Subscribe Us

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२ सरावासाठी प्रश्नपत्रिका , संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२ प्रश्नपत्रिका, संपूर्ण माहिती,अभ्यासक्रम, nts परीक्षा म्हणजे काय, zpps tech guruji

nts परीक्षा म्हणजे काय, zpps tech guruji
nts परीक्षा म्हणजे काय

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२

राज्यस्तर परीक्षा दि. १६ जानेवारी २०२२

राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. १२ जून २०२२

                     माहितीपत्रक

💥 योजनेचे उद्दिष्ट :- इयत्ता १० वीच्या अखेर प्रज्ञावान विद्याथ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि  त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी. ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

💥 निवडपध्दती :- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी दोन स्तरावर घेण्यात येते. 

अ) राज्यस्तर 

ब) राष्ट्रीयस्तर

अ) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (राज्यस्तरीय)

१) पात्रता :

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतीही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही.

b) ओपन डीस्टन्स लर्निंग (ODL) स्कूल योजनेखाली नोंदविलेले खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरतात. 

• १ जुलै २०२१ रोजी ज्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे.

• जे नोकरी करीत नाहीत.

• जे इ. १० वी च्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत.

२) अर्ज करण्याची पध्दत:- 

खालील वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व http://ntsemsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील, ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र, केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्गातील (OBC) विद्यार्थ्याची Non creamy layer प्रमाणपत्र, EWS (Economically Weaker Section) प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. तसेच ऑनलाईन भरलेल्या विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रात काही दुरुस्ती असल्यास सदरची दुरुस्ती दि. १३ डिसेंबर २०२१ पर्यंत करता येईल, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असेल. सविस्तर माहिती परिषदेच्या www.mscepune.in व http://ntsemsce.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

३) शुल्क:- 

राज्यस्तर परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

१. ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे

💥 दिनांक :-  १६/११/२०२१ ते ३०/११/२०२१

💥 शुल्क  :- १५०/-

२.ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे

💥 दिनांक :-  ०१/१२/२०२१ ते ०७/१२/२०२१

💥 शुल्क  :- २७५/-

3.ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे

💥 दिनांक :-  ०८/१२/२०२१ ते १३/१२/२०२१

💥 शुल्क  :- ४००/-

४.ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे (शाळा / संस्था जबाबदार असेल तर)

💥 दिनांक :-  ०८/१२/२०२१ ते १३/१२/२०२१

💥 शुल्क  :- ५२५/-

५. शाळा संलग्नता शुल्क 

💥 संलग्नता शुल्क  :- रु. २००/- प्रति संस्था प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी

४) परीक्षेच्या तारखा :-

१) प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षा

💥 मिझोराम, मेघालय, नागालँड आणि अंदमान व निकोबार बेटे येथील परीक्षेचा दिनांक 👇

शनिवार दि. १५/०१/२०२२

💥 महाराष्ट्रसह इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथील परीक्षेचा दिनांक👇

रविवार दि. १६/०१/२०२२

२) द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षा

💥 सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश येथील परीक्षा दिनांक👇

रविवार दि. १२/०६/२०२२

५) राज्यस्तरीय परीक्षेचे विषय व वेळापत्रक :- 

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेते. सदर परीक्षेचे वेळापत्रक व विषय खालील प्रमाणे असतात.

1) बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test

💥 एकूण गुण :- १००

💥 एकूण प्रश्न :- १००

💥 कालावधी :- १२० मिनिटे ( फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ )

💥 वेळ :- १०.३० ते १२.३०

💥 पात्रता  गुण ( प्रत्येक विषयात किमान ) :- ४०% (SC, ST व दिव्यांग ३२% )

2) शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test

💥 एकूण गुण :- १००

💥 एकूण प्रश्न :- १००

💥 कालावधी :- १२० मिनिटे (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)

💥 वेळ :- १३.३० ते १५.३०

💥 पात्रता  गुण ( प्रत्येक विषयात किमान) :- ४०% (SC, ST व दिव्यांग ३२%)

अ) पेपर १ ला :- बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)

ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित १०० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. (एकूण १०० गुण)

ब) पेपर २ रा :- शालेय क्षमता चाचणी

ही सामान्यतः ९ वी व १० वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १) सामान्य विज्ञान २) समाजशास्त्र ३) गणित असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण १०० प्रश्न सोडवायचे असतात. सामान्य विज्ञान ४० गुण + समाजशास्त्र ४० गुण + गणित व भूमिती २० गुण एकूण = १०० गुण

💥 उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. 

a) सामान्य विज्ञान ४० गुण :- भौतिकशास्त्र १३ गुण, रसायनशास्त्र १३ गुण व जीवशास्त्र १४ गुण.

b) सामाजिक शास्त्र ४० गुण :- इतिहास १६ गुण, राज्यशास्त्र ०८ गुण व भूगोल १६ गुण. 

(c) गणित २० गुण :- बिजगणित १० गुण व भूमिती १० गुण.

६) माध्यम : 

प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दु, कन्नड व तेलुगू या सात माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) विद्यार्थ्यास सात माध्यमांपैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. प्रश्नपत्रिकेत काही शंका निर्माण झाल्यास इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका मूळ प्रत म्हणून पहावी. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे/निळे बॉलपेपने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली व अपुरी वर्तुळ गोल केलेले उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे, व्हाईटनर /खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

७) विद्यार्थ्याची प्रवेशपत्रे : 

ऑनलाईन फॉर्म व फी भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व http://ntsemsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉगिनवर परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्रे काढून विद्यार्थ्यास देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

८) परीक्षेचे मूल्यमापन :- 

विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. खबरदारीचे सर्व उपाय योजून बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. गत वर्षी राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी NCERT नवी दिल्ली यांचेकडून महाराष्ट्रासाठी एकूण ७७४ एवढा कोटा देण्यात आलेला होता. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी केला जात नाही.

९) गुणपडताळणी :- 

सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येते त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गुणांची गणना करु शकतात.

१०) आरक्षण :-

अनुसूचित जातींसाठी (SC) १५% शिष्यवृत्त्या अनुसूचित जमातींसाठी (ST) ७.५% शिष्यवृत्त्या, http://www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspy या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार (Non-creamy layer) इतर मागास संवर्गासाठी (OBC) २७% शिष्यवृत्त्या आणि EWS (Economically Weaker Section) घटकातील विद्यार्थ्यांसाठी १०% शिष्यवृत्त्या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच दिव्यांगांसाठी ४% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे. (a), (b), and (c) प्रत्येकी १% आरक्षण व (d), (e) या साठी १% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे.

NTS मधील गणित विषयाचे प्रश्न व्हिडीओ पहा.👇


NTS मधील बौध्दीक क्षमता विषयाचे प्रश्न व्हिडीओ पहा.👇



(a) Blindness and low vision: (BLV).

(b) Deaf and hard of hearing (DH)

(c) Locomotors disability including cerebral palsy leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy (LD) 

(d) Autism, intellectual disability, specific learning disability and mental illness (AID)

(e) Multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf blindness in the posts identified for each disabilities: (DH)

११) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाचे प्रमाणपत्रे :

(a) अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.

b) http://www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्ग (OBC) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे व Non-creamy layer प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.

(c) भारत सरकार यांचे No. ३६०३९/१/२०१९- Estt (Res) दि. ३१ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार Economically Weaker Section (EWS) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकार्‍याचे EWS प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे. 

(d) दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र Non-creamy layer प्रमाणपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर शाळा लॉगिन करुन दि.१३ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन upload करावयाची आहेत व तसेच सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीची आवश्यक प्रमाणपत्रे परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकांकडे जमा करणे बंधनकारक आहे, ज्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे विहित मुदतीत ऑनलाईन upload केली जाणार नाहीत तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकांकडे जमा केली जाणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना सर्वसाधारण संवर्ग (General category) म्हणून गृहीत धरले जाईल व सदर विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, संबंधित पालक व विद्यार्थ्याची असेल. याची नोंद घ्यावी.

