mangal grah vishay mahiti | मंगळ ग्रह विषयी माहिती
व्हिडिओ पहा👇
mangal grah vishay mahiti | मंगळ ग्रह विषयी माहिती :-
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे.
मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर २३ कोटी किमी (१.५ खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे ६८७ दिवस इतका आहे. मंगळावरील एक सौर दिवस पृथ्वीपेक्षा थोडासाच मोठा असून तो २४ तास, ३९ मिनिटे व ३५.२४४ सेकंद इतका भरतो.
१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरीक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमुळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ दृष्टिभ्रमामुळे ते दिसतात असे स्पष्टीकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बर्फाच्या स्वरूपातील पाणी जुलै ३१, २००८ रोजी फीनिक्स मार्स लॅंडरला मंगळावर आढळले होते.
सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम उपग्रह परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस व मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर होत. पृथ्वी वगळता इतर ग्रहांमध्ये हा आकडा मंगळासाठी सर्वांत जास्त आहे. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर स्पिरिट व ऑपॉर्च्युनिटी ही दोन कार्यरत स्वयंचलित परीक्षणयाने (रोव्हर) व अनेक मृत यशस्वी तसेच अयशस्वी रोव्हर व अवतरक (लॅंडर) आहेत. फीनिक्स या यानाने नुकतीच मंगळाच्या पृष्ठभागावरील आपली मोहीम पूर्ण केली. या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या गरम पाण्याच्या फवाऱ्यांच्या स्वरूपात पाणी अस्तित्वात होते. नासाच्या मार्स ग्लोबल सर्व्हेयरने केलेल्या निरीक्षणांतून मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फ कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
🔰 मंगळ ग्रहाविषयी आपणास हे माहित आहे का ?👇
➡️ सूर्यमालिकेत मंगळ ग्रह सूर्यापासून 22.72 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सूर्यमालिकेत पृथ्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर म्हणजे चौथ्या क्रमांकावर मंगळ आहे. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर 11.88 कोटी किलोमीटर आहे.
➡️ मंगळ ग्रह पृथ्वीच्या निम्मा आहे. पृथ्वीचा व्यास 12,681.6 किलोमीटर आहे तर मंगळाचा व्यास 6752 किलोमीटर आहे. मात्र त्याचं वजन पृथ्वीच्या एक दशांश आहे.
➡️ मंगळ सूर्याची एक प्रदक्षिणा 687 दिवसात पूर्ण करतो. याचाच अर्थ पृथ्वीच्या तुलनेत सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला मंगळ ग्रहाला जवळपास दुप्पट कालावधी लागतो. म्हणजेच मंगळावर एक वर्ष 687 दिवसांचं असतं.
➡️ मगळावरचा एक दिवस (ज्याला सोलार डे असंही म्हणतात) 24 तास 37 मिनिटांचा असतो.
➡️ हाडं गोठवणारी थंडी, धुळीची वादळं आणि वावटळी हे सर्व पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर खूपच जास्त आहे. तरीही जीवसृष्टीसाठी मंगळाची भौगोलिक स्थिती इतर ग्रहांच्या तुलनेत खूप चांगली असल्याचं मानलं जातं.
➡️ उन्हाळ्यात या ग्रहावर सर्वाधिक तापमान 30 अंश सेल्सियस असतं तर हिवाळ्यात तापमान शून्याखाली 140 अंश सेल्सियसपर्यंत घसरतं.
➡️ पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही वर्षातले चार ऋतू असतात. पानगळ, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर प्रत्येक ऋतू दुप्पट काळ असतो.
➡️ पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची गुरूत्वाकर्षणाची क्षमता वेगवेगळी आहे. त्यामुळे पृथ्वीवर सुमारे 45 किलो वजनाची व्यक्ती मंगळावर 17 किलो वजनाची होते.
➡️ मंगळाला दोन चंद्र आहेत. फोबोस, याचा व्यास 23 किलोमीटर आहे आणि डेमिओस, याचा व्यास 13 किलोमीटर आहे.
हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत. ऑलिम्पस मॉन्स हा मंगळावर असलेला ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. त्याची उंची तब्बल २६.४ किमी आहे. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरून शक्तिशाली दुर्बिणीतूनसुद्धा दिसते. या दरीला मरीना दरी असे म्हणतात. मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सियस तर विरुद्ध भागाचे तापमान १८० अंश सेल्सियस असते.
मंगळाला फोबॉस व डीमाॅस (उपग्रह) हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत. यापैकी फोबाॅस मंगळापासून ५,८८० मैल आणि डिमॉस १४,६०० मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. हे ५१६१ युरेका या मंगळाच्या ट्रोजन उपग्रहाप्रमाणे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले लघुग्रह असावेत.
