Subscribe Us

गुरू ग्रह माहिती मराठी | guru graha marathi mahiti

गुरू ग्रह माहिती मराठी | guru graha marathi mahiti 

व्हिडिओ पहा👇


गुरू ग्रह माहिती मराठी | guru graha marathi mahiti 

गुरू (Jupiter) (किंवा बृहस्पती) हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना जोव्हियन प्लॅनेट्स ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते.

गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना "जोव्हियन प्लॅनेट्स" ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते. गुरू या शब्दाचा अर्थ शिक्षक असाही होतो, तसेच गुरुवार नावाचा आठवड्याचा एक दिवस पण असतो .पासून खगोलशास्त्रज्ञांना गुरू माहीत होता. अनेक संस्कृतींच्या पौराणिक व धार्मिक कथांमध्ये गुरूचा उल्लेख आढळतो. प्राचीन रोमवासीयांनी रोमन देव ज्युपिटर याच्यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव दिले होते. पृथ्वीवरून बघितले असता गुरूची दृश्यप्रत (apparent magnitude) −२.८ पर्यंत पोहोचू शकते. तेव्हा गुरू हा चंद्र व शुक्रानंतरचा आकाशातील सर्वाधिक प्रकाशमान ग्रह बनतो. (परंतु मंगळाची तेजस्विता त्याच्या कक्षाभ्रमणाच्या काही काळासाठी गुरूपेक्षा जास्त होते).

गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा आणि सर्वात मोठा ग्रह आहे, त्याचे वस्तुमान 1.90 x 1027 kg आणि सरासरी व्यास 139,822 किमी आहे. यालाच जुपिटर आणि बृहस्पति असे म्हणतात. गुरु हा सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह आहे आणि अलीकडच्या काळात या ग्रहाविषयी अधिक महत्त्वाची माहिती शोधण्यासाठी अनेक अवकाश कार्यक्रम सुरू झाले आहेत.

पृथ्वीच्या चंद्र आणि शुक्रानंतर, रात्रीच्या आकाशात चमकणारा गुरू हा तिसरा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.या ग्रहाचा अंतर्गत व्यास: 139,822 किमी आणि ध्रुवीय व्यास 133,709 किमी आहे.गुरूचे वातावरण आणि पृष्ठभाग प्रामुख्याने हायड्रोजन, हेलियम आणि इतर द्रवपदार्थांनी बनलेला आहे.शास्त्रज्ञांनी वायू ग्रहांच्या श्रेणीत ठेवले आहे. कारण या ग्रहाचा पृष्ठभाग विविध वायूंनी व्यापलेला आहे.

असे मानले जाते की गुरू ग्रह प्रथम 7 व्या किंवा 8 व्या शतकात शोधला गेला होता. बॅबिलोनियन खगोलशास्त्रज्ञांनी त्याला शोधला होते. गुरू ग्रहाला The Great Red Spot म्हणून सुद्धा ओळखतात. गुरू ग्रहाला पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकते. गुरूला एकूण 79 चंद्र आहेत, त्यापैकी 4 चंद्र 1610 मध्ये गॅलिलिओ गॅलीलीने शोधले होते आणि त्यांचा आकार एकूण 79 चंद्रांपैकी सर्वात मोठा आहे, ज्यांना गॅलिलिओ उपग्रह म्हणूनही ओळखले जाते.

गुरू ग्रह हा पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशातील चौथी ठळक वस्तू आहे. मात्र क्वचित कधीकधी मंगळ गुरूपेक्षा जास्त ठळक दिसतो. सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट असले तरीही सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे. गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या ३१८ पट असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे. त्याचे एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सूर्यमालेच्या उत्क्रांतीवर बराच प्रभाव आहे. उदाहरणार्थ सर्व ग्रहांच्या (अपवाद बुध ग्रहाची कक्षा) या गुरूच्या कक्षेशी मिळत्या जुळत्या आहेत; बरेचसे कमी परिभ्रमण कालावधी असणारे धूमकेतू हे गुरूभोवती परिभ्रमण करतात; लघुग्रह पट्ट्यामध्ये असणाऱ्या कर्कवुड फटी (Kirkwood gaps) या गुरूमुळेच आहेत. सूर्यमाला निर्मितीनंतर बऱ्याच काळानंतर अंतर्ग्रहांवर झालेल्या अशनी वर्षावाला गुरू ग्रहच कारणीभूत आहे. काहीजण सूर्यमालेचे वर्णन सूर्य, गुरू व इतर तुकडे असे करतात. 

अणूंच्या संख्येनुसार गुरूचे वातावरण सुमारे ९०% हायड्रोजन व १०% हेलियमने बनलेले आहे. गुरू ग्रहाच्या वातावरणात मिथेन, पाण्याची वाफ, अमोनिया व खडक यांचे अंश आहेत. या व्यतिरिक्त कार्बन, इथेन, हायड्रोजन सल्फाइड, निऑन, ऑक्सिजन, फॉस्फिन व गंधक यांचेही अंश आहेत. बाह्य वातावरणात अमोनियाचे स्फटिकही आढळून आले आहेत. अवरक्त किरण व अतिनील किरणांच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासाने बेन्झिन व अन्य कर्बोदक यांचेही अस्तित्व सापडले आहे. हे वातावरण शनी ग्रहाशी अत्यंत मिळतेजुळते आहे. पण युरेनस व नेपच्यून यांचे वातवरण मात्र थोडे वेगळे आहे, त्यांच्यामध्ये हायड्रोजन व हेलियमचे प्रमाण कमी आहे.

हे पण वाचा ➡️ पृथ्वी ग्रहाची माहिती मराठी 

हे पण वाचा ➡️ शुक्र ग्रहाची माहिती मराठी.

हे पण वाचा ➡️ बुध ग्रह माहिती मराठीत 

हे पण वाचा ➡️ मंगळ ग्रह विषयी माहिती 

हे पण वाचा ➡️ शनी ग्रहाविषयी माहिती मराठी 

हे पण वाचा ➡️ सूर्याची माहिती दाखवा

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇



Post a Comment

0 Comments