Subscribe Us

jagtik andh din | जागतिक अंध दिन माहिती

jagtik andh din | जागतिक अंध दिन माहिती

jagtik andh din, जागतिक अंध दिन माहिती

आज, 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंध दिन- पांढरी काठी दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. 

डोळ्‍यावर काळा चष्मा अन् हातात पांढरी काठी घेऊन रस्ता ओलांडणारे, चालत्या रेल्वेत खेळणी विकणारे अंध बांधव आपण पहातो. त्यांच्या हातातली वरचा भाग लाल व खालच्या बाजूला पांढरी असलेली 'पांढरी काठी'च आता यांची 'जीवनरेखा' (Life Line) म्हणून राहिली आहे. अंध बांधवांना अंधःकारमय जीवनातून मार्ग काढण्यासाठी 'पांढरी काठी' ही 'नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड' (नॅब) या समाजसेवी संस्थेने बहाल केली आहे. अंध व्यक्तींना दिशा दाखविण्याचे काम ही पांढरी काठी करते. समाजाला अधिक संवेदनाक्षम, सहृदय होण्याचा एकप्रकारे संदेश ही 'पांढरी काठी' देत असते.

पांढर्‍या काठीचा उपयोग

चढउतार, दगडधोंडे, खाचखळगे, कुत्रे, मांजर असे प्राणी, बसलेली-झोपलेली माणसे असे काठीच्या परीक्षेत्रात येणारे सगळेच अडथळे पार करता येतात.

पांढर्‍या काठीची गोष्ट

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर डॉ. रिचर्ड व्हुव्हर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी सोयीची पडेल अशी विशिष्ठ स्वरूपाची काठी तयार केली. ती काठी हुव्हर केन म्हणून ओळखली गेली. 1921 मध्ये मध्ये ब्रिस्टलचे फोटोग्राफर जेम्स विंग्ज यांना अपघातात अंधत्व आले. तेव्हा गडद रंगांच्या काठय़ा घेऊन फिरताना वाहनचालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणे कठीण जाते. हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल, असा पांढरा रंग आपल्या काठीला दिला.

'डोळा' हा अवयव शरीरात असूनही तो निकामी झालेल्या या मंडळींसाठी 'पांढरी काठी' म्हणजे त्यांना लाभलेले एक अवयवच आहे. अंधबांधवांचा खचलेला आत्मविश्वास या 'पांढरी काठी'ने वाढविला आहे. आता तर ती त्यांची आयुष्याची साथीदार झाली आहे.

   गेल्या काही वर्षांपूर्वी अंध व्यक्तीला कुणाच्या तरी आधाराची गरज भासत होती. कारण एकच की, त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव ! मात्र 6 ऑक्टोबर, 1964 ला हा दिवस 'पांढरी काठी सुरक्षा दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आणि जगभरातल्या बहुतेक देशांनी आपापले स्वतंत्र कायदे करून पांढर्‍या काठीला अंधांची 'आयडेंण्टिटी' म्हणून मान्यता दिली. 15 ऑक्टोबर हा दिवस जगभर 'पांढरी काठी सुरक्षा दिवस' म्हणून साजरा होऊ लागला. 

आज साधारणपणे छातीपर्यंत उंचीची, एकसंघ किंवा घडीची पांढरी काठी हातात घेतल्यामुळे पुढे येणारे चढउतार, दगडधोंडे, खाचखळगे, कुत्रे-मांजर असे प्राणी, बसलेली-झोपलेली माणसं असे काठीच्या परिक्षेत्रात येणारे सगळेच अडथळे त्या अडथळ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच काठीमुळे त्यांच्या सहज लक्षात येतात. परिणामी घरातून बाहेर पडणार्‍या या व्यक्तींना शाळा- कॉलेज, नोकरीव्यवसायाच्या ठिकाणी, बाजार किंवा हव्या असलेल्या ठिकाणी जाऊन इच्छित कार्य साध्य करणं आता या पांढर्‍या काठीमुळे सहजशक्य झालं आहे.

