Subscribe Us

ya bhartat bandhubhav | या भारतात कविता

ya bhartat bandhubhav | या भारतात कविता

ya bhartat bandhubhav
ya bhartat bandhubhav


ya bhartat bandhubhav | या भारतात कविता

❇️ ऐका,म्हणा, वाचा.👇

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे 

दे वरचि असा दे । 

हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे । 

मतभेद नसू दे ॥ धृ. ॥

नांदोत सुखे गरीब, अमीर एकमतानी । 

मग हिंदु असो ख्रिश्चन वा हो इस्लामी । 

स्वातंत्र्य- -सुखा या सकलांमाजि वसू दे । 

दे वरचि असा दे ॥ १॥

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना । 

हो सर्व स्थळी मिळुनि समुदाय प्रार्थना । 

उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे

दे वरचि असा दे ॥ २ ॥

हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही । 

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी । 

खळनिंदका-मनीहि सत्य न्याय वसू दे ।

दे वरचि असा दे ॥ ३ ॥

सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गियापरी । 

ही नष्ट होऊ दे विपत्ति भीति बोहरी । 

तुकड्यास सदासर्वदा सेवेत कसू दे । 

दे वरचि असा दे ॥ ४ ॥

                          - राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज

💥 कवितेचा विडियो पाहा. 👇




🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇















Post a Comment

0 Comments