Subscribe Us

शाळांची सन 2023 च्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत

शाळांची सन 2023 च्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत

शाळांची सन 2023 च्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत
शाळांची सन 2023 च्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत

शाळांची सन 2023 च्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत

प्रति,

1. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

2. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व

3. शिक्षण निरीक्षक (उत्तर पश्चिम दक्षिण), बृहन्मुंबई

विषय : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2023 च्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत.

संदर्भ : शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-2022/ प्र.क्र. 58/ एस. डी. 4. दि. 11/04/2022

उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय परिपत्रकानुसार शासनाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

1. मंगळवार, दि.02 में 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि. 12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. 26 जून, 2023 रोजी सुरु होतील.

2. इ. 1 ली ते इ. 9 वी व इ.11 वी चा निकाल दि. 30 एप्रिल, 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि, तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

3. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश आपले स्तरावरुन द्यावेत.

4. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्टया 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. 

5. वरीलप्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचीत करावे.

(कृष्णकुमार पाटील ) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇



Post a Comment

0 Comments