमाल कालावधी ५ वर्षांचा आहे. कमाल पाच वर्षांच्या कालावधीत शिक्षणक्रम पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यास कमाल कालावधी संपल्याच्या दिवसापासून, पुन्हा पाच वर्षांसाठी त्या वर्षाच्या तुकडीचे संपूर्ण शुल्क भरून पुननोंदणी करता येईल. (२.२) एकूण श्रेयांक हा शिक्षणक्रम ८० श्रेयांकांचा म्हणजे सुमारे २६०० अध्ययन तासांचा आहे. (एक श्रेयांक म्हणजे ३० ते ३५ तासांचा अभ्यास होय.) (२.३) शिक्षणक्रम माध्यम बी.एड. शिक्षणक्रमाचे माध्यम मराठी आहे. या शिक्षणक्रमाचे स्वयं अध्ययन साहित्य मराठीत आहे

✳️ महत्वपूर्ण सूचना:-

1) उमेदवाराने या शिक्षणक्रमाची प्रवेश माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे या शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरावा. त्याखाली असलेल्या प्रवेश लिंक वरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल. ऑनलाईन प्रवेशअर्ज भरताना आपण भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करूनच 'Submit' बटण दाबावे.

2) प्रवेशअर्ज भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर तीन दिवस स्वतःच्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची संधी (स्वयं संपादन) उमेदवाराला देण्यात येईल. या मुदतीतच उमेदवाराने प्रवेश अर्जात आवश्यक ती दुरुस्ती करावी.

3) २०२१-२३ बी.एड. प्रवेश तुकडीसाठी दि. ३१/०७/२०२१ (प्रथम जाहिरातीतील प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक) हा दिनांक आपला सेवा अनुभव, शैक्षणिक पात्रता ई. सर्व बाबींकरिता शेवटचा दिनांक म्हणून लागू राहील. या तारखेनंतर प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव यावर्षीच्या प्रवेशासाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

4) ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणीवेळी आपणाकडे असणे अनिवार्य असेल. मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.

5) बी. एड. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. ८००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. ४००/- आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे. 

6) ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जातील माहिती आधारे खुला व आरक्षित केंद्रनिहाय गुणवत्ता यादी

प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार गुणवत्ता यादीतील केंद्रनिहाय प्रवेश संख्येनुसार संबंधित विद्यार्थ्यांनी अभ्यासकेंद्रावर आपल्या प्रवेश अर्जाची पडताळणी करून घ्यावी. अभ्यासकेंद्राने आपल्या प्रवेश अर्जातील भरलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर विद्यापीठ व अभ्यासकेंद्र शुल्क भरून आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावा. आपल्या प्रवेश संदर्भातील माहिती / कागदपत्रे चूकीची असल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाल्यास विद्यापीठ समिती मार्फत आपल्या प्रवेशाची चौकशी करण्यात येईल तक्रारीत तथ्य आढळल्यास आपला प्रवेश रद्द करण्यात येईल प्रवेश रद्द करताना आपण भरलेले प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही तसेच आपल्यावर खोटी माहिती पुरविल्या संदर्भात F.I.R. दाखल केला जाईल याची प्रवेशेच्छूनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवारांना आरक्षणांतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. अशा उमेदवारांनी शासन निर्णयानुसार आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे तसेच नॉन - क्रिमीलेअर प्रमाणपत्र अभ्यासकेंद्राला प्रवेश अर्ज पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. 

7) अभ्यास केंद्रावर पडताळणी झाल्यानंतर प्रवेश अर्ज आपोआप लॉक होईल त्यामुळे व्हेरिफिकेशन नंतर कोणत्याही बदलासंदर्भातील पत्र व्यवहार विद्यापीठाला करू नये.

३. हा शिक्षणक्रम पात्रता ज्यांनी डी.एड./ डी.टी.एड. / क्राफ्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला आहे, असे प्राथमिक सेवांतर्गत शिक्षक या शिक्षणक्रमास पात्र असतील.

🔰 Eligibility-

                The following categories are eligible to be students of B.Ed. (ODL): 1. Trained in-services teachers in elementary Education./ Craft Teacher Candidates who have completed a NCTE recognized teachers education

 programe through face-to-face mode/ Craft Teacher Diploma. The reservation and relaxation in marks for SC/ST/OBC/PWD and other categories shall be as per the rules of the Central Government, whichever is applicable.

🔰 जिल्हानिहाय जागा:-

एन.सी.टी.ई.ने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील बी.एड. शिक्षणक्रमाला एकूण १५०० जागांना मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ४२/४३ जागा भरण्यात येतात. उर्वरित ३० जागा प्रत्येक जिल्ह्याला एक याप्रमाणे सैन्यदलातील सेवेत असलेले आजी व माजी कर्मचारी यांच्यासंदर्भात असलेल्या परिपत्रकानुसार भरण्यात येतील.

🔰 किमान पात्रता :-

            1) यू.जी.सी. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी/ पदव्युत्तर पदवी.

2) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५० % (४९.५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे गुण) व मागासवर्गीय उमेदवारांना किमान ४५ % (४४.५ ते ४५ टक्क्यांपर्यंतचे गुण ) गुण असणे अनिवार्य आहे. (महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर स्केल लागू केला आहे अशा प्रवेशेच्छुना पदवी / पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही, मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)

3) डी.एड./डी.टी.एड./क्राफ्ट टीचर डिप्लोमा हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्ष) अनुभव असलेल्या अध्यापकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.

4) प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल, पूर्णवेळ / अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल, असे शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

🔰 प्रवेश अर्ज कसा भरावा:-

आपणाला बी.एड. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. त्यामुळे माहिती पुस्तिका बारकाईने वाचून मगच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्ज भरतेवेळी आपण राखीव प्रवर्गातील असाल तर जात प्रमाणपत्र, ना सायस्तर(Non Crymilyer), जात पडताळणी दाखला आपणाजवळ असणे आवश्यक आहे. नेट बैंकिंगद्वारे प्रोसेसिंग शुल्क भरल्यानंतर आपल्याला आपला प्रवेश अर्ज यशस्वीपणे भरला गेल्याचा संदेश येईल. ज्या विद्यार्थ्यांना अर्ज यशस्वीपणे भरल्याचा संदेश येईल तेवढेच अर्ज प्रवेशासाठीच्या प्रक्रियेत विचाराधीन असतील, याची नोंद घ्यावी. प्रवेश पात्रतेच्या माहितीत आपण काही चूक केल्यास आपण प्रवेशेच्छुंच्या यादीत नसाल, तसेच प्रवेश अर्ज भरतेवेळी गुणवत्ता यादीवर परिणाम करणा-या घटकांबाबत आपण केलेली चूक, अपूर्ण माहिती व पुरविलेली खोटी माहिती आपणास प्रवेशप्रक्रियेतून बाद करू शकते तसेच खोट्या कागदपात्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याची तक्रार विद्यापीठाला कधीही प्राप्त झाली व त्या तक्रारीत तथ्य आढळल्यास आपला प्रवेश रद्द होऊन शुल्कही परत केले जाणार नाही तसेच आपल्यावर शासन नियमानुसार FIR दाखल केला जाईल याची नोंद घ्यावी.याचीही नोंद घ्यावी. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी व भरलेला अर्ज बरोबर आहे. का ते तपासण्याची जबाबदारी पूर्णतः प्रवेशेच्छुकांची आहे.

▶️ मार्गदर्शक व्हिडिओ आवश्य पाहा.👇


🔰 B.ed Prospect डाऊनलोड करा,👇





Post a Comment

0 Comments