सूर्याची माहिती दाखवा | sun information in marathi
व्हिडिओ पहा👇
सूर्याची माहिती दाखवा, sun information in marathi.
सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.
सूर्याला पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा महणून ओळखले जाते तसेच सूर्य आपल्या जीवनासाठी अवश्यक असणारा प्रकाश आणि उष्णता पुरवते आणि त्यामुळेच पृथ्वीवरील जीवन बहरते. सौर मंडळातील दुसऱ्या ताऱ्यांशी तुलना केली तर सूर्य हा सर्वात मोठा तारा आहे ज्याचे वस्तुमान ९९.८ % इतके आहे आणि पुथ्वीपेक्षा १०९ पट मोठा आहे. या सूर्याचा व्यास १३,९०,००० आहे आणि हा हायड्रोजन आणि हिलीयम पासून बनलेला आहे. सूर्य हा सौर मंडळातील महत्वाचा भाग असून सौर मंडळाचा केंद्र बिंदू आहे आणि सर्व तारे आणि पृथ्वी सुद्धा त्याच्याभोवती फिरते.
सूर्याची निर्मिती कशी झाली ? How was the sun formed ?
सूर्याची निर्मिती बहुतेक ४.५ अरब वर्षा अगोदर झाली. बरेच शास्त्रज्ञ असे मानतात कि सौर मंडळाची निर्मिती महाकाय अश्या फिरणाऱ्या मॉलुक्युल गॅसचा ढग ज्याला आपण नेभ्यूला ( nebula) असे म्हणतो. तो गुरुत्वाकर्षनामुळे ढासळला आणि मग ते वेगाने फिरू लागले त्यानंतर ते डिस्क सारख्या चपट्या आकाराचे झाले आणि ते फिरत असतान काही भाग मध्य भागी सूर्याची निर्मिती करण्यासाठी ओढून घेतला गेला.
सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. सूर्याचे सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. सूर्याच्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे सूर्याच्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी सूर्य एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू (White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.
सूर्य हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. सूर्याला स्वतःचे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. सूर्याच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर सौरडाग (Sunspots) व सौरज्वाला (Solar flames) तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. सूर्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्वहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे "अरोरा" (Aurora) हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.
सूर्याची सर्वसामान्य माहिती :-
सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्याच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ५५०० केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. त्याच्या वर्णपटामध्ये आयनीभूत व निष्क्रिय धातूंच्या रेषा आहेत. "V" म्हणजे सूर्य हा बहुतेक इतर ताऱ्यांसारखा "मेन सिक्वेन्स" मधील तारा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून आहे त्यामुळे तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. आपल्या आकाशगंगेत १०० दशलक्षापेक्षाही अधिक तारे "G2" वर्गात मोडतात. लोगॅरिथमिक आकारमान वर्गीकरणावरून सूर्य आकाशगंगेतील ताऱ्यापेक्षा ८५% जास्त तेजस्वी आहे. बाकीचे बरेच तारे हे लाल बटू आहेत. सूर्य १००० कोटी वर्षे मेन सिक्वेन्समधील तारा राहील. त्याचे सध्याचे वय हे ताऱ्यांची उत्पत्ती व अणुकेंद्रीय विश्वरचनाशास्त्र यांची संगणकीय मॉडेल्स वापरून जवळजवळ ४५.७ लक्ष इतके निश्चित केले आहे. सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्रापासून २५,००० ते २८,००० प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या केंद्राला प्रदक्षिणा घालत असतो. एक प्रदक्षिणा सुमारे २२.५ ते २५ कोटी वर्षांनी पूर्ण होते. त्याचा प्रदक्षिणेतील वेग सेकंदाला २२० किलोमीटर इतका आहे, म्हणजेच १४०० वर्षांमध्ये तो एक प्रकाशवर्ष अंतर पार करतो. तर एक खगोलशास्त्रीय एकक (Astronomical Unit) अंतर ८ दिवसांमध्ये पार करतो. सूर्य हा तिसऱ्या पिढीमधील तारा असून त्याचा जन्म हा जवळच्या एखादया ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे झाला आहे. सोने व युरेनियम यासारख्या जड मूलद्रव्यांचा सूर्यमालेतील भरपूर आढळ याला पुष्टी देतो. ही मूलद्र्व्ये एक तर ताऱ्याच्या स्फोटाच्यावेळी होणाऱ्या आण्विक प्रक्रियांमुळे किंवा द्वितीय पिढीतल्या ताऱ्यामध्ये न्यूट्रॉन कण शोषले जाऊन झालेल्या अणुबदलांमुळे तयार झाली असावीत. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही. त्याऐवजी ४०० ते ५०० कोटी वर्षांनी तो लाल राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल. त्याचे हायड्रोजन इंधन संपल्याने बाह्यावरण प्रसरण पावेल तर केंद्र आकुंचन पावेल व गाभ्याचे तापमान खूपच वाढेल. गाभ्याचे तापमान ३०० कोटी केल्व्हिन इतके झाल्यावर हेलियममध्ये अणू-संमेलन क्रिया सुरू होईल.
हे पण वाचा ➡️ शनी ग्रहाविषयी माहिती मराठी
हे पण वाचा ➡️ पृथ्वी ग्रहाची माहिती मराठी
हे पण वाचा ➡️ शुक्र ग्रहाची माहिती मराठी.
हे पण वाचा ➡️ बुध ग्रह माहिती मराठीत
हे पण वाचा ➡️ मंगळ ग्रह विषयी माहिती
हे पण वाचा ➡️ युरेनस माहिती दाखवा
हे पण वाचा ➡️ नेपच्यून माहिती दाखवा
हे पण वाचा ➡️ चंद्राची माहिती दाखवा
हे पण वाचा ➡️ गुरूची माहिती दाखवा
0 Comments