रंग जादूचे पेटीमधले कविता | rang jaduche petimadhale kavita
रंग जादूचे पेटीमधले कविता, rang jaduche petimadhale kavita
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती,
पांढऱ्यातुन निघती साती, पुन्हा पांढरे होती. ॥धृ॥
आकाशाला रंग निळा दया,
छटा रुपेरी वरति असू दया,
निळ्या अभाळी हिरवे राघू, किती पाखरे उडती ।।१।।
अवतीभवती काढा डोंगर,
त्यावर तांबुस रंग काळसर,
डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती ॥२॥
चार नेमक्या काढा रेषा,
विटाविटांच्या भिंती सरशा,
लहान-मोठ्या चौकोनांची खिडक्यादारे होती. ॥ ३॥
लाल लाल कौलारू छप्पर,
अलगत ठेवा वरती नंतर,
गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. ॥४॥
सजले आता तुमचे घरकुल,
पुढति त्याच्या पसरा हिरवळ,
पाऊलवाटेवरून तांबड्या सखेसोबती येती ॥५॥
रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती,
आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती.
- पद्मिनी बिनीवाले
💥 रंग जादूचे पेटीमधले कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments