Subscribe Us

शा.पो.आ.शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस वितरणाबाबत | MDM Nutitive slice for students

शा.पो.आ.शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस वितरणाबाबत | MDM Nutitive slice for students


शालेय पोषण आहार, zpps tech guruji


शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस वितरीत करणेबाबत, 

MDM Nutitive slice for students

प्रति,

१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व.

विषय:- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस वितरीत करणेबाबत.

संदर्भ:- १. शासन पत्र क्र. शापोआ-२०१९/प्र.क्र.११३/ एस.डी. ३. दि. १६/०७/२०२१. 

२. दिव्या एस. आर. जे. फूड्स एलएलपी, जालना या संस्थसोबत करण्यात आलेला करारनामा दि. २२/०७/२०२१.

३. संचालनालयाचे पत्र क्र. जा. क्र. प्राशिसं / शापोआ/न्युट्रीटीव्ह स्लाईस / २०२१२२/१०५९. दि. ०४/०८/२०२१.

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यामधील योजनेस पात्र शाळापैंकी सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचा शाळास्तरावर पुरवठा करण्याकरीता प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर ई निविदा प्रक्रिया राबवून दिव्या एस. आर. जे फूड्स एलएलपी, जालना या संस्थेची निवड करून उक्त संस्थेसोबत संदर्भ क्र. २ अन्वये करारनामा करण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन हे मुख्य घटक व Whole Wheat Flour, Refined Wheat Flour with Iron Enrichment, Sugar Powder, Edible Oil, Skimmed Milk Powder, Flavour and other essential ingredients असे इतर उपघटकांपासून तयार करण्यात आलेल्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करण्यात येणार आहे त्याकरीता शासकीय शाळांमध्ये असलेली पटसंख्या व इतर अनुषंगिक माहिती जिल्ह्याकडून संदर्भ क्र. ३ च्या पत्राद्वारे मागवण्यात आली होती. त्यानुसार शासकीय शाळांमधील विद्यार्थ्ययांना न्युट्रीटीव्ह स्लाईस उपलब्ध करून देण्याकरीता दिव्या एस. आर. जे फूड्स एलएलपी. जालना या संस्थेकडे मागणी नोंदवून पुरवठ्यापश्चात शाळास्तरावर विद्यार्थी / पालकांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करणेबाबत आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

अ) न्यूट्रिटिव्ह स्लाईसची मागणी नोंदवणे व शाळा स्तरावर पुरवठा करणे:-

१. शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या शासकीय शाळेमधील (जिल्हा परिषद, मनपा, नपा,शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्यार्थ्यांची पटसंख्या संदर्भ क्र. ३ च्या पत्राद्वारे मागविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या पटसंख्येचा गोषवारा या सोबत परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आला आहे. उक्त गोषवार्‍यामध्ये नमुद करण्यात आलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात न्यूट्रीटीव्ह स्लाईसची मागणी नोंदविणे अनिवार्य राहील 

२. प्रति विद्यार्थी वितरीत करावयाच्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे प्रमाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.


३. वरीलप्रमाणे मुद्दा २ मध्ये नमूद केलेप्रमाणे न्यूट्रिटीव्ह स्लाईसची शासकीय शाळेमधील (जिल्हा परिषद, मनपा, नपा, शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्याथ्र्यांकरीता प्रति विद्यार्थी निश्चित केलेल्या प्रमाणात व संदर्भ क्र. ३ च्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानुसार शाळानिहाय संकलित केलेल्या पटसंख्येनुसार न्युट्रीटीव्ह स्लाईसची मागणी इंग्रजीमध्ये एम एस एक्सेल (MS Excel) मध्ये जिल्हास्तरावरून तयार करावी. सदर मागणीची एक प्रत पुरवठेदाराच्या प्रतिनिधीकडे देऊन त्यांची पोहोच घेऊन सॉफ्ट कॉपी पुरावठेदाराच्या treffbakers@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. मागणीची एक प्रत संचालनालयास ई-मेलद्वारे सादर करण्यात यावी.

प्रति विद्यार्थी मागणी नोंदविण्याकरीता खालील नमुना उदाहरणार्थ दिलेला आहे.


४. जिल्ह्यातील पात्र शाळांच्या पटसंख्येनुसार इ. १ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी करीता वेगवेगळी मागणी नोंदविण्यात यावी.

५. उपरोक्त मुद्दा क्रमांक ३ मध्ये दिलेल्या उदाहरणाचा उपयोग करून जिल्ह्याची एकत्रित शाळानिहाय मागणी सोबतच्या परिशिष्ट ६ मध्ये दिलेल्या मागणीच्या नमुन्यामध्ये पुरवठेदाराकडे नोंदविण्यात यावी.

६. जिल्ह्यातील पात्र शाळांच्या पटसंख्येनुसार इ. १ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी करीता एकूण मागणीनुसार आवश्यक न्यूट्रिटीव्ह स्लाईसचा पुरवठा करण्याकरीता संबंधित पुरवठेदारास पुरवठा वितरण आदेश अचूक व वस्तुस्थितीदर्शक देण्यात येतील याची योग्य ती खबरदारी घ्यावी.

७. न्यूट्रिटीव्ह स्लाईसचा पुरवठा जसाच्या तसा सिलबंद पॅकेट स्वरूपात मागणीप्रमाणे शाळा स्तरावर पुरवठा करणेबाबत पुरवठेदारास निर्देश द्यावेत.

८. न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे निश्चित केलेले प्रमाण अ-२ मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्या प्रमाणातच न्यूट्रिटीव्ह स्लाईस पॅकींग स्वरूपात शाळास्तरावर मागणीनुसार पुरवठा करून घेण्यात यावा, न्यूट्रिटीव्ह स्लाईस पॅकींग स्वरूपात शाळास्तरावर उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात यावी.

९. न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे यादृच्छिक (Randomly) पध्दतीने वजन करून न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वजन विहित प्रमाणात असल्याची खात्री करून एकूण प्राप्त न्यूट्रिटीव्ह स्लाईसची पोहोच देण्याबाबत निर्देश द्यावेत. सदरील पाचही प्रकारच्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसच्या एका पॅकेटचे वजन १२० ग्रॅम आहे व एका बॉक्स मध्ये १२० ग्रॅमचे एकूण ६० पॅकेट असणे आवश्यक आहे.

१०. अनुक्रमांक असलेल्या तीन रंगाच्या पावत्या (१ गुलाबी २ पिवळी ३ पांढरी) पुरवठेदार छापून घेईल, तीन रंगाच्या पावत्यापैकी गुलाबी रंगाची पावती न्यूट्रिटीव्ह स्लाईसचा माल स्विकारणाच्या शाळेकडे राहील. पिवळ्या रंगाची पोहोच पावती पुरवठादार पुरवठा केलेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसच्या पोहोंच पावतीनुसार शाळानिहाय यादी तयार करून पुरवठा करण्यात आलेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसच्या पॅकेटचे वजन, पावती नंबर व इतर अनुषंगिक माहितीसह तसेच तालुकानिहाय गोषवारा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करील. पांढऱ्या रंगाची पावती पुरवठादाराकडे त्यांची स्वतःची प्रत म्हणून ठेवील. पावतीवर तालुक्याचे आणि जिल्हयाचे नाव, पुरवठयाचा दिनांक, वाहन क्रमांक, मालाची वाहतूक करणाऱ्याचे नाव इत्यादी तपशील असेल. पोहोच पावती पुस्तक पुरवठादार स्वत:चे खर्चाने छापून घेईल.

११. पुरवठेदाराकडे न्यूट्रिटीव्ह स्लाईसची मागणी नोंदविल्यापासून ६० कार्यदिवसांचे आत शाळा स्तरावर पुरवठा करणे बंधनकारक आहे. निर्धारित कार्यदिवसात मागणीप्रमाणे पुरवठा झालेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वजन व इतर माहिती परिशिष्ट- २ मध्ये संचालनालयास सादर करण्यात यावी. 

१२. न्यूट्रिटीव्ह स्लाईसचा निर्धारित कार्यदिवसात मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास पुरवठेदार अयशस्वी ठरल्यास विलंबाने पुरवठा झालेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वजन व विलंबाच्या कालावधीची माहिती परिशिष्ट-३ मध्ये संचालनालयास सादर करण्यात यावी.

१३. पुरवठा करण्यात आलेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसचा दर्जा, प्रमाण अथवा पॅकींगबाबत मुख्याध्यापक प्रथमदर्शनी समाधानी नसल्यास सदर माल बदलून देण्याबाबत लेखी स्वरूपात पुरवठेदारास सूचना देण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचित करावे, मुख्याध्यापकाच्या सूचनेनुसार सदर माल सात कार्यदिवसाच्या आत स्वखर्चाने शाळास्तरावर बदलून देण्याबाबत पुरवठेदारांना बंधनकारक आहे.

१४. मुद्दा क्रमांक १३ नुसार पुरवठेदाराने विहित मुदतीत सदर माल बदलून न दिल्यास संचालनालयास ळविण्यात यावे व त्यानुसार तेवढया मालाची रक्कम कपात करण्याची शिफारस करण्यात यावी. 

ब) शाळास्तरावर विद्यार्थी / पालकांना न्युट्रीटीव्ह स्लाईस वाटप करणे

१. शाळास्तरावर प्राप्त न्यूट्रिटीव्ह स्लाईस सुस्थितीमध्ये ठेवावे. शाळास्तरावर न्यूट्रिटीव्ह स्लाईस प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती (SMC) यांनी सदर न्यूट्रिटीव्ह स्लाईस वाटपाचे नियोजन करावे.

२. कोरोना विषाणू प्रादुर्भाव विचारात घेवून शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून टप्प्याटप्प्याने विद्यार्थी / पालकांना शाळेमध्ये बोलावून न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे विहित प्रमाणात वाटप करावे. न्यूट्रिटीव्ह स्लाईस पॅकींगमध्ये वितरीत करण्यात येत असल्याने न्यूट्रिटीव्ह स्लाईस घेणे करीता कापडी पिशवी सोबत आणण्या बाबत विद्यार्थी / पालकांना सूचित करण्यात यावे.

३. मागणी नुसार वितरीत करण्यात येणा-या पाचही प्रकारच्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसच्या प्रत्येक पॅकेटचे वजन १२० ग्रॅम असणार आहे. प्रत्येक १२० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये ७.५ ग्रॅम वजनाच्या एकूण १६ न्यूट्रिटीव्ह स्लाईस असणार आहेत.

४. इ.१ ली ते ५ वीच्या प्रती विद्यार्थ्यांना पाचही प्रकारच्या १२० ग्रॅम न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वाटप करावयाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

याप्रमाणे २४ दिवसांसाठी विद्यार्थ्यांना विहित मुदत कालावधीसाठी पाचही प्रकारच्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वाटप करण्यात यावे.

५. आठवड्यातील पाच दिवस प्रति दिन अनुक्रमे ३० ग्रॅम (७.५ ग्रॅम वजनाच्या ४ स्लाईस) इ.१ ली ते ५ वी तसेच ४५ ग्रॅम (७.५ ग्रॅम वजनाच्या ६ स्लाईस) इ. ६ वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी स्लाईसचे सेवन करणे आवश्यक आहे.

६. न्यूट्रिटीव्ह स्लाईसची साठवणूक व वाटपाकरीता स्वयंपाकी/मदतनीस यांची मदत घ्यावी 

७. कोविड- १९ साथीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार महसुल व पोलीस प्रशासनास वितरणाबाबत पूर्व सूचना देण्यात यावी

८. इ.१ ली ते ५ वी व इ६ वी ते ८वी याप्रमाणे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसची नोद शाळा स्तरावर ठेवण्यात यावी.

क) पुरवठा करण्यात आलेल्या न्यूट्रीटीव्ह स्लाईसची माहिती सादर करणे

१. पुरवठा करण्यात आलेला न्यूट्रिटीव्ह स्लाईसची शाळानिहाय चलने / पोहोच पावत्या आणि पुरवठ्याची शाळानिहाय वाटप यादी व गोषवारा पुरवठेदाराने जिल्हा परिषद स्तरावर इ. १ ली ते ५ वी करीता परिशिष्ट ४ मध्ये व इ. ६ वी ते ८ वी करीता परिशिष्ट-५ मध्ये सादर करावा.

२. शाळानिहाय पुरवठा करण्यात आलेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसची यादी व गोषवार्‍याची लेखाधिकारी (शा.पो.आ.) / अधीक्षक शा.पो.आ./ संबंधित अधिकारी (शा.पो.आ.) यांनी पडताळणी करावी. 

