makar sankranti 2023 date and time | मकर संक्रांतीची माहिती 2023
makar sankranti 2023 date and time, मकर संक्रांतीची माहिती 2023
मकर संक्रांतीची माहिती
इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत (makar sankranti in marathi). दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. पण हा सण 15 जानेवारीलादेखील साजरा करण्यात येतो. पण असं फार क्वचित घडतं. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते या दिवशी तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का ? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनण्यास सुरुवात झाली. मकर संक्रांत नक्की का साजरी करतात याबद्दल मकर संक्रांतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मकर संक्रांत म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरून पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होऊन उत्तर गोलार्धात राहणाऱ्या आपण भारतीयांना जास्त प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होतो. हा दिवस मोठा होतो व रात्र लहान होत असते. म्हणून सर्वांना मकर संक्रमण दिवस हा उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो. मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो.
आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.
मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नाशिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याखेरिज गंगासागर येथे, कोलकाता शहरानजिक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत जाणे यालाच 'संक्रमण' म्हणतात. आणि मकर राशीत सूर्य जाणे म्हणजेच 'मकरसंक्रान्त' म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीत जातो, त्या संक्रमणाच्या दिवशी दर वर्षी हिंदू लोक 'संक्रांत हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चंद्रावर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणार्या इंग्रजी कॅलेंडर नुसार हिंदूंचा सण हा विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रात मात्र संक्रात हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेला साजरा करण्यात येतो. या वेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. या वेळी थन्डी असते, त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गुळ या पदार्थांना या दिवशी फार महत्व असते. सूर्याला व देवांना तिळगुळाचा नैवद्य दाखविला जातो. सुवासिनी या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात.
सुगडाचा वसा म्हणजे लहान मडक्यातून, गव्हाच्या ओंब्या, गाजर, उसाचे तुकडे, बोर, हरभर्याचे घाटे, तिळगुळाच्या वड्या हलवा, असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदी कुंकू लावून लावून ती सुवासिनीला देतात. भारत हा शेती प्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकलेल्या भाज्या धान्य वै. देवाण घेवाण व्हावी हाच उद्देश या सुगड्याच्या वाणाचा असावा. संक्रान्तिला जेवणात गुळाची पोळी वै मिष्ठान्न करण्याची पद्धत आहे.
मकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व
भारत हे त्योहारांचा देश आहे. इकडे प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण हा असतोच. यातच नव्या कॅलेंडर वर्षात पहिला आणि महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. हा सण सगळे रुसवे फुगवे विसरून जाऊन, गुण्या गोविंदाने राहायची शिकवण देणारा आहे. इतर सणा प्रमाणे मकर संक्रांतीला देखील एक वेगळे महत्व आहे आणि याला वैज्ञानिक आधार देखील आहे. आज आपण याचे महत्व आणि वैज्ञानिक आधार दोन्ही वर प्रकाश टाकणार आहोत.
1. कसे पडले नाव ?
मकर एक रास आहे आणि सूर्य एका राशि मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हणले जाते. याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. इत्यादी.
2. दर वर्षी एका तारखेलाच कसे काय येत हे ?
कदाचित हा हिंदु संस्कृती मधील एकमेव असा सण असेल जो एकाच तारखेला येतो. याच कारण हा सण सोलर (सूर्या च्या स्थान वर) कॅलेंडर फॉलो करतो. बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडर (चंद्रमा च्या स्थाना वर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो.
दोन वर्षी पुर्वी म्हणजे 2016 ला मकर संक्रांती ही 15 तारखेला साजरी करण्यात आली होती. हा सण दर 70 वर्षी नी एक तारीख पुढे जाते. इस 1972 सालापासून सन 2085 पर्यंत मकर संक्रांत कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येईल. सन 2100 पासून मकर संक्रांत 16 जानेवारीला येईल. तर 3246 मध्ये मकर संक्रांत चक्क 1 फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासक यांची आहे.
त्यामुळे मकर संक्रांतीपुण्यकाळ यावेळी 15 जानेवारी रोजी आली असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी मकर संक्रांती 14 जानेवारीलाच येते हे खरे नाही. सुर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व हा सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे 5/10 शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी 'लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो, अशी माहिती सोमण यांनी दिली.
सन 1899 मध्ये निरयन मकर संक्रांती 13 जानेवारीला आली होती. सन 1971 पासून सन निरयन मकर संक्रांती 14 जानेवारीलाच येत होती. 1972 पासून सन 2085 पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येईल. सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे सरकत सरकत 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क 1 फेब्रुवारीला येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले आहे.
मकर संक्रांती ही वाईट नसते. 'संक्रांत आली' हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थ वापरत असतो. दिनमान वाढत जाणे, त्याच दिवशी उत्तरायणारंभ झाला, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो.
3. तीळ आणि गूळ यांचं महत्व.
मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू बनवायची परंपरा आहे. या मागे, भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा अशी मान्यता आहे. जर याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास गूळ शरीराला थंडीमध्ये उष्णता देईल आणि तीळा मुळे शरीरात आवश्यक प्रमाणात स्नीग्धता राहील असे आहे.
4. नाव अनेक पण सण मात्र एकच
संक्रांति ही काय फक्त भारतातच साजरी नाही होत. ही आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. पण हा सण मात्र एकच आहे.
5. पतंगा चे महत्व
भारतात गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी हा सण पतंगाचा सण म्हणून ओळखला जातो. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर राहायला मदत मिळते.
6. दिवस आणि रात्र एक समान
या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मी चे दिवस यायला लागतात.
7. संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व :
या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.
संक्रांती यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवैः।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि ।।
( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.
उतर भारतात,
हिमाचल प्रदेश लोहडी अथवा लोहळी, (Lohri) पंजाब लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पंजाब, हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो. संध्याकाळच्या शेकोटी साठी छोटी मुले घरोघरी जावून गाणी म्हणतात व शोकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा केले जाते.
पूर्व भारतात,
बिहार - संक्रान्ति
आसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति
ओडिशा - मकर संक्रान्ति
पश्चिम भारतात,
गुजरात व राजस्थान - उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मिठाया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.
दक्षिण भारतात,
कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
तमिळनाडू - पोंगल, (Pongal) -
दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गुळ, दुध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते. याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
नेपाळमध्ये,
थारू (Tharu) लोक - माघी
अन्य भागात माघ संक्रान्ति (Maghe Sankranti) के माघ सक्राति (Maghe Sakrati)
थायलंड - सोंग्क्रान ( Songkran)
लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
म्यानमार - थिंगयान (Thingyan)
0 Comments