palak shikshak sangh | पालक शिक्षक समिती
![]() |
palak shikshak sangh | पालक शिक्षक समिती |
palak shikshak sangh, पालक शिक्षक समिती
शाळेत तयार करण्यात येणाऱ्या पालक-शिक्षक संघविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे 👇
5. पालक-शिक्षक संघ :
- शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक संघटनेचे सभासद असतील.
- राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत पालक-शिक्षक संघाची स्थापना करावी.
- पालक-शिक्षक संघाची स्थापना झाल्यानंतर पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पद्धतीने दोन आठवड्यांत करावी. त्यासाठी घ्यावयाच्या बैठकीची सूचना सर्व संबंधितांना परिपत्रकाद्वारे एक आठवडा अगोदर देण्यात यावी.
- शिक्षण निरीक्षक हे प्रत्येक पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पद्धतीने होईल याची खात्री करतील.
💥 पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची रचना पुढीलप्रमाणे राहील :
- अध्यक्ष - प्राचार्य / मुख्याध्यापक
- उपाध्यक्ष - पालकांमधून एक
- सचिव - शिक्षकांमधून एक
- सहसचिव (दोन) - पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
- सदस्य - पालकांमधून एक, प्रत्येक इयत्तेसाठी एक शिक्षक, प्रत्येक इयत्तेसाठी एक पालक (जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य)
- पालक सदस्यांमध्ये किमान एक मागासवर्गीय असावा. तसेच 50 टक्के महिला सदस्य असाव्यात.
- पालक-शिक्षक संघाच्या प्रतिनिधींच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या नावांची यादी शाळेच्या सूचनाफलकावर प्रदर्शित करावी.
- सर्व प्राथमिक शाळांनी पालक-शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर 15 दिवसांच्या आत सभासदांच्या नावांची यादी व कार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक यांच्याकडे सादर करावी.
- पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची मुदत दोन शैक्षणिक वर्षे राहील. कोणत्याही पालकास अथवा शिक्षकास एकदा सदस्य झाल्यानंतर त्यानंतरच्या पाच शैक्षणिक वर्षांत पदाधिकारी होता येणार नाही.
- कार्यकारी समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी.
- सर्व बैठकांची सूचना परिपत्रकाद्वारे विषयपत्रिकेसह सर्व सदस्यांना आगाऊ पाठवावी.
- बैठकीचे स्वाक्षरीत इतिवृत्त नोंदवहीत ठेवून ती नोंदवही जतन करून ठेवावी.
- शाळांना या उपक्रमासंबंधीच्या सूचनांसाठी एक स्वतंत्र सूचनापेटी उपलब्ध करून दयावी व ती शाळेत पालकांच्या दृष्टोत्पत्तीस येईल अशा भागात लावावी.
- पालक-शिक्षक संघाबाबतची सर्व परिपत्रके, शासन निर्णय, उच्च न्यायालयाचे निर्णय, इत्यादी सर्व कागदपत्रे फलकावर प्रदर्शित करावीत.
💥 पालक-शिक्षक संघाची कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतात :
1. नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे..
2. अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचवणे.
3. अभ्यासाशी पूरक असलेल्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यास शाळांना साहाय्य करणे.
4. सह शालेय उपक्रमांना मान्यता देणे..
5. विनाअनुदानित शाळांतील शिक्षण शुल्क, सत्र शुल्क व सह शालेय उपक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांसंबंधी माहिती घेऊन नोंद घेणे.
💥 पालक-शिक्षक संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवणे हा आहे. पालक शिक्षक संघाने शाळेच्या दैनंदिन कामकाज व प्रशासनात लक्ष घालणे अपेक्षित नाही.
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments