Subscribe Us

chavdar talyache pani | चवदार तळ्याचे पाणी

chavdar talyache pani | चवदार तळ्याचे पाणी

चवदार तळ्याचे पाणी
चवदार तळ्याचे पाणी

chavdar talyache pani | चवदार तळ्याचे पाणी

❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

चवदार तळ्याचे पाणी, 

नवशक्ति मानवा आणी.

या शक्तीमागे मूर्ती, भीमकाय देई स्फूर्ती, 

जणू मुक्यास दिधली वाणी, 

चवदार तळ्याचे पाणी.

तेजाब जलाचे झाले, 

दीनांना प्रेरित केले, 

अन्यायासाठी लढुनी, 

नवशक्ति मानवा आणी.

नाकारुन परंपरेला, 

स्वीकारुन मानवतेला, 

करुणेची आर्त विराणी, 

चवदार तळ्याचे पाणी.

आत्मभान जागे केले, 

मानवास मीपण दिधले, 

धम्मचक्र ये परतोनी, 

नवशक्ति मानवा आणी.

चवदार तळ्याचे पाणी, 

नवशक्ति मानवा आणी.

                       --अनुराधा साळवेकर

💥 कवितेचा विडियो पाहा. 👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








Post a Comment

0 Comments