shala vyavasthapan v vikas samiti | शाळा व्यवस्थापन व विकास समिती
![]() |
shala vyavasthapan v vikas samiti | शाळा व्यवस्थापन व विकास समिती |
shala vyavasthapan v vikas samiti, शाळा व्यवस्थापन व विकास समिती
माध्यमिक शाळेत तयार करण्यात येणाऱ्या शाळा व्यवस्थापन व विकास समितीविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे 👇
3. शाळा व्यवस्थापन व विकास समितीची रचना
( इयत्ता 9 वी ते 12 वी )
💥 शाळा व्यवस्थापन व विकास समितीची रचना पुढीलप्रमाणे निर्देशित करण्यात आलेली आहे :
(1) शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील.
(2) समाजशास्त्र, विज्ञान, गणित या विषयांचे प्रत्येकी एक शिक्षक, पालकांमधून एक स्त्री व एक पुरुष, स्थानिक स्वराज्य संस्थांचे दोन, अनुसूचित जाती-जमातींमधील एक, शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजातील एक, महिला संघटना व बचत गट यांतील एक, ग्रामशिक्षण समिती / वॉर्ड यामधील एक हे या समितीचे सदस्य असतील.
(3) विज्ञान, कला यांचे प्रत्येकी एक तज्ज्ञ व शिक्षण क्षेत्रातील एक याप्रमाणे तीन परिसरातून निवडावेत.
(4) शाळेतील लेखाविषयक कामकाज पाहण्यासाठी एक सदस्य निवडावा.
(5) उपप्राचार्य किंवा सर्वांत ज्येष्ठ शिक्षक या समितीचा सदस्य सचिव राहील.
(6) या समितीस राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान कार्यक्रमासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (शाळेचे नाव) या नावाने अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त सहीचे खाते उघडावे. वरीलप्रमाणे आपल्या विद्यालयासाठी समिती तत्काळ गठित करून राष्ट्रीयीकृत बँकेत संयुक्त खाते उघडण्याची कार्यवाही करावी. सदर कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास न चुकता सादर करावा.
0 Comments