या दोन्ही उपग्रहांचा शोध १८७७ मध्ये असाफ हॉल याने लावला व त्यांना फोबॉस व डीमॉस या ग्रीक देवांवरून नावे दिली. फोबॉस हा भीतीचे मूर्तरूप मानला जातो तर डीमॉस हा दहशतीचे मूर्तरूप मानला जातो. ग्रीक पुराणांनुसार या जुळी भावंडे त्यांचे वडील अॅरिस (ग्रीकांचा युद्धदेव) याच्यासोबत युद्धात उतरली होती. ॲरिस रोमन पुराणांत मार्स या नावाने ओळखला जातो. (ज्यावरून मंगळाचे इंग्रजीतील नाव मार्स पडले.)
मंगळाची त्रिज्या पृथ्वीच्या अर्धी आहे व त्याची घनता पृथ्वीपेक्षा कमी आहे. मंगळाचे आकारमान पृथ्वीच्या १५% असून वस्तुमान ११% आहे. पृथ्वीवरील एकूण खंडीय प्रदेशापेक्षा मंगळाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ थोडेसे कमी आहे. जरी मंगळ बुधापेक्षा आकाराने व वस्तुमानाने मोठा असला तरी त्याची घनता बुधापेक्षा कमी आहे. यामुळे पृष्ठभागावर बुधाचे गुरुत्वाकर्षण मंगळापेक्षा जास्त आहे. मंगळाचे वस्तुमान,आकारमान व गुरुत्वाकर्षण हे पृथ्वी व चंद्राच्या जवळपास मध्ये आहे. (चंद्राचा व्यास मंगळाच्या अर्धा आहे तर पृथ्वीचा मंगळाच्या दुप्पट, पृथ्वीचे वस्तुमान मंगळाच्या दहापट आहे तर मंगळाचे वस्तुमान चंद्राच्या दहापट आहे). मंगळाच्या पृष्ठभागाचा केशरी-तांबडा रंग त्याच्यातील आयर्न (III) ऑक्साईड (लोखंडावरील गंज व हेमटाईट ते हेच.)
सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानानुसार, पृष्ठभागावर द्रवरूप पाणी असणाऱ्या ग्रहांवर जीवन विकसित होणे, तसेच ते चालू राहणे याची शक्यता जास्त मानली जाते. यासाठी ग्रहाची कक्षा हॅबिटेबल झोन (राहण्यायोग्य क्षेत्रा)मध्ये असणे आवश्यक आहे. सूर्यासाठी ही कक्षा पृथ्वीने व्यापली आहे. मंगळ या कक्षेच्या अर्धा खगोलीय एकक पलीकडे आहे. यामुळे तसेच मंगळावरील विरळ वातावरणामुळे मंगळाच्या पृष्ठभागावरील पाणी गोठते. मात्र भूतकाळातील वाहते पाणी मंगळाची जीवन धारण करण्याची क्षमता दर्शविते. नजीकच्या काळात मिळालेल्या पुराव्यांनुसार मंगळावर जरी पाणी असते तरी ते खूप खारट आणि आम्लधर्मी असले पाहिजे, त्यामुळे जीवसृष्टीला आधार देऊ शकले नसते.
मॅग्नेटोस्फिअरचा अभाव आणि विरळ वातावरण ही जीवसृष्टीच्या संभावनेसमोर मोठी आव्हाने उभी करतात. ही आव्हाने म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावरील अल्प ऊष्मा स्थानांतरण, सौर वारे, तसेच इतर खगोलीय वस्तूंच्या आघातापासून मिळणारा कमी बचाव व पाणी द्रवरूपात राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य वातावरणीय दाबाचा अभाव (या दाबामुळे पाण्याचे ऊर्ध्वपतन होऊन पाण्याची वाफ बनते.). तसेच मंगळ हा भूरचनाशास्त्रीयदृष्ट्या जवळपास (बहुदा पूर्णपणे) मृतप्राय आहे. मंगळावरील ज्वालामुखींच्या अंतामुळे जमिनीच्या आतील रसायने व खनिजे पृष्ठभागावर येणे व पृष्ठभागावरील रसायने व खनिजे पृष्ठभागाखाली जाणे थांबले आहे.
हे पण वाचा ➡️ पृथ्वी ग्रहाची माहिती मराठी
हे पण वाचा ➡️ शुक्र ग्रहाची माहिती मराठी.
हे पण वाचा ➡️ बुध ग्रह माहिती मराठीत
हे पण वाचा ➡️ शनी ग्रहाविषयी माहिती मराठी
हे पण वाचा ➡️ सूर्याची माहिती दाखवा
हे पण वाचा ➡️ युरेनस माहिती दाखवा
हे पण वाचा ➡️ नेपच्यून माहिती दाखवा
हे पण वाचा ➡️ चंद्राची माहिती दाखवा
हे पण वाचा ➡️ गुरूची माहिती दाखवा
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
0 Comments