Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी | solar system planets in marathi
माहिती |
लिंक |
सूर्य |
|
बुध |
|
शुक्र |
|
पृथ्वी |
|
मंगळ |
|
गुरु |
|
शनी |
|
युरेनस |
|
नेपच्यून |
|
चंद्र |
|
खगोलशास्त्र समिती PDF |
हे पण वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी
खगोलशास्त्र संबंधी PDF डाऊलोड करा👇👇👇
🌀 Astronomy Club ची उद्दिष्टे :-👇
1.शालेय जीवनामध्ये खगोलशास्त्राची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. 2. आपली सूर्यमाला ग्रह, तारकांचा समूह ताऱ्यांचा जन्म तान्यांमधील अंतर यांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे.
3. खगोलशास्त्रातील भविष्य, भविष्यातील विविध संधी याबद्दल अधिक माहिती मिळवणे.
4. अवकाशात घडणाऱ्या घटना विषयी समाजात असलेले गैरसमज दूर करणे.
5. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
6. खगोल शास्त्रातील मूलभूत संकल्पना समजून घेणे,
7. निरीक्षणशक्ती, चिकित्सक दृष्टी, सर्जनशील विचार, सहकार्य , निष्कर्षक्षमता, इतरांचा आदर, गटकार्य इत्यादी कौशल्यांचा विकास करणे.
.🔰 खगोलशास्त्र समिती :-
इयत्ता तिसरीपेक्षा वरचा वर्ग असणाऱ्या, विज्ञान विषय असणाऱ्या शाळेमध्ये खगोलशास्त्र समिती असावी असं सुचविण्यात आलेले आहे.
🌀 खगोलशास्त्र समिती रचना/ Astronomy Club :-👇
➡️ विज्ञान विषय असणाऱ्या शाळेमध्ये खगोलशास्त्र समिती असावी असं सुचविण्यात आलेले आहे.
➡ त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, इतर शिक्षक, पालक प्रतिनिधी, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी, विद्यार्थिनी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिनिधित्व देऊन खगोलशास्त्र क्लबची निर्मिती करण्यात येत असते.
➡ खगोलशास्त्र समितीची स्थापना करण्यासाठी स्वतंत्र खोली असल्यास उत्तमच परंतु स्वतंत्र खोली नसेल तर एखाद्या वर्गातही ही समिती आपण स्थापन करू शकतो.
🔰 खगोलशास्त्र क्लब अंतर्गत घ्यावयाचे उपक्रम :-
➡️ 14 जानेवारी-भूगोल दिन
➡️ 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
➡️ 22 मार्च संपात दिन (वसंत संपात दिन)
➡️ 22 एप्रिल पृथ्वी दिन/ वसुंधरा दिन Earthday
➡️ 5 जून जागतिक पर्यावरण दिन
➡️ 21 जून (सर्वात मोठा दिवस)
➡️ 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस
➡️ 23 सप्टेंबर संपात (शरद संपात दिन)
➡️ 22 डिसेंबर (सर्वात मोठी रात्र )
➡️ खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती चंद्रग्रहण, सूर्यग्रहण जागतिक खगोल महिना (एप्रिल)
➡️ सुपरमून, शून्य सावली दिन, पिधान इत्यादी प्रासंगिक महत्त्वपूर्ण खगोलीय घटना
➡️ आठवड्यातील एक दिवस ओळख विश्वाची कार्यक्रम घेणे त्यामध्ये खगोलीय संकल्पना स्पष्ट करणे.
➡️ Sky Week अर्थात अवकाश निरीक्षण सप्ताह 23 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर साजरा करणे. यात विविध ऍक्टिव्हिटी घेणे.
➡️ सूर्योदय, सूर्यास्त त्यांचे स्थान इत्यादीबाबत निरीक्षण करून माहितीचे संकलन करणे.
➡️ शिक्षक आपल्या कल्पनेनुसार विविध उपक्रम घेऊ शकतात.
➡️ टेलिस्कोप असल्यास चंद्र, मंगळ, शुक्र या ग्रहांचे निरीक्षण, तारकासमूह निरीक्षण करणे.
हे पण वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी
हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध
हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list
हे पण वाचा 👉 परमवीर चक्र विजेता लिस्ट
![]() |
ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी | solar system planets in marathi
0 Comments