Subscribe Us

शिक्षक पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत

शिक्षक पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत.

शिक्षक पात्रता परीक्षा TET


✳️ व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत.

संदर्भ :-
 १. शासन निर्णय क्र. आरटीई २०१३/प्र. क्र. ९१/प्राशि-१, दिनांक २३.८.२०१३
२. शासन शुद्धिपत्रक क्र. आरटीई २०१४/प्र. क्र. २००/टीएनटी-१, दिनांक ९.९.२०१४
३. आपले पत्र क्र. मरापप/बापवि/२०२१/२३९४ दिनांक २०.८.२०२०

🔰 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

▶️ सांकेतांक क्र- 202108271454040221

▶️ पत्र दि.27-08-2021

उपरोक्त विषयास अनुलक्षून संदर्भ- ३ अन्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने कळविण्यात येते कि, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या धोरणाशी सुसंगती राखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून संदर्भ- २ येथील शासन शुद्धिपत्रक दिनांक ९.९.२०१४ अन्वये “शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्याची मुभा राहील", हा मजकूर वगळण्यात आला आहे. तथापि, संदर्भ १ मधील दिनांक २३.८.२०१३ च्या मूळ शासन निर्णयातील शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी "व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्याची मुभा राहील", ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.

२. उपरोक्त बाब विचारात घेऊन शिक्षक पात्रता परिक्षेसाठी व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना सदर परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

३. सदर पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२१०८२७१४५४०४०२२१ असा आहे. हे पत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

🔰 शासन परीपत्रक पहा.👇


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ MPSC,शिक्षक भरती, पोलिस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त वेबसाईट भेट द्या.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments