Subscribe Us

5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविणेबाबत

✳️ 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविणेबाबत.

शिक्षक दिन भाषण, Teacher day


🔰 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

▶️ सांकेतांक क्र- 202108301930460021

▶️ G.R.दि.31-08-2021

शासन निर्णय:-

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने २ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

🔰 शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.👇

✳️ Thank A Teacher उपक्रमाबाबत मार्गदर्शक व्हिडिओ पहा.👇


✳️ Thank A Teacher उपक्रमाबाबत मार्गदर्शक व्हिडिओ क्र.2 पहा.👇


✳️ Thank A Teacher उपक्रमाबाबत मार्गदर्शक PPT पहा.👇


➡️ इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी :-

🟣 कार्यक्रमाचे नाव 👇

१. वक्तृत्व

२. चित्र रेखाटन 

३. काव्य वाचन

४. निबंध

🔷 विषय 👇

१. माझा आवडता शिक्षक 

२. शिक्षक दिन

३. मी शिक्षक झालो तर / मी शिक्षिका झाले तर


➡️ इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी :-

🟣 कार्यक्रमाचे नाव 👇

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. स्वरचित कविता लेखन

४. काव्यवाचन

🔷 विषय 👇

१. माझा शिक्षक माझा प्रेरक

२. कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका

३. माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान

४. उपक्रमशील शिक्षक


➡️ इयत्ता नववी ते इयत्ता बारावी :-

🟣 कार्यक्रमाचे नाव 👇

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. शिक्षकांची मुलाखत

४. काव्य लेखन

५. काव्य वाचन

🔷 विषय 👇

१. आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका

२. देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान 

३. शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम

४. माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम


उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर Facebook-@thxteacher, Twitter-@thxteacher, Instagram-@thankuteacher अशा प्रकारे टॅग करुन पलोड करावेत. यावेळी

#ThankATeacher

#ThankYouTeacher

#MyFavouriteTeacher

#MyTeacherMyHero

#ThankATeacher2021

या हॅशटॅग (#) चा वापर करावा.

यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद" महाराष्ट्र (SCERT) ने जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करावी. कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात यावा.

सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा सांकेतांक २०२१०८३०१९३०४६००२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

🔰 शासन निर्णय पहा.👇


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


एकवेळ आवश्य भेट द्या.👇👇
▶️ MPSC,शिक्षक भरती, पोलिस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त वेबसाईट भेट द्या.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments