nmms 2021-22 exam date | एनएमएमएस परीक्षा 2022 | NMMS exam date 2022 Class 8
![]() |
| nmms 2021-22 exam date |
nmms 2021-22 exam date
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) - (सर्व) जिल्हा परिषद.
२. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (दक्षिण पश्चिम उत्तर विभाग)
३. प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी, म.न.पा. शिक्षण मंडळ
४. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)
विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ इ.८ वी साठी परीक्षा रविवार दिनांक १९ जून २०२२ अधिसूचना
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक ०६ एप्रिल २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करून शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.
१. सदर परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.
२. विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे.
३. शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु.१००/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)
आपली विश्वासू,
(शैलजा दराडे)
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे १.
NMMS परीक्षा माहिती | NMMS फाॅर्म ऑनलाईन भरण्यासाठी नमुना PDF डाऊनलोड करा
NMMS परीक्षा 2022 :-
💥 शुल्क प्रकार :- 👇
💥 कालावधी :- 👇
💥 शुल्क प्रकार :- 👇
💥 कालावधी :- 👇
💥 शुल्क प्रकार :- 👇
💥 कालावधी :-👇
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत :- 👇
www.mscepune.in व http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होतात. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व (अपंगत्व) प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व अपंगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही.
परीक्षेसाठी खालील प्रमाणे शुल्क आकरण्यात येते.👇


0 Comments