Subscribe Us

he kon ge aai kavita | हे कोण गे आई

he kon ge aai kavita | हे कोण गे आई 



he kon ge aai kavita | हे कोण गे आई 


❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

नदीच्या शेजारीं । गडाच्या खिंडारीं 

झाडांच्या ओळींत । वेळूच्या जाळींत 

दिवसा दुपारीं । जांभळी अंधारी 

मोडकें देऊळ । त्यावरी पिंपळ 

कोण गे त्या ठायीं । राहतें गे आई ? || १॥

चिंचांच्या शेंड्यांना | वडांच्या दाढ्यांना 

ओढोनी हालवी । कोण गे पालवी ? 

कोण गे जोरानें । मोठ्यानें मोठ्यानें 

शीळ गे वाजवी ? पांखरां लाजवी ? 

सारखी किति वेळ । ऐकूं ये ती शीळ ? ।।२।।

वाळलीं सोनेरी । 

पानें गे चौफेरीं 

मंडळ धरोनी । नाचती ऐकोनी ! 

किती मीं पाहीलें । इतकेंची देखीलें -

झाडांच्या साउल्या । नदींत कांपल्या !

हांका मीं मारिल्या । वांकोल्या ऐकिल्या ।।३।।

उरांत धडधडे । धांवतां मी पड़ें

पळालों तेथून । कोण ये मागून ? ॥४॥

                  - भा. रा. तांबे


💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 




पहा -  dusri kavita | दुसरीची कविता

पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी 

पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी 

पहा -पाचवीच्या कविता मराठी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments