Subscribe Us

saturn planet information in marathi | शनि ग्रहाविषयी माहिती मराठी

Saturn planet information in marathi | शनि ग्रहाविषयी माहिती मराठी व्हिडिओ पहा👇

 saturn planet information in marathi | शनि ग्रहाविषयी माहिती मराठी 

👉उपग्रह: ६२

👉चंद्र: टायटन, एन्सेलाडस, माइमस, डायोन, आयपेटस, आणखी सध्या ट्रेंडमध्ये असलेले

👉सूर्यापासूनचे अंतर: १.४३४E९ km

👉वय: ४.५०३E९ वर्ष

👉पूर्ण प्रखरता: -८.९१४

👉कक्षेचा कल: सूर्याच्या विषुववृत्ताशी

शनी ग्रह देखील गुरूप्रमाणेच वायुरूपात आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: १,४२६,७२५,४०० किलोमीटर एवढे आहे. शनी ग्रह आकाराने प्रचंड असला तरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल.सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनीभोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. गुरू ग्रहापेक्षा लहान असला तरी हा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिद्ध आहे..सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनीभोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. गुरू ग्रहापेक्षा लहान असला तरी हा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिद्ध आहे.

शनीचा आकाशातील अन्य तारकांच्या संदर्भातील वेग अतिशय कमी आहे. म्हणजे अडीच वर्षांमध्ये शनी फक्त एक रास (३० अंश) पुढे जातो. त्यामुळे शनीला संस्कृतमध्ये ’मंद’ म्हणतात. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या माणसाची जी (चंद्र)रास असेल त्या राशीत किंवा तिच्या आधीच्या किंवा पुढच्या राशीत जेव्हा शनी असतो, तेव्हा ता माणसाला साडेसाती आहे असे समजले जाते.शनी ग्रह देखील गुरूप्रमाणेच वायुरूपात आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: १,४२६,७२५,४०० किलोमीटर एवढे आहे.

शनी ग्रह आकाराने प्रचंड असला तरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल.शनी ग्रहाभोवती असणाऱ्या असंख्य लहान मोठ्या खडकांनी मिळून कडी निर्माण झाली आहेत. या कड्यांची संख्या असंख्य आहे. या कड्यांची प्रामुख्यांनी सात वेगवेगळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या कड्यांमध्ये एक मोठी पोकळी दिसते या पोकळीला "कॅसिनी डिव्हिजन" असे म्हणतात. या पोकळीतील दोन कड्यांध्ये ४,००० किलोमीटरची पोकळी आहे.

शनी त्याच्याभोवतीच्या कड्यांमुळे जास्त ओळखला जातॊ. ही कडी साध्या दूरदर्शी किंवा द्विनेत्रीच्या(दुर्बिणीच्या) साहाय्याने पहाता येतात. ही कडी शनीच्या विषुववृत्तावर ६,६३० कि.मी. ते १,२०,७०० कि.मी. अंतरापर्यंत पसरलेली आहेत. कड्याची जाडी मात्र एक किलोमीटरच्या आसपास आसून ती सिलिका, आयर्न ऑक्साईड व बर्फाच्या कणांपासून बनलेली आहेत. कणांचे आकारमान एक धूलिकणाच्या आकारमानापासून ते १० मीटरपर्यंत असते. पॅन आणि ॲटलस हे शनीचे दोन सर्वात आतले चंद्र आहेत.  शनीला खूप चंद्र आहेत. त्यांची निश्चित संख्या सांगता येत नसली तरी ते संख्येने सुमारे बासष्ट असावेत. त्याच्या सभोवतालच्या कड्यामधील सर्व तुकडे हे एका अर्थाने त्याचे उपग्रहच आहेत. तसेच कड्यांमधील मोठा तुकडा व लहान चंद्र यामध्ये फरक करणेसुद्धा अवघड आहे. या सर्वांमध्ये फक्त सात उपग्रहांना त्यांच्या (त्यातल्या त्यात) जास्त वस्तुमानामुळे गोलाकार प्राप्त झाला आहे. शनीचा सर्वांत लक्षणीय उपग्रह म्हणजे टायटन (Titan). संपूर्ण सूर्यमालेत फक्त याच उपग्रहाला दाट वातावरण आहे. याची मध्यभागील घनता जास्त आहे. शनीच्या एनक्लेडस या फक्त ५०० किलोमीटर रुंद असलेल्या चंद्रावर पाणी असण्याची शक्यता आहे. शनीला भेट देणारे कॅसिनी हे नासाने पाठवलेले एकमेव यान होते. सप्टेंबर २०१७मध्ये ह्या यानाने शेवटचे चित्र पाठवले आणि ते यान नष्ट झाले.


हे पण वाचा ➡️ पृथ्वी ग्रहाची माहिती मराठी 

हे पण वाचा ➡️ शुक्र ग्रहाची माहिती मराठी.

हे पण वाचा ➡️ बुध ग्रह माहिती मराठीत 

हे पण वाचा ➡️ मंगळ ग्रह विषयी माहिती 

हे पण वाचा ➡️ सूर्याची माहिती दाखवा

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇



Post a Comment

0 Comments