अंध बांधवांना 'संवेदना' हेच विशेष इंद्रिय परमेश्वराने बहाल केले आहे. अशा व्यक्तींना दिसत नाही, मात्र ते अतिशय सूक्ष्म आवाज-स्वर कानाने ऐकू शकतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रयाने -नाकाने परिसराचा वास घेवू शकतात आणि अचूक स्मरणातही ठेऊ शकतात. दृष्टी नसल्याने निसर्गाने त्यांना जणू जास्त संवेदनेचे विशेष इंद्रिय बहाल केलेले असावे. टाचणी वा सुई खाली पडली तरी त्यांना तिचा आवाज येऊ शकतो. त्वचा, नाक, कानाचा सहाय्याने ते परिसराची माहिती देऊ शकतात. उदा. रेल्वेगाडीचा वेग कमी झाला की पुढे स्टेशन येणार हे ते सहज ओळखतात. काठीच्या आधाराने ते रस्ता खडबडीत आहे की, दलदल हेही ते ओळखतात. एखाद्या वनस्पतीच्या, रसायनाच्या विशिष्ट वासावरून आपण याच भागात पुन्हा वा परत आलो आहोत, हे ते सांगू शकतात. अंध मुले-मुली ‘सेंटर लेथ’ मशिनवर या ऍल्युमिनियम पाईपची निर्मिती करतात. मुंबई, पुणे, नाशिक, डेहराडून आदी ठिकाणी त्याचे कारखाने आहेत.

पांढऱ्या काठीने चालण्या-वागण्यातली स्वयंपूर्णता अंध बांधवांना दिली. मात्र जगण्यासाठी आथिर्कदृष्ट्या स्वयंपूर्ण होणंही तितकेच महत्त्वाचं असतं. यासाठीच 1995 मध्ये अपंग कायद्यानुसार ज्या प्रमाणे अपंगांना शासकीय नोकर्‍यांमध्ये तीन टक्के आरक्षण जाहीर झाल आहे. त्यात १० टक्के अंधांसाठी आरक्षित आहे. 

डोळयांमुळेच आज आपल्याला ह्या सृष्टीतील निसर्गाने निर्माण केलेले प्रत्येक सौंदर्य पाहता येते आहे. त्याला अनुभवता येते आहे. म्हणून आपले डोळे हे निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी अणि अनमोल देणगी आहे. 

ह्या जगात सगळयांनाच हे नशीब प्राप्त होत नसते ह्या जगात असेही काही मुले, मुली,आहेत ज्यांची लहानपणीच एखाद्या अपघातात आपली दृष्टी गेली आहे किंवा ते जन्मतच अंध आहेत. त्यांना ह्या सृष्टीचे सौंदर्य बघायचे आहे. अनुभवायचे आहे. पण त्यांच्या डोळयांची दृष्टी गेल्याने त्यांना हे सर्व करता येत नाही. निसर्गाच्या ह्या अनमोल सौंदर्याचा आनंद उपभोगता येत नाही.

अशाच काही गरजु मुलामुलींना पुन्हा हे जग पाहता यावे त्यांना देखील सृष्टीच्या सौंदर्याचा अनुभव घेता यावा यासाठी जगातील इतर व्यक्तींनी अशा गरजु मुलामुलींना आपल्या मृत्युनंतर आपले नेत्र दान करून मदत करावी याकरीता जनजागृती जागतिक दृष्टि दान दिनी म्हणजेच 10 जुन रोजी केली जाते.

जागतिक दृष्टिदान दिवस केव्हा आणि कधी साजरा केला जातो ?

जागतिक दृष्टि दान दिन दरवर्षी 10 जुन रोजी संपुर्ण जगभरात आंतरराष्टीय स्तरावर साजरा केला जातो.

जागतिक दृष्टि दान दिवस का साजरा केला जातो ?

संपूर्ण जगभरात लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी,लोकांना नेत्रदानाचे महत्व पटवून देण्यासाठी,नेत्रदान करणे का गरजेचे आहे हे लोकांना समजावून सांगण्यासाठी दरवर्षी 10 जुन रोजी जागतिक पातळीवर जागतिक दृष्टि दान दिवस हा साजरा केला जातो.मित्रांनो ह्या जगात अशी अनेक गरजु मुले मुली आहेत ज्यांचे डोळे नाहीये अशा अंध मुलामुलींना पुन्हा हे जग पाहण्याची संधी प्राप्त व्हावी त्यांना देखील ह्या सृष्टीच्या सौंदर्याचा अनुभव घेता यावा,त्यांना देखील आपल्या डोळयांनी ही सुंदर सृष्टी बघता यावी.यासाठी जगातील इतर व्यक्तींनी अशा गरजु मुला मुलींना आपल्या मृत्युनंतर आपले नेत्र दान करून मदत करावी याकरीता जनतेत जागृती करण्यासाठी दरवर्षी 10 जुन रोजी जागतिक पातळीवर हा जागतिक दृष्टी दान दिन साजरा केला जातो.

जागतिक दृष्टीदान दिवस साजरा करण्याचे महत्वाचे मुख्य उददिष्ट कोणते आहे ?

महाराष्टातील अत्यंत प्रसिदध नेत्ररोगतज्ञ यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देखील हा दृष्टीदान दिवस साजरा केला जातो.