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी पुरवठादाराने जिल्ह्यामध्ये पुरवठा केलेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसची देयके संचालनालय स्तरावरून अदा करण्याकरीता स्वयंस्पष्ट अभिप्रायासह पुरवठा केलेल्या न्यूट्रिटीव्ह स्लाईसची शाळानिहाय वाटप यादी व गोषवारा सोबतच्या परिशिष्ट २ परिशिष्ट ४ व परिशिष्ट ५ मधील विहित नमुन्यामध्ये तसेच परिशिष्ट ८ व परिशिष्ट ९ नुसार उपयोगिता प्रमाणपत्रसह  राज्य समन्वय अधिकारी, शालेय पोषण आहार योजना (स्वतंत्र कक्ष), पुणे यांना दोन प्रतीमध्ये सादर करावी.

४. वरील सर्व कागदपत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांच्या उपयोगिता प्रमाणपत्रासह दोन प्रतीमध्ये सादर करावीत.

ड) पुरवठा केलेल्या न्यूट्रीटीव्ह स्लाईसच्या नगुन्यादी प्रयोगशाळेकडून तपासणी करून दर्जा निश्चित करणे -

१. पुरवठादाराने मालाचा पुरवठा केल्यानंतर ३ दिवसात तात्काळ त्याचे यादृच्छिक (Random) पध्दतीने जिल्ह्यातील कोणत्याही दोन तालुक्यातील व कोणत्याही दोन शाळांमधील न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे प्रत्येकी दोन पॅकेटचे नमूने जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय अधिकाऱ्याकडून संकलित व सिलबंद करून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या पत्रासह संचालनालयाकडे शासकीय किंवा NABL संलग्नित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांची माहिती परिशिष्ट-७ मधील विहीत नमुन्यामध्ये संचालनालयास सादर करावी.

२. न्यूट्रीटीव्ह स्लाईसची शाळा स्तरावर वाहतुक करतेवळी घ्यावयाच्या दक्षतेबाबत पुरवठेदारास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात यावेत

i) शाळा स्तरावर न्यूट्रिटीव्ह स्लाईसवा पुरवठा करतांना वजनात घट आल्यास सदर नुकसानीची भरपाई पुरवठेदारास करावी लागेल.

ii) न्यूट्रिटीव्ह स्लाईसचा पुरवठा आहे त्या स्थितीत म्हणजेच सिलबंद पॅकेटमध्येच शाळांना पोहोच करणे पुरवठेदारास अनिवार्य राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिलबंद पॅकेट उघडता येणार नाही,

iii) पुरवठेदाराने शाळांना वितरीत केलेल्या न्यूट्रिटीव्ह रलाईराच्या अचूक नोंदी ठेवणे आवश्यक आहे.

iv) पुरवठेदाराने न्यूट्रिटीव्ह स्लाईसचा पुरवठा शाळेच्या वेळेतच करील. काही कारणास्तव, शाळेच्या वेळेत पुरवठा करणे शक्य न झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व पुरवठेदार यांच्या परस्पर सहमतीने दिवस भरात न्यूट्रीटीव्ह स्लाईसचा पुरवठा करण्यात येईल. परस्पर सहमती शिवाय इतर कालावधीत पुरवठा केल्यास, तो कोणत्याही परिस्थितीत शाळांकडून स्विकारण्यात येणार नाही.

इ) क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी घ्यावयाची दक्षता

१. शालेय पोषण आहार योजनेस पात्र शासकीय शाळा व विद्यार्थी संख्येनुसार अचूक मागणी तयार करून पुरवठेदारास देण्यात यावी.

२. विहित मुदतीमध्ये मागणीनुसार पुरवठा होण्याच्या अनुषंगाने संनियंत्रण ठेवण्यात यावे, 

३. शाळा स्तरावर न्यूट्रिटीश स्लाईसचा पुरवता झाल्यानंतर विद्यार्थी / पालकांना निश्चित पॅकींग तपशिलाप्रमाणे व दर्जानुसार वितरण होत असल्याची खात्री शाळांना भेटी देवून करावा.

४. शाळास्तरावर विद्यार्थी / पालक यांना न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वाटप सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून होत आहे किंवा कसे? याची खात्री करावी. 

५. शाळांना व पुरवठेदारास येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करावे.

६. शाळा स्तरावर न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वितरणाबाबत आवश्यकतेनुसार महसुल व पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करून द्यावे आणि आवश्यकतेनुसार संपर्क करावा.

✳️MDM Nutitive slice for students बाबत महत्वपूर्ण व्हिडीओ पहा.👇

https://youtu.be/a4UcS-QKTH0



आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH

Post a Comment

0 Comments