Subscribe Us

ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक्स | Online Nishtha 2.0 Training medium wise course links

ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक्स | zpps tech guruji, Online Nishtha 2.0 Training medium wise course links

निष्ठा प्रशिक्षण, zpps tech guruji


🔰 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰 
✳️ ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक्स ✳️ 

(1) माध्यम / भाषा :- मराठी

➡️Course-1 Marathi Click Here

➡️Course-2 Marathi Click Here

➡️Course-3 Marathi Click Here

(2) माध्यम / भाषा :-  इंग्रजी

➡️Course-1 English Click Here

➡️Course-2 English Click Here

➡️Course-3 English Click Here

(3) माध्यम / भाषा :- हिंदी

➡️Course-1 Hindi Click Here

➡️Course-2 Hindi Click Here

➡️Course-3 Hindi Click Here

(4) माध्यम / भाषा :- उर्दू

➡️Course-1 Urdu Click Here

➡️Course-2 Urdu Click Here

➡️Course-3 Urdu Click Here


✳️राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे


🔰ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिक्स.👇



प्रति,

• विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

• उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

*प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

*शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य.), जिल्हा परिषद, (सर्व)

• शिक्षण निरीक्षक (उत्तर मुंबई, पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई.)

* प्रशासन अधिकारी, मनपा / नपा (सर्व)

विषय :- राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत.

संदर्भ :-👇

१)  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे प्रशिक्षण आयोजनाबाबतचे पत्र दि. १३ जुलै २०२१

२) या कार्यालयाचे दीक्षा App वर नोंदणी करणेबाबतचे पत्र दि. २१ सप्टेंबर, २०२१ व २७ सप्टेंबर २०२१.

३) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / आय.टी./ NISHTHA प्रशिक्षण /२०२१/३१४३ दि. २७.०९.२०२१

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads' and Teachers' Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० - २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे.

👇

🛑निष्ठा २.० प्रशिक्षणासाठी दीक्षा अँप वर आवश्यक नोंदणीसाठी मार्गदर्शक व्हिडीओ.👇


✳️ मोबाईलवर Staff Id कसा शोधावा.👇



सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या इ. ९ वी ते १२ वी साठी अध्यापन करणाच्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA (National Initiative For School Heads' and Teachers' Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १९ मोड्यूल्स चा समावेश असणार आहे. यामध्ये १२ मोड्यूल्स हे सामान्य अभ्यासक्रमावर (Generic Modules) आधारित व ७ मोड्यूल्स हे विषयनिहाय अध्यापनशास्त्रावर आधारित (Pedagogy Based Modules) आहेत. ते खालील प्रमाणे,

🔰सामान्य अभ्यासक्रमावर आधारित (Generic Modules) घटकसंच (मोड्यूल्स).👇

१. अभ्यासक्रम आणि अध्ययन केंद्रित सर्व समावेशक शिक्षण २. सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्याचे विकसन

३. द्वितीय टप्प्यातील शिक्षण: मार्गदर्शन आणि समुपदेशन

४. शालेय नेतृत्व (माध्यमिक स्तर) संकल्पना व उपयोजन

५. शाळा आधारित मुल्यांकन

६. शालेय शिक्षणातील पुढाकार

७. शिक्षणातील विविध समस्या

८. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकन एकात्मीकरण

९. व्यावसायिक शिक्षण

१०. शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य

११. कला एकात्मिक अध्ययन

१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

✳️विषयनिहाय अध्यापनशास्त्र आधारित (Pedagogy Based Modules) घटकसंच (मोड्यूल्स).👇

१. इंग्रजी विषयाचे अध्यापनशास्त्र

२. हिंदी विषयाचे अध्यापनशास्त्र

३. उर्दू विषयाचे अध्यापनशास्त्र

४. संस्कृत विषयाचे अध्यापनशास्त्र

५. गणित विषयाचे अध्यापनशास्त्र

६. विज्ञान विषयाचे अध्यापनशास्त्र

७. सामाजिक शास्त्र विषयाचे अध्यापनशास्त्र

उक्त नमूद तपशीलवार माहितीनुसार एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित व ७ विषयनिहाय अध्यापनशास्त्र घटकसंचाचे (मोड्यूल्स) प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. यामध्ये सामान्य अभ्यासक्रमावरील मोड्यूल्स हे ३ ते ४ तासाचे असणार आहे व विषयनिहाय अध्यापनशास्त्रवरील मोड्यूल हे २४ ते २५ तासांचे असणार आहे. यामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकास सर्व १२ सामान्य अभ्यासक्रमावरील मोड्यूल्स (Generic Modules) व आपल्या विषयाचे एक विषय अध्यापनशास्त्रावरील मोड्यूल (Pedagogy Based Modules) ऑनलाईन पूर्ण करावे लागणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्म वर होणार असल्याने यासाठी आवश्यक सुचना खालीलप्रमाणे.

• सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व शिक्षकांनी DIKSHA App वर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

* सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक ३० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमवार आधारित ३ व दिनांक २ फेब्रुवारी, २०२१ पासून विषयनिहाय अध्यापनशास्त्रावर आधारित (Pedagogy Based Modules) मोड्यूल्स चे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतले जाणार आहे.

• शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे. 

सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA App वर दर ३० दिवसांसाठी एकूण ३ मोड्यूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे.

शिक्षक आपल्या पसंतीनुसार एका वेळी एक किंवा एका पेक्षा जास्त उपलब्ध मोड्यूल्स चे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतो.

उपलब्ध करून देण्यात आलेले मोड्यूल्स हे विहित मुदतीमध्ये शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक आहेत. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात येत आहे.

• ऑनलाईन नोंदणी व लॉगीन तसेच इतर शंका दूर करण्यासाठी आवश्यक सर्व व्हिडीओ देखील पत्रासोबत देण्यात आलेले आहे. तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठीची ऑनलाईन नोंदणी दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत करता येणार आहे. तसेच दिनांक ५ ऑक्टोबर, २०२१ पासून सदरच्या प्रशिक्षणास सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरुवात होणार आहे.

• सदर प्रशिक्षणासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असून ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्षामधील निष्ठा प्रशिक्षण तसेच ऑनलाईन स्वरुपामधील प्रशिक्षण यामध्ये काम केले आहे. अशा प्रती जिल्हा २ SRP यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती संदर्भ क्रमांक ३ नुसार करण्यात आलेली आहे.

• तसेच कार्यरत आय. टी. विषय सहायक यांना तांत्रिक कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. याकरिता आवश्यक सविस्तर उद्बोधन आयोजित करण्यात येईल.

• याचबरोबर सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मुल्यांकनामध्ये किमान ७०% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे, याची नोंद घ्यावी.

तरी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA अॅपच्या माध्यमातून सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील/ महाविद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावे. यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना अवगत करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होईल.


🔰 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰 

🟣 प्रशिक्षण वेळापत्रक 👇

(1) दि.२१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर, २०२१ ➡️ DIKSHA ॲपवर शिक्षक नोंदणी

(2) दि. ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, २०२१ ➡️ 

१. अभ्यासक्रम आणि अध्ययनकेंद्रित सर्व समावेशक शिक्षण 

२. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकन एकात्मीकरण

३. सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्याचे विकसन.

(3) दि.४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, २०२१ ➡️ 

४. कला एकात्मिक अध्ययन 

५. द्वितीय टप्प्यातील शिक्षण : मार्गदर्शन आणि समुपदेशन

६. शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य

(4) दि.४ डिसेंबर २०२१ ते ०२ जानेवारी २०२२ ➡️ 

७. शालेय शिक्षणातील पुढाकार

८. व्यावसायिक शिक्षण

९. शिक्षणातील विविध समस्या

(5) दि.३ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ ➡️

१०. शालेय नेतृत्व (माध्यमिक स्तर) : संकल्पना व उपयोजन 

११. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

१२. शाळा आधारित मुल्यांकन

(6) दि.२ फेब्रुवारी २०२२ ते ३ मार्च, २०२२ ➡️

विषयनिहाय अध्यापनशास्त्र आधारित घटकसंच (मोड्यूल्स)

विषयाचे अध्यापनशास्त्र इंग्रजी / उर्दू / संस्कृत / गणित / विज्ञान / सामाजिक शास्त्र

(7) दि.४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ ➡️

सर्व कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील या कालावधीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे कोर्स पूर्ण करावेत.


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH

Post a Comment

1 Comments

  1. Nista 2 च्या मार्च २०२२ ला सर्व लिंक मिळणार होत्या कधी मिळणार

    ReplyDelete