Subscribe Us

आभाळमाया कविता इयत्ता चौथी | zpps tech guruji

आभाळमाया कविता इयत्ता चौथी | zpps tech guruji




आभाळमाया कविता इयत्ता चौथी | zpps tech guruji


❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

पावसा रे, पावसा रे, 

मला पावसाचे ढग बनू दे. 

डोंगर, दरी आणि शेतात, 

मला खूप कोसळू दे.

शेतकरीबाबा, शेतकरीबाबा, 

मला बी म्हणून पेरून दे. 

शेत खूप पिकून पिकून, 

तुम्हांला बरकत होऊ दे.

पणती गं, पणती गं, 

मला दिवा होऊन जळू दे. 

गरिबांच्या झोपडीत, 

उजेड मला नेऊ दे.

पक्ष्या रे, पक्ष्या रे, 

मला चोच आणि पंख फुटू दे. 

तोंडात फळे घेऊन जाऊन, 

भुकेकंगालांना वाटू दे.

परी गं, परी गं, 

मला बागेत येऊ दे. 

आनंदाने नाचगाण्यासाठी, 

साऱ्यांना आभाळमाया मिळू दे.

         - विलास सिंदगीकर


💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 




🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments