parivahan samiti | परिवहन समिती
![]() |
parivahan samiti, परिवहन समिती |
parivahan samiti, परिवहन समिती
शाळेत तयार करण्यात येणाऱ्या परिवहन समिती विषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे 👇
4. परिवहन समिती :
- सदर समितीची सभा तीन महिन्यांतून एकदा होईल. म्हणजे वर्षभरात चार सभा घ्याव्यात. प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी बैठक घेण्यात येईल.
- मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य जबाबदार असतील.
- शाळेचे सत्र सुरू होण्यापूर्वी वर्षातून दोन वेळा प्रथमोपचार उजळणी पाठ्यक्रम घेण्यास शाळेचे प्राधिकारी उत्तरदायी असतील.
- शाळेचे प्राधिकारी शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेस शाळेभोवती वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पुरेशा संख्येत वाहतूक निरीक्षक नियुक्त करतील.
- शाळेचे प्रशासक वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून आणि त्यांच्या व स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने शाळेजवळ आवश्यक ती चिन्हे आणि खुणा लावण्याची खबरदारी घेतील.
- शाळेच्या 'आत' व 'बाहेर' जाण्याच्या फाटकाजवळ 100 मीटर परिसरात शाळेचे कंत्राटी वाहन असल्याचा परवाना नसलेली कोणतीही खासगी वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी थांबण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
- किमान एम.बी.बी.एस. किंवा त्यावरील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या डॉक्टरकडून बस चालकाच्या आरोग्याचे तसेच नेत्ररोग तज्ज्ञाकडून त्याच्या दृष्टीबाबतचे योग्यता प्रमाणपत्र दरवर्षी समिती दाखल करून घेईल.
- शालेय विद्याथ्र्यांची योग्य रकमेची सर्वसमावेशक विमा पॉलिसी काढावी. विम्याच्या हप्त्यासाठी देय असणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कातून वसूल करावी.
- प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक ती औषधे वाहनात ठेवणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांचा रक्तगट आणि आणीबाणीच्या वेळी संबंधितांशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक बसमध्ये उपलब्ध ठेवावा.
- प्रत्येक स्कूलबसमध्ये एबीसी प्रकारची पाच किलो क्षमतेची आणि प्रत्येकावर आयएसआय चिन्ह असलेली दोन अग्निशामके ठेवणे आवश्यक आहे.
- प्रत्येक वाहनामध्ये वाहन चालवण्याचे लायसन्स, परवाना, पात्रता प्रमाणपत्र, पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- बस चालकाने शाळेने ठरवून दिलेले मार्ग व बस थांबे यांचे काटेकोर पालन करावे.
- मुलांकरिता बसमध्ये महिला सहाय्यक / बस-स्वच्छक ठेवले जावेत.
वाचा - shaley samitya, शाळेतील विविध समित्या
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
0 Comments