Subscribe Us

शाहू महाराज जयंती भाषण मराठी | shahu maharaj jayanti bhashan

शाहू महाराज जयंती भाषण मराठी | shahu maharaj jayanti bhashan

shahu maharaj jayanti bhashan
shahu maharaj jayanti bhashan


नमस्कार मित्रांनो, आज आपण २६ जून या दिवशी साजरी होणारी जयंती म्हणजेच राजर्षी शाहू महाराज जयंती संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मी माझे विचार मांडणार आहे.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या विद्यार्थी मित्रहो, आज 26 जून म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.

कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा पहिला राजा. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रुपयाचा दंड लावणारे. अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यावर प्रहार करणारा राजा. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारे. बहुजन आणि सर्वसामान्य लोकांच्या मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारा राजा. समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळावी म्हणून शाळा, पाणवठे, दवाखाने सर्वाना खुला करून देणारा राजा. जातीपातीच्या भिंतीमध्ये गाडलेल्या आणि गंजलेल्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा राजा. सती जाणाऱ्या स्त्रियांना सन्मानाचा मार्ग म्हणून विधवा पुनर्विवाहाचा कायदा करणारा राजा. कलावंतांना राजाश्रय देणारा राजा. बाळ तू शिकला नाहीस तरी चालेल पण तू टाकीत जा असे म्हणणारा. सहकारी संस्था निर्माण करणारा राजा. बहुजनांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधणारे. सर्व क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारा राजा. रयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारे. असा सर्वगुणसंपन राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज.

मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा फुले यांनी केली होती. ती प्रत्यक्षात, शाहू महाराजांनी सत्यात उतरवली. 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50% जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या, डेक्कन रयत असोसिएशन ही देखील शाहू महाराजांचे देणं होय. 1917 साली त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला.

राजर्षी शाहू महाराज या नावाची आख्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही पण खंत ही आहे की आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांची कार्ये त्यांनी मांडलेले विचार याची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. माहिती ती कशी असणार ? आजचा तरुण व्हाट्सअप्प, फेसबूकवर फक्त महाराजांचा फोटो डीपी म्हणून ठेवण्यात व्यस्त आहे. एक दिवस स्टेटस ठेवले किंवा फेसबुक वर एखादी पोस्ट शेअर केली की झाली जयंती असे मानणाऱ्या तरुणाला त्यांचे चरित्र वाचायला वेळ आहे तरी कोठे ? वाळीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या त्या काळी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाचा या लोकनायकाची जाती पातीच्या अंधार्‍या जगात पुन्हा अडकत जाणाऱ्या महाराष्ट्र, देशाला आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे.

धन्यवाद,,,!


वाचा - शाहू महाराज माहिती मराठी | shahu maharaj mahiti in marathi

वाचा - शाहू महाराज निबंध मराठी | rajarshi shahu maharaj nibandh marathi

वाचा - शाहू महाराज कार्य | shahu maharaj yanche karya


 आपणास हे ही आवडेल - शिवजयंती 2022 प्रश्नमंजुषा मराठी

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments