इयत्ता दहावीसाठी "परीक्षेची यशस्वी तयारी” ऑनलाईन मार्गदर्शन | zpps tech guruji
| परीक्षेची यशस्वी तयारी |
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग),
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व ),
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व जिल्हे),
शिक्षणाधिकारी (प्राथ.) / (माध्य ), (सर्व जिल्हे),
शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई,
शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी (सर्व म.न.पा./न.पा.),
प्रशासन अधिकारी (सर्व नगर परिषद).
विषय - "परीक्षेची यशस्वी तयारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये सुरू असणारे ऑनलाईन शिक्षण यासारख्या अनेक शैक्षणिक समस्यांमुळे इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे.
"परीक्षेची यशस्वी तयारी”
ऑनलाईन मार्गदर्शन
सत्र पहिले
दिनांक व वेळ
बुधवार, २३/०२/२०२२
दुपारी ३ ते ४:३०
विषय : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
सदर ऑनलाईन मार्गदर्शन पाहण्यासाठी खालील विडियो पाहा.
सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राची माहिती आपल्या अधिनस्थ शाळा, शिक्षक, पालक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच सदर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
एम.डी. सिंह.
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०
0 Comments