जागतिक दृष्टि दान दिवस कसा साजरा केला जातो ?

● दरवर्षी 10 जुन रोजी जागतिक दृष्टि दान दिनी जनतेला नेत्रदानाचे महत्व सांगितले जाते.

● आपण नेत्रदान का करायला हवे याची आवश्यकता का आहे ? आणि किती आहे हे लोकांना समजावून सांगितले जाते.

● लोकांना नेत्रदान करण्यासाठी प्रेरित तसेच प्रोत्साहित केले जाते.

● एखादे शिबिर आयोजित करून यादिवशी गरजु मुलामुलींना नेत्रदान केले जाते.

● आपण एखाद्या अंध व्यक्तीला आपले डोळे दान करून कसे त्याच्या अंधारमय जीवणात प्रकाश निर्माण करू शकतो याची जाणीव विविध कार्यक्रम,उपक्रम राबवून त्यादवारे लोकांना यादिवशी करून दिली जाते.आणि हे कार्य करण्यासाठी आज समाजात अनेक संस्था संघटना कार्यरत देखील आहे.

● आपण गरज मुलामुलींना आपले नेत्रदान करून कशापदधतीने देशाच्या भवितव्याचे रक्षण करू शकतो कशी समाजाची सेवा करु शकतो कसा आपला घेतलेला एक चांगला निर्णय एखाद्याचे आयुष्य बदलु शकतो हे सांगण्यात येते.

आपण नेत्रदान कसे करावे ?

सगळयात आधी जवळच्या दवाखान्यात आय बंँकेमध्ये जाऊन नेत्रदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी.मग जेव्हा आपला मृत्यु होतो तेव्हा त्या आयबँक मध्ये कळवले जाते मग काही पाच सहा तासात ही नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली जात असते.

आपल्या मृत्युनंतर आपले डोळे काढुन एखाद्या गरजु अंध व्यक्तीला दिले जात असतात.

नेत्रदान करण्याचे फायदे तसेच महत्व कोणकोणते आहे ?

● आज जगभरात लाखो लोक मरण पावतात त्यातील प्रत्येकाने जर मृत्युपुर्वी नेत्रदानासाठी आपली नाव नोंदणी केली आणि मरणानंतर आपले डोळे एखाद्या अंध गरजु व्यक्तीला दिले तर जगात अंधारामध्ये जीवन जगत असलेल्या अनेकांच्या जीवणात प्रकाश निर्माण होईल.जगात अंधव्यक्तींच्या असलेल्या अमाप संख्येत घट होईल.जगातील सर्व अंधांच्या जीवणाला प्रकाश मिळेल.

● आपल्या देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य असणारया अनेक अंध मुलामुलींच्या चिमुरडयांच्या जीवणात प्रकाशाची लाट येईल आणि त्यांना देखील आपले आणि देशाचे भवितव्य घडवता येईल.

आपले नेत्रदान कोण करू शकते ?

● कुठलीही व्यक्ती आपले डोळे दुसरयाला दान करु शकते. यासाठी वयाचे देखील कुठलेच बंधन ठेवण्यात आलेले नाहीये.

कोणाला नेत्रदान करता येत नाही?

● अशी व्यक्ती जिला एडस असेल तसेच एखादे ब्लड इन्फेकशन असेल अशी व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.

भारतात तसेच जगभरात नेत्रदान करत असलेल्यांची संख्या अजुनही कमी असल्याचे मुख्य कारण काय आहे?  आज भारतात तसेच इतर देशात देखील नेत्रदान करत असलेल्या व्यक्तींची संख्या खुप कमी असलेली आपणास दिसुन येते आणि याचे मुख्य लोकांमध्ये नेत्रदानाविषयी पाहिजे तेवढी सामाजिक जागृकता निर्माण झालेली नाहीये.

लोकांना अजुनही नेत्रदानाचे महत्व समजलेले नाहीये.नेत्रदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे हे अद्यापही लोकांनी मान्य केलेले नाहीये.म्हणजेच नेत्रदानाच्या ह्या मोहीमेला पाहिजे तसा प्रतिसाद जनतेकडुन अजुनही मिळताना दिसून येत नाहीये.हेच कारण आहे की लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी दरवर्षी हा नेत्रदान दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो. 

ब्रेल लिपीची भेट देणारे लुईस ब्रेल 

यांचा जन्मदिन ४ जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. ते स्वत: अंध होते आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी हा शोध लावला. भाषेचा आविष्कार ही जगातील मानवाच्या विकासातील मोठी उपलब्धी होती. जगात हजारो भाषा आहेत परंतु लोकांना त्यांच्या संशोधकांबद्दल माहिती नाही, सर्व भाषा कालांतराने विकसितही झाल्या. लुईस ब्रेल यांनी स्वत: एका भाषेचा शोध लावला ज्याने केवळ इतिहासात स्थान निर्माण केले नाही तर ती मानवतेला अनोखी देणगी मानली जाईल. जगातील अंधांना ब्रेल लिपीची भेट देणारे लुईस ब्रेल यांचा जन्मदिन ४ जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जात आहे.

