major somnath sharma information in marathi | मेजर सोमनाथ शर्मा माहिती मराठी
![]() |
major somnath sharma information in marathi | मेजर सोमनाथ शर्मा माहिती मराठी |
major somnath sharma information in marathi, मेजर सोमनाथ शर्मा माहिती मराठी
सोमनाथ शर्मा यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतांमध्ये झाला. ३१ जानेवारी १९२३ मध्ये या भारत मातेच्या वीर पुत्राने दाढ या गावांमध्ये जन्म घेतला. हे गाव सध्या हिमाचल प्रदेशांमध्ये स्थित आहे. त्यांचे वडील अमरनाथ शर्मा हे देखील एक सैन्याधिकारी होते. शिवाय सोमनाथ यांच्या भावांनी देखील भारतीय सैन्यामध्ये सेवा दिली होती.
सोमनाथ यांचे लहान भाऊ विश्वनाथ शर्मा हे १४ व्या भारतीय सेनेचे अध्यक्ष होते. सोमनाथ शर्मा यांचे बालपण बलिदानाच्या कथा ऐकण्यात गेले. तसेच कृष्ण आणि अर्जुन यांच्या शौर्यगाथा एकूण त्याचा प्रभाव कुठेतरी सोमनाथ शर्मा यांच्यावर होऊ लागला होता. नैनिताल येथे सोमनाथ शर्मा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.
शेरवूड कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालय शिक्षण प्राप्त केलं. शिक्षण पूर्ण करून आता सोमनाथ शर्मा भारतीय सैन्याकडे वळाले. घरातील सगळ्यांनी भारतीय सैन्यामध्ये सेवा दिली असल्यामुळे सोमनाथ शर्मा यांच्यामध्ये देखील देशभक्ती जागृत झाली. त्यांच्या वडिलांकडून, भावाकडून ते प्रोत्साहित झाले. त्यांच्या डोळ्यासमोर आता फक्त भारतीय सैन्य दिसत होतं.
त्यांच्या नसानसांमध्ये देशभक्ती वाहत होती. देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी सोमनाथ शर्मा यांनी मिलिटरीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सोमनाथ शर्मा यांनी देहरादून येथील प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल मिलिटरी कॉलेज मध्ये प्रवेश केला. सैंडस्ट् येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले.
भारतीय सैन्यात प्रवेश
लहानपणापासून मेजर सोमनाथ शर्मा यांनी मनाशी बाळगलेले स्वप्न आता त्यांना डोळ्यासमोर दिसू लागलं होतं. रॉयल मिलेट्री कॉलेजमधील अध्यापन पूर्ण झाल्यावर मेजर सोमनाथ शर्मा यांची नियुक्ती २२ फेब्रुवारी १९४२ साली ब्रिटिश भारतीय सेवेमधील एकोणिसाव्या हैदराबाद रेजिमेन्टच्या आठव्या बटालियनमध्ये झाली.
जे कालांतराने भारतीय सेनेचे चौथे बटालियन म्हणजे कुमाऊ रेजिमेंट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मेजर सोमनाथ शर्मा हे कुमाऊ रेजिमेंटच्या चौथ्या बटालियन कंपनीचे कंपनी कमांडर होते. सोमनाथ शर्मा यांनी बर्मा मध्ये द्वितीय विश्वयुद्धच्या दरम्यान अराकडा अभियान मध्ये जपानी सेनेच्या विरुद्ध लढा दिला होता.
अभियान अराकडा मधील जपानी लोकांविरुद्ध कारवाईदेखील केली होती. यावेळी सोमनाथ शर्मा हे कर्नल के. एस. टैमिया यांच्या हाताखाली काम करत होते. आराखडा अभियान मधल्या लढाई मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे सोमनाथ शर्मा यांना मेंशन इंन डिस्पैचैस मध्ये स्थान मिळालं होतं. भारतीय सैन्यामध्ये त्यांची कामगिरी उत्तम चालू होती. त्यामुळे पुढे मेजर सोमनाथ शर्मा यांच्या हाताखाली संपूर्ण युनिट सोपवलं गेलं.
वीर पुरुष मेजर सोमनाथ शर्मा
आज भारतामधील काश्मीर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण मानलं जातं. तर, भारताची शान देखील मानलं जातं. परंतु हि शान मिळवण्यासाठी वीर जवानांना आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं होतं. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वाद नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या वादाचा मुख्य कारण म्हणजे काश्मीर. ब्रिटिशांनी अनेक वर्ष भारतावर राज्य केलं.
त्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ दिवशी आपला भारत हा अधिकृत रित्या स्वतंत्र झाला. आणि याच दिवशी भारताची फाळणी देखील झाली भारतातील पाकिस्तान हा भाग भारतापासून वेगळा करण्यात आला. आणि या सोबतच काश्मीर वर हक्क गाजवण्यासाठी वाद सुरू झाले.
