Subscribe Us

vidya samiti | विद्या समिती

vidya samiti | विद्या समिती

vidya samiti | विद्या समिती
vidya samiti | विद्या समिती

vidya samiti, विद्या समिती

शाळेत तयार करण्यात येणाऱ्या विद्या समितीविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे 👇

1. विद्या समिती (ॲकॅडेमिक कौन्सिल) : 

[माध्यमिक शाळा संहिता अनुसूचित 3 अ ( नियम 10 ब अन्वये ) ]

शाळेच्या दैनंदिन विद्याविषयक बाबींकरिता शाळा प्रमुखाला सल्ला देण्यासाठी प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेत एक विद्या परिषद असावी. शालेय शिस्त, शालेय गुणवत्ता व एकंदरीत चांगल्या शैक्षणिक वातावरणनिर्मितीसाठी ही समिती फार उपयुक्त ठरते. 

💥 विद्या समितीमध्ये खालीलप्रमाणे सदस्य असतील :

(अ) मुख्याध्यापक हा या समितीचा अध्यक्ष असेल.

(ब) कायम शिक्षकांचे प्रतिनिधी :- या प्रतिनिधींची संख्या शाळेच्या आकाराप्रमाणे तीन ते पाच राहील. यांची निवड वार्षिक निवडणुकांनी होईल. या प्रतिनिधींत पुढील तीन प्रकारच्या शिक्षकांमधून किमान एक तरी सदस्य असला पाहिजे.

(1) 14 वर्षांच्या कायम सेवेहून अधिक सेवा झालेले शिक्षक

(2) 8 ते 14 वर्षांची कायम सेवा झालेले शिक्षक

(3) 8 वर्षांहून कमी कालावधीची कायम सेवा झालेले शिक्षक

शिक्षकांच्या प्रतिनिधीची निवड पसंतीप्रमाणे मतदान पद्धतीनुसार केली जाईल..

(क) शाळा समितीने नामनियुक्त केलेली शिक्षक नसलेली व्यक्ती.

(ड) शाळेच्या पालक संघटनेचा अध्यक्ष.

विद्या परिषदेच्या एकूण सदस्यांची संख्या आठहून अधिक असणार नाही.

💥 विद्या समितीचे कार्य :

'विद्या परिषदे'च्या बैठका या शाळा प्रमुख ठरवून देतील त्याप्रमाणे नियत कालावधीनंतर वारंवार होतील आणि त्या बैठकीमध्ये पुढील कार्य केले जाईल :

(अ) शाळेच्या अभ्यासाच्या प्रगतीवर चर्चा करणे.

(ब) शाळेच्या शैक्षणिक व वित्तीय गरजा शाळा समितीच्या नजरेस आणून देणे. 

(क) शाळेच्या शैक्षणिक कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी शाळा प्रमुखांकडे किंवा शाळा समितीकडे शिफारशी करणे.. 

(ड) शाळेच्या अंतर्गत प्रशासनाशी व विद्यार्थ्यांतील शिस्तीशी संबंधित बाबींवर शाळा समितीला व शाळा प्रमुखाला सल्ला देणे.. 

(ई) शाळेचा अर्थसंकल्प, विशेषतः शाळेची साधनसामग्री, ग्रंथालयातील पुस्तके अशी उपसाधने यांच्या खरेदीच्या संबंधात शाळा समितीला शिफारशी करणे.

(फ) शाळा समितीने किंवा शाळा प्रमुखाने समितीकडे सोपवलेल्या इतर कोणत्याही बाबी. 

टीप : 'विद्या परिषद' ही मुख्यतः शाळेच्या विद्याविषयक प्रश्नांवर सल्ला देणारी निव्वळ सल्लागार समिती होय.

वाचा - shaley samitya, शाळेतील विविध समित्या 

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇









Post a Comment

0 Comments