१२) विद्यार्थ्यांची निवड :- 

विद्यार्थ्यांची निवड दोन स्तरावर करण्यात येईल.

a) प्रथमस्तर ( राज्यस्तर) :

संबंधित राज्यस्तर/केंद्रशासित प्रदेशाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल.

b) द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर ) :- 

प्रथमस्तर ( राज्यस्तर) परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी बसू शकतील. सदर परीक्षा NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येते.

१३) पात्रता गुण :- 

MAT व SAT विषयासाठी प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे General संवर्गासाठी ४०% गुण व SC, ST व दिव्यांगासाठी ३२% गुण आवश्यक आहेत. 

१४) निकाल घोषित करणे :- 

प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षेचा निकाल साधारण मार्च २०२२ च्या दुसर्‍या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल, जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच प्राप्त करून घ्यावयाचा आहे.

१५) परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी :-

परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी इ. १० वी व समकक्ष इयत्तेत शिकत असतील तर प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षेला न बसता थेट द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेस बसू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्याने NCERT नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीप्रमाणे आवश्यक पत्रव्यवहार करून संगणकावरून घेतलेले आवेदनपत्र सादर करावे. सदर आवेदनपत्रासोबत त्याच्या मागील वर्षीच्या गुणपत्राची सत्यप्रत जोडून ते दि. २८ फेब्रुवारी २०२२ पूर्वी NCERT नवी दिल्ली यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.

१६) अनधिकृततेबाबत इशारा :-

 NCERT नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी NCERT नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.                                 

ब) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (राष्ट्रीयस्तर)

१) राष्ट्रीयस्तर प्रज्ञाशोध परीक्षा :- 

राज्यस्तर परीक्षेत गुणानुक्रमे निवड झालेल्या विद्यार्थ्यानाच राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी बसता येते. ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद (NCERT) नवी दिल्ली यांचेमार्फत १२ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. (गत वर्षी सदर परीक्षा मुंबई, पुणे व नागपूर येथील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली आहे.) सदर परीक्षेसाठी वेळापत्रक व प्रवेशपत्र NCERT नवी दिल्ली यांच्या मार्फत साधारण मे २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन NCERT नवी दिल्ली यांच्या http://www.ncert.nic.in/ या संकेतस्थळावर देण्यात येतील.

२) परीक्षेचे मूल्यमापन :- 

विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी केला जात नाही. 

३) निकाल घोषित करणे :- 

द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेचा निकाल NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत घोषित केला जातो,

४) शिष्यवृत्ती :- 

अखिल भारतीय पातळीवर अंदाजित शिष्यवृत्ती संख्या २००० असून यासाठी SC साठी १५%, ST साठी ७.५%, केंद्रीय सूचीनुसार (Non-creamy layer) OBC साठी २७% आणि EWS (Economically Weaker Section ) १०% शिष्यवृत्त्या आरक्षित असतील, तसेच संबंधित संवर्गात ४% दिव्यांगासाठी आरक्षण असेल.

५) प्रमाणपत्र :-

(a) राज्यस्तर परीक्षेतून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.

(b) राष्ट्रीयस्तर परीक्षेतून शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्र दिले जाईल. 

६) शिष्यवृत्ती दर :- 

शिष्यवृत्ती धारकांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल.

१. शालान्त परीक्षेनंतर + २ स्तरावर दोन वर्ष (इ. ११ वी व इ. १२ वी) 

🔆 दरमहा शिष्यवृत्ती रु. :- १२५०/- 

२. सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत (उदा. B.A.. B.COM., B.Sc.)

🔆 दरमहा शिष्यवृत्ती  रु. :- २०००/-

३. सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत (पदव्युत्तर पदवीपर्यंत) 

🔆 दरमहा शिष्यवृत्ती रु. :-  २०००/-

४. Ph.D. साठी ४ वर्षापर्यंत (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी)

🔆 दरमहा शिष्यवृत्ती रु. :- विद्यापीठ आयोगाचे नियमानुसार मान्य दराने


                  आयुक्त, 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १.


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments