उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा २०२२ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प व तत्सम परीक्षा | zpps tech guruji
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे- ०४
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा २०२२
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प व तत्सम परीक्षा
कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
विशेष मार्गदर्शक सूचना
१. अ) कीविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर इ.१२ वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प व तत्सम परीक्षा प्रचलित पध्दतीप्रमाणे घेण्यात येतील. सदर परीक्षा दि. १४/०२/२०२२ ते दि.०३/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. प्रयोग यही (जर्नल) उपरोक्त कालावधीत सादर करावी,
महत्वाचे
मंडळाने उपरोक्तप्रमाणे निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय / अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देवू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि. ३१/०३/२०२२ ते दिनांक १८/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात यावी. Out of Turn चा कालावधी उपरोक्त कालावधीतच समाविष्ट असेल त्यामुळे Out of Turn साठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.
0 Comments