Subscribe Us

महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.



✳️राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

🔰वित्त विभाग

▶️ सांकेतांक क्र- 202110071550585405...

▶️ G.R.दि.07-10-2021

शासन निर्णय:-

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. 

२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात यावा. सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२०, दिनांक १ जुलै, २०२० आणि दिनांक १ जानेवारी, २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र दिनांक १ जानेवारी २०२० ते दिनांक ३० जून, २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७% इतकाच राहील. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून रोखीने देण्यात यावी.

दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. 

३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

4. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२११००७१५५०५८५४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH

Post a Comment

0 Comments