त्यावेळी जम्मू-काश्मीरचा राजा हरिसिंह त्याला आपला प्रदेश स्वतंत्र हवा होता. आणि ह्याच गोष्टीचा पाकिस्तानी सैनिकांनी फायदा उचलला आणि काश्मीरवर हल्ला केला. आपले राज्य पाकिस्तानच्या हवाली जाताना पाहून राजाने भारतासोबत विलीनीकरणाचा करार केला. आधी हरीसिंह राजा हा करार करण्यास तयार नव्हता, परंतु राज्यावर होणारा पाकिस्तानी सैन्याचा हल्ला बघून हा करार मंजूर करण्यात आला.
त्वरित भारत सरकारने आपल्या सेनेला काश्मीरच्या संरक्षणासाठी पाठवले. त्यावेळी संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी मेजर सोमनाथ शर्मा यांच्या वरती होती. मेजर सोमनाथ शर्मा यांची तुकडी श्रीनगर जवळील बडगाव हवाई पट्टीच्या सुरक्षेची जबाबदारी घेत होती. मेजर सोमनाथ शर्मा यांच्या सैन्या मध्ये फक्त शंभर सैनिक उपलब्ध होते. तर शत्रु सातशे सैनिक घेऊन हल्ला करत होता.
मेजर सोमनाथ शर्मा यांनी आपल्या १०० सैनिकांच्या सोबतीने शत्रूच्या ७०० सैनिकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मनुष्यबळ तर कमी होतचं परंतु सोबतच शास्त्रांचा देखील तुटवडा होता. मेजर सोमनाथ शर्मा यांनी खूप चातुर्याने शक्तीचा वापर न करता युक्तीचा वापर केला.
दोन्ही सैन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू होता. सैन्यातील जवानांना दुखापत होऊ लागली होती. पण तरीही हा लढा थांबला नाही. आपल्याकडे शस्त्र कमी असून सुद्धा आपण शत्रूवर भारी पडत होतो. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी या हल्ल्या दरम्यान मेजर सोमनाथ शर्मा यांच्या हाताला इजा झाली. नंतर ग्रेनेड त्यांच्याजवळ येऊन फुटला त्यामुळे त्यांच्या शरीरामधून रक्त वाहू लागले.
त्या दिवशी ते मृत्यूशी झुंज देत त्यांनी हा लढा चालूच ठेवला. आपल्याला इजा झालीये हे देखील त्यांना जाणवत नव्हतं. त्यांनी त्यांच्या साथीदाराला ही लढाई सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. आणि अखेर पाकिस्तानच्या सातशे सैनिकांवर आपल्या भारताचे १०० सैनिक भारी पडले. काश्मीर हे शहर भारताच्या ताब्यात घेतलं.
मेजर सोमनाथ शर्मा (१९२३-१९४७) हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत. सोमनाथ शर्माच्या काश्मीर मधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना ह्या पदकाने गौरविण्यात आले .
शत्रूचा कडवा प्रतिकार करीत असताना एक तोफगोळा जवळच फुटल्याने शर्मांस वीर मरण आले. त्यांची शेवटची वाक्ये "शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेकपटीने संख्येत असून आम्ही भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही आणि अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढू." या दरम्यान १ बटालियन कुमाउँ रेजिमेंट बदगामला पोहोचली व त्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावला. व या कार्यासाठी त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार देण्यात आला
आपण ही लढाई जिंकलो परंतु, ते म्हणतात ना गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली. काश्मीर सारखा रत्न तर आपल्या भारताला मिळालं, परंतु मेजर सोमनाथ शर्मा यांच्या सारखा मौल्यवान रत्न आपण गमावलं. त्यांनी दिलेल हे बलिदान नेहमीच सर्वश्रेष्ठ राहील. अगदी वयाच्या चोविसाव्या वर्षी मेजर सोमनाथ शर्मा यांनी भारत मातेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
मेजर सोमनाथ शर्मा यांच्या योगदानामुळे त्यांना भारत सरकार द्वारे पहिला मरणोपरांत “परमवीर चक्र" पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. परमवीर चक्राने सन्मानित केलेले ते पहिले सैनिक होते. परमवीर चक्र हा भारतातील सैन्य क्षेत्रांमधील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार युद्धकाळात बजावला गेलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो.
आत्तापर्यंत २१ जवानांना परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि या मधील सर्वात प्रथम क्रमांक मेजर सोमनाथ शर्मा यांचा आहे. केवळ २४ वर्षाचे होते सोमनाथ शर्मा जेव्हा त्यांनी आपल्या शौर्याची गाथा रचली. मेजर सोमनाथ शर्मा यांच्या शौर्याची गाथा नक्कीच अंगावर काटे आणणारी आहे. मेजर सोमनाथ शर्मा यांनी लढलेली लढाई शब्दात वर्णन करण्यासारखी नाही.
0 Comments