गवतफुला रे गवतफुला कविता दाखवा | gavat phula re gavat phula
![]() |
gavat phula re gavat phula |
गवतफुला रे गवतफुला कविता दाखवा, gavat phula re gavat phula
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला !
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा !
मित्रासंगे माळावरती, पतंग उडवित फिरताना
तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना,
विसरून गेलो पतंग नभिचा, विसरून गेलो मित्राला पाहुन
तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा !
हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजूंला सळसळती
नीळनिळूली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती,
तळी पुन्हा अन् गोजिरवाणी, लाल पाकळी खुलली रे
उन्हामधे हे रंग पाहता, भान हरपुनी गेले रे !
वारा घेउन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा
रात्रहि इवली होउन म्हणते, अंगाईचे गीत तुला,
मलाहि वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे
तुझ्यासंगती सदा रहावे, विसरूनि शाळा, घर सारे !
तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुजला शिकवाव्या,
आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्यासवे
'तुझे घालुनी रंगित कपडे, फूलपाखरां फसवावे !
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments