चंद्र उपग्रह माहिती मराठी | chandra grah marathi mahiti व्हिडिओ पहा👇
चंद्र ग्रह माहिती मराठी, chandra grah marathi mahiti
चंद्र हा एक खगोलीय पिंड आहे जो ग्रहाभोवती फिरतो. दुसऱ्या शब्दांत, हा ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह आहे. ग्रहांवर कितीही चंद्र असू शकतात. बुध आणि शुक्र सारख्या काही ग्रहांना चंद्र नाही तर शनीला एकूण ८२ चंद्र आहेत. पृथ्वीचा चंद्र हा आपल्या ग्रहाचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.
आपला चंद्र देखील स्वतःच्या अक्षावर फिरतो आणि एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला अंदाजे २७ दिवस लागतात. आपल्याला चंद्राची एकच बाजू नेहमी पाहायला मिळते कारण सारखीच प्रदक्षिणा आणि प्रदक्षिणा कालावधीमुळे तो पृथ्वीवर भरती-ओहोटी ने बंद होतो.
चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे. याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते. चंद्राने बऱ्याच वर्षांपासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण केले आहे.
ज्या खगोलीय वस्तूवर माणसाने पाऊल ठेवले आहे, अशी चंद्र ही एकमेव खगोलीय वस्तू आहे सोव्हियत संघाचे लूना १ हे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून चंद्राच्या अतिशय जवळून जाणारी पहिली वस्तू आहे. लूना २ हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले. तसेच लूना ३ या यानाने चंद्राच्या दुसऱ्या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने १९५९ साली सोडली.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान १९६६ साली सोडलेले लूना ९ होते; नंतरच्या लूना १०ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या. ज्याद्वारे मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवले, अशी अमेरिकेची अपोलो मोहीम ही जगातील आजवरची एकमेव मोहीम आहे.
पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकूण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो.
चंद्राच्या दोन्ही बाजूंमधील लक्षात येणारा सर्वांत मोठा फरक म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर दिसणारे डाग (मारिया) आणि विरुद्ध बाजूला अपवादानेच दिसणारे तसले डाग..
चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असलेल्या डागांना मारिया असे नाव आहे. हे नाव लॅटिन भाषेतील मेअर म्हणजे समुद्र या शब्दाचे अनेकवचन आहे. पूर्वीचे खगोलशास्त्रज्ञ या डागांना पाण्याचे समुद्र समजत असत. आता मात्र हे डाग म्हणजे लाव्हा पासून बनलेले बसाल्ट खडक असल्याचा शोध लागलेला आहे. चंद्रावर धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतू यांच्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमध्ये लाव्हा भरला गेल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर डाग दिसतात.
चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूपैकी सुमारे ३१% हा मारिया डागांनी व्यापलेला आहे. तर पृथ्वीविन्मुख बाजूवर फक्त २% एवढाच भाग या डागांनी व्यापलेला आहे. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असणारे उष्णता निर्माण करणाऱ्या घटकांचे जास्त प्रमाण होय..
चंद्राच्या पृष्ठभागावरील डागांचा भाग सोडला तर इतर भाग हा उंच पर्वतरांगानी व्यापलेला आहे. या पर्वतरांगा उल्का व धूमकेतूंच्या झालेल्या धडकांमुळे तयार झाल्या असाव्यात असे शास्त्रज्ञांना वाटते. पृथ्वीप्रमाणे अंतर्गत हालचालींमुळे तयार झालेल्या पर्वतरांगा चंद्रावर आढळत नाहीत.
१९९४ साली क्लेमेंटाईन अंतराळयानाने घेतलेल्या चंद्राच्या छायाचित्रांमध्ये असे दिसून आले की चंद्राच्या उत्तरध्रुवावरील पियरी विवराच्या बाजूने असणाऱ्या चार मोठ्या पर्वतरांगांवर पूर्णवेळ प्रकाश असतो. चंद्राच्या अक्षातील छोट्याशा कलण्याने (१.५ अंश) या ठिकाणी कायम प्रकाश असतो. चंद्राच्या दक्षिणध्रुवाजवळ असणाऱ्या काही पर्वतरांगांवर दिवसाच्या ८०% वेळ सूर्यप्रकाश असतो.
चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे २७ दिवस ७ तास, ४३ मिनिटे आणि ११.६ सेकंद लागतात. चंद्र हा एक पृथ्वीचा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे ज्याला आपण आकाशामध्ये रात्रीचे पाहू शकतो. जसे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे तसेच चंद्रावर देखील आहे जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा ६ व भाग आहे.
चंद्राला स्वतभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागत असल्यामुळे आपणास चंद्राची एकच बाजू दिसते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती ओहोटी येते. ११ जुलै १९६९ रोजी निल ऑर्मस्ट्राँग व अॅल्ड्रीन यांनी अपोलो यानातून प्रवास करुन चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.
0 Comments