Subscribe Us

NAS परीक्षा | nas परीक्षा माहिती मराठी | National achievement survey | zpps tech guruji

 NAS परीक्षा | nas परीक्षा माहिती मराठी | National achievement survey | zpps tech guruji


✳️NAS परीक्षा माहितीबाबत संपूर्ण मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇



✳️NAS प्रश्नांचे स्वरूप कसे असते.?व्हिडीओ पहा.👇




✳️ NAS संबंधी व्हिडीओ पहा..👇



🔰 NAS (नॅशनल अचिव्हमेंट सर्वे) बद्दल थोडक्यात

🔰 दि. 12 नोव्हेंबर  रोजी राज्यभरात  प्रत्येक जिल्ह्यातील निवडलेल्या काही  इ. 3 री , 5 वी , व 8 वी च्या वर्गावर हे सर्वेक्षण होणार आहे.  .

🔰 या सर्वेक्षणाला राष्ट्रीय संपादणूक चाचणी असेही म्हणले जाते.

1. ह्या सर्वेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग  NCERT  यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.

2. शाळा निवडताना NCERT कडून s, r1 आणि r2 या प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

3. s (selected), r1 (reserve 1) आणि r2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.

4. या सर्वेक्षणाअंतर्गत निवडलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गामध्ये दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी चाचणी होणार आहे.

5. चाचणीचे स्वरूप :- objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल () करणे अपेक्षित आहे.

6. इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)

7. इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र  (environment science) सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)

8. चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न  इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.

9. या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.

10. चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.

11. चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.

12. आपल्या शाळांसाठी उपलब्ध करून दिलेले पर्यवेक्षक (F.I.) चाचणीच्या एक-दोन दिवस अगोदर आपल्या शाळेला भेट देतील व शालेय स्तरावर झालेल्या चाचणी संबधीच्या नियोजनाची पहाणी करतील.

 13. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी चाचणीच्या एक दिवस अगोदर जिल्हा / तालुका स्तरावरून सीलबंद स्थितीमध्येच ताब्यात घ्यायच्या आहेत.

14. आपल्याला मिळालेल्या सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका या पर्यवेक्षकासमोरच बाहेर काढायच्या आहेत व त्यावर पर्यवेक्षकाची व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यायची आहे.

15. निवडलेल्या वर्गातील जास्तीत जास्त 30 विद्यार्थ्यांसाठी चाचणी होणार आहे, मात्र वर्गाची पटसंख्या 30 पेक्षा जास्त असतील तरीही चाचणीच्या दिवशी 100% (सर्व) विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी शाळेची आहे.

16. चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे चाचणीच्या दिवशी निळा / काळा बॉलपेन असावा असे नियोजन शाळेने करावयाचे आहे.

17. निवडलेल्या वर्गांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्र. शाळेने आपल्या दप्तरी ठेवावे व चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यावेत.

18. चाचणी पूर्ण झाल्यावर पर्यवेक्षकाच्या मदतीने प्रश्नोत्तरपत्रिका व इतर साहित्याचे used
unused प्रकारात वर्गीकरण करून ते दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करायचे आहेत.

19. उत्तरपत्रिकांचे हे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर जाणार आहेत.

20. या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुकानिहाय निकाल NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

21. यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल, राज्यातील / जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे-पुढे आहे हे समजेल.

22. आलेल्या निकालावरून NCERT, SCERT आणि DIECPD यांचेकडून कृतीकार्यक्रम तयार केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी संबंधित तालुक्यांना करावयाची आहे.

✳️ NAS- सर्वेक्षणासाठी खालील माहिती मुख्याध्यापकांकडे असणे  आवश्यक आहे:-

1) विद्यार्थी हजेरी पत्रक (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेने हजेरी पत्रकाचे दोन प्रतीत झेरोक्स करून ठेवावे)
2) इयत्तानिहाय पट (मुले मुली)
3) शाळा UDISE कोड
4) मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी
5) कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी
6)शाळा माध्यम:मराठी/सेमी/ इंग्रजी असल्यास इयत्ता व तुकडी संख्या :
7)शाळा व्यवस्थापन प्रकार 

8)ग्रामीण/शहरी

✳️ NAS Exam शिक्षकांसाठी नमूना प्रश्नावली डाऊनलोड करा.👇

✳️ NAS Exam नमुना उत्तरपत्रिका OMR Sheet  डाऊनलोड करा.👇


✳️आपणास हे ही आवडेल ➡️ NAS परिक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.

✳️आपणास हे ही आवडेल ➡️ NAS परिक्षा जिल्हानिहाय याद्या डाऊनलोड करा.

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ NAS प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ शिकू आनंदे सर्व भाग इ.1 ली ते 5 वी



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH


Post a Comment

0 Comments