Subscribe Us

अण्णाभाऊ साठे भाषण | annabhau sathe

अण्णाभाऊ साठे भाषण | annabhau sathe

अण्णाभाऊ साठे भाषण | annabhau sathe

अण्णाभाऊ साठे भाषण | annabhau sathe



अण्णाभाऊ साठे भाषण | annabhau sathe

सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथे एक अशा अनमोल रत्नाची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत ज्यांनी अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात कथा, कादंबर्‍या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात शुक्रताऱ्यांप्रमाणे आपले अढळ स्थान निर्माण केले. ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले. ते म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील भारताच्या साहित्यातील एक मोठे नाव साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे होय.

अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे १ ऑगस्ट १९२० रोजी एका अस्पृष्य मांग समाजात झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे होते. जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. सवर्णाकडून होणाऱ्या भेदभावामुळे अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसातच शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पण ते कधी खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धूळीसारखे असते धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारधार बनते अशी त्यांची विचारसरणी होती. सन १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटीश सरकारने अण्णाभाऊंना पकडण्याचे वॉरंट काढले होते पण त्यांना चकवा देऊन ते मुंबईत आले.

मुंबईत जीवन जगताना अण्णाभाऊंना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. त्यांचे कर्तृत्व समजून घेताना जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. दहा अकरा वर्षे वयातच रोजंदारीसाठी त्यांना आई वडीलांसोबत मुंबई यावे लागते. कोणत्याही कामाला कमी न लेखना त्यांनी खाणकामगार, गिरणी कामगार अशी पडेल ती कामे केली. अवध्या दीड दिवस शिकलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या लेखनीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. मुंबईमध्ये लोकशाहिर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. अमर शेख, द.ना गव्हाणकर अशा लोकशाहिरांबरोबर अण्णाभाऊंचे नाव गाजू लागले.

अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे जाणीव. ज्या ज्या वेळी त्यांच्या हाती पेन आला तो एक तलवार होउनच. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यीक ही होऊ शकतो, हे अण्णाभाऊनी दाखवून दिले. अण्णाभाऊ साठे अमर शेख, द. ना. गव्हाणकर या शाहिरांनी आपल्या बुलंद आवाजांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आकाशच पेटवून दिले. अण्णाभाऊंची शाहिरी म्हणजे त्यांच्या हातातील तळपती तलवार होती.

अण्णाभाऊंचे एकूण साहित्य समजून घेताना त्यांची प्रस्तावना अतिशय उपयुक्त आहे. ते म्हणतात, मी जे जीवन जगतो बघतो, अनुभवतो तेच लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो यावरून त्यांच्यातील लेखक कसा महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाते पकडून होता हे दिसून येते. आधुनिक भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासात अण्णाभाऊंनी केवळ दीड दिवस शाळेत जाऊन तब्बल ३५ कादंबर्‍या, १३ कथासंग्रह १० प्रसिद्ध पोवाडे, पटकथा वगनाट्य, लावणी यांची निर्मिती केली. फकिरा, वारणेचा वाघ, पाझर, गुलाम, वैर अशा प्रसिद्ध कादंबर्‍या, कृष्णाकाठच्या कथा, गजाआड, चिरानगरीची भूत, जिवंत काडतूस असे कथासंग्रह आणि माझा राशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले. रशियाच्या 'इंडो- सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या' निमंत्रणावरून अण्णाभाऊ सन १९६१ साली राशियास गेले होते. तेथील अनुभवांवर आधारित 'माझा राशियाचा प्रवास' हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या मनावर कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या लावण्यामध्ये 'मुंबईची लावणी' व 'माझी मैना गावावर राहिली' या लावण्या अजोड आणि अविस्मरणीय आहेत. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा सुंदर पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. जग बदल घालुनी घावा सांगून गेले मज भीमराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत खुप गाजले.

अशा या थोर शिवशाहिर, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी गोरेगाव, मुंबई येथे निधन झाले. अण्णाभाऊंबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे.

                 


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.















Post a Comment

0 Comments