shala vyavasthapan samiti | शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य
![]() |
shala vyavasthapan samiti | शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य |
shala vyavasthapan samiti, शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य
शाळेत तयार करण्यात येणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती समितीविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे 👇
2. शाळा व्यवस्थापन समिती
( इयत्ता 1ली ते 8वी साठी )
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे अनिवार्य राहील.
💥 शाळा व्यवस्थापन समिती रचनेच्या अटी व शर्ती खालीलमाणे असतील :
(1) सदर समिती किमान 12 ते 16 लोकांची (सदस्य, सचिव वगळून) राहील.
(2) यांपैकी किमान 75% सदस्य बालकांचे आईवडील / पालक यांमधून असतील.
(अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल.
(ब) उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या मातापित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल.
(क) साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे पाहावे.
(3) उर्वरित 25% सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील :
(अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेला एक प्रतिनिधी - एक
(स्थानिक प्राधिकरण सदर सदस्यांची निवड करील.)
(ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेला एक प्रतिनिधी
(क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ज्ञ / बालविकास तज्ज्ञ एक प्रतिनिधी
(4) वरील अ.क्र. 2 मधील बालकांचे आईवडील / पालक सदस्यांमधून सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करतील.
(5) शाळेचे मुख्याध्यापक/ प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील...
(6) या समितीच्या एकूण सदस्यांपैकी 50% सदस्य महिला पालक राहतील.
💥 शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य :
अधिनियमातील कलम 22 नुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील :
(1) शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.
(2) आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे.
(3) शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
(4) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
(5) शिक्षकांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
(6) अन्य शैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही याचे सनियंत्रण करणे.
(7) बालकांची 100% पटनोंदणी व 100% उपस्थिती यांमध्ये सातत्य राहील यासाठी दक्षता घेणे.
(8) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेली मानके व निकष यांचे पालन करणे.
0 Comments