स्वतः होते अंध

ब्रेल भाषेकडे जगातील सर्व अंध लोकांसाठी वरदान म्हणून पाहिले जाते. जेव्हा त्याचा शोध लावणारे लुईस ब्रेल किंवा लुई ब्रेल यांनी याचा शोध लावला, तेव्हा ते स्वत: अंध होते आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी हा शोध लावला. अशक्य वाटणाऱ्या या कामामागील कथाही काही कमी मनोरंजक नाही. 

वयाच्या ८व्या वर्षी गेली दृष्टी

लुईस ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्समधील कूपर नावाच्या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. फादर सायमन रेले ब्रेल यांनी शाही घोड्यांसाठी खोगीर आणि जिन्स बनवले. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या तिसर्‍या वर्षी लुईसला आपल्या वडिलांच्या कामात मदत करावी लागली. याच दरम्यान एका अपघातात त्याच्या एका डोळ्यात चाकू घुसला आणि त्याचा डोळा खराब झाला, पण हळूहळू त्याची दुसरी दृष्टीही जाऊ लागली आणि योग्य उपचार न मिळाल्याने वयाच्या ८ व्या वर्षी लुईस पूर्णपणे आंधळा झाले.

अंधांसाठीच्या शाळांमध्ये प्रवेश

यानंतर, प्रसिद्ध फ्रेंच धर्मगुरू बॅलान्टे यांच्या मदतीने लुई ब्रेल यांनी अंधांसाठीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवला. वयाच्या १२ व्या वर्षी लुईस यांना कळले की लष्करासाठी अशी कोड लँग्वेज तयार करण्यात आली आहे, जी अंधारातही संदेश वाचू शकते. लुईस यांना असे वाटले की ही लिपी अंध लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याच्या विनंतीनुसार, त्यांची कॅप्टन चार्ल्स बार्बरला भेट करून दिली, ज्यांनी ही लिपी विकसित केली. यानंतर लुईस यांनी अंधांसाठी ही लिपी विकसित करण्याचे काम सुरू केले.  

मान्यता मिळण्यासाठी अडचणी

लुई ब्रेल यांनी ८ वर्षांच्या मेहनतीने या सांकेतिक भाषेत अनेक बदल केले आणि १८२९ पर्यंत सहा मुद्यांवर आधारित त्यांची लिपी तयार झाली, परंतु या लिपीला मान्यता मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांची ब्रेल लिपी शिक्षणतज्ञांनी ओळखली नाही. इतकेच नाही तर ही लिपी हळूहळू अंध लोकांमध्ये लोकप्रिय होत होती, परंतु लिपीला अधिकृत मान्यता मिळताना दिसत न्हवती. इतकेच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनीच त्यांच्या भाषेला मान्यता मिळाली.

ब्रेल लिपी हा कोडचा प्रकार

ब्रेल लिपी ही खरे तर कोडचा एक प्रकार आहे. याकडे अनेकदा भाषा म्हणून पाहण्याची चूक होते. पण अंतर्गत उठलेल्या ठिपक्यांपासून एक कोड बनवला जातो, ज्यामध्ये ६ बिंदूंच्या तीन ओळी असतात. यामध्ये संपूर्ण प्रणालीचा कोड दडलेला आहे. हे तंत्रज्ञान आता संगणकामध्ये देखील वापरले जाते, ज्यात गोलाकार आणि वाढलेले बिंदू आहेत, ज्यामुळे अंध लोक आता तांत्रिकदृष्ट्या काम करू शकतात.

शंभर वर्षानंतर केला सन्मान 

लुईस ब्रेलच्या मृत्यूनंतरचे वर्ष, २० जून १९५२ हा त्यांचा सन्मान दिवस म्हणून निश्चित करण्यात आला. त्यांच्या गावात शंभर वर्षांपूर्वी पुरलेल्या त्यांच्या मृतदेहाचे अवशेष पूर्ण शासकीय सन्मानाने बाहेर काढण्यात आले आणि स्थानिक प्रशासन आणि लष्कराने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल माफी मागितली आणि त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले. संस्कार केले गेले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नोव्हेंबर २०१८ रोजी अधिकृतपणे ४ जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ४ जानेवारी २०१९ रोजी पहिला जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यात आला.


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇





Post a Comment

0 Comments