Subscribe Us

सूर्यमाला मराठी माहिती | suryamala marathi mahiti

सूर्यमाला मराठी माहिती | suryamala marathi mahiti व्हिडिओ पहा👇


सूर्यमाला मराठी माहिती | suryamala marathi mahiti

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र, ५ बटु ग्रह (प्लूटो सकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
सर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपण ज्याला सूर्य म्हणतो त्या ताऱ्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे चंद्र आणि इतर गोष्टी मिळून सूर्यमाला तयार होते. आपली पृथ्वी या सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यमालेत सर्व ग्रह त्यांच्या भोवती फिरणाऱ्या उपग्रहांना म्हणजेच चंद्रांना घेऊन सूर्याभोवती गोल फिरतात.
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, पृथ्वी, दोन अंतर्ग्रह- शुक्र व बुध, अन्य ग्रह, मंगळ व गुरू यांमधील लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र हे अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.

हे पण वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी

हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list

हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी

सूर्यमाला मराठी माहिती | suryamala marathi mahitiसूर्यमाला मराठी माहिती | suryamala marathi mahiti


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Post a Comment

0 Comments