व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 महाराष्ट्र | video competition 2023 maharashtra
![]() |
व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 महाराष्ट्र | video competition 2023 maharashtra |
व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 महाराष्ट्र, video competition 2023 maharashtra
दिनांक ११ मे २०२३.
प्रस्तावना :-
आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे. कोविड- १९ काळात प्रत्यक्ष शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध माध्यमाद्वारे व साधनांद्वारे वर्गावर्गातून अध्ययन-अध्यापन प्रणाली घडतांना दिसून येत होती, शिक्षक, विद्यार्थी कधी शाळेच्या ओट्यावर, कधी शेतात, कधी मंदिराच्या ओट्यावर कधी निवासी पार्किंग मध्ये तर कधी गल्लीतील चौकात एकत्र येवून ऑनलाईन प्रणालीने अभ्यास, चाचण्या पूर्ण करतांना दिसत होते. शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी याच डिजिटल साधनांचा वापर करून आपले अध्यापन सुकर करताना आढळून येत आहे. राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रीय होऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील २,८९,५६० शिक्षक है तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे. या शिक्षकांनी फक्त आपापले वर्गच ऑनलाईन घेतलेले नाहीत तर स्वतःच्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केलेले आहे. ज्यामुळे आज राज्यातील विद्यार्थी स्वतः डिजिटल साहित्य तयार करून आपले शिक्षण मनोरंजक करत आहेत. इतर देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून विविध साहित्य वापरत आहेत. उदा. शैक्षणिक व्हिडीओ, मनोरंजक खेळ, AIV/AR / VR वापर करून बनविलेले ई साहित्य, कृतियुक्त PDF, आनंददायी PPT पोस्टर्स, प्रमाणपत्रे आदी. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले ई-साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येते.
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय -
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. |
इयत्ता |
विषय |
01 |
1ली ते 2री |
भाषा,गणित,इंग्रजी |
02 |
3री ते 5वी |
भाषा,गणित,इंग्रजी,परिसर अभ्यास |
03 |
6वी ते 8वी |
भाषा,गणित,इंग्रजी,विज्ञान,सामाजिक शास्त्रे |
04 |
9वी ते 10वी |
भाषा,गणित,इंग्रजी,विज्ञान,सामाजिक शास्त्रे |
05 |
11वी ते 12वी |
भाषा,गणित,इंग्रजी,विज्ञान,सामाजिक शास्त्रे |
06 |
अध्यापक विद्यालय |
भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह |
शैक्षणिक विडियो प्रकार : -
॰ कोणत्याही
सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे.
॰ स्वतः स्क्रीन
रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ
॰ स्वतः केलेला Animated व्हिडिओ
॰ स्वतः पेन
टॅबलेटचा वापर करून बनवलेला व्हिडीओ.
॰ Immersive eContent
(Augmented Virtual Reality / Virtual Reality / Virtual Lab / 360 Degree / Simulations) वर आधारित व्हिडीओ
॰ खेळावर आधारित
व्हिडीओ (Garmification).
॰ ई-चाचणीवर
आधारित व्हिडीओ (E-assessments)
॰ शासन प्रणालीवर
आधारित बोलीभाषेतून केलेला व्हिडीओ
॰ दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हिडिओ
शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करून Anyone with link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.
स्पर्धेचे आयोजन - (तालुका/ जिल्हा/ राज्य स्तर)
|
स्पर्धेचा स्तर |
गट |
विषय पुरस्कार |
जबाबदार संस्था |
1 |
तालुका स्तर |
1ली ते 2री |
भाषा,गणित,इंग्रजी |
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन
अधिकारी |
2 |
तालुका स्तर |
3री ते 5वी |
भाषा,गणित,इंग्रजी,परिसर अभ्यास |
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन
अधिकारी |
3 |
तालुका स्तर |
6वी ते 8वी |
भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक
शास्त्रे |
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन
अधिकारी |
4 |
तालुका स्तर |
9वी ते 10वी |
भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक
शास्त्रे |
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन
अधिकारी |
5 |
तालुका स्तर |
11वी ते 12वी |
भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक
शास्त्रे |
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन
अधिकारी |
6 |
तालुका स्तर |
अध्यापक विद्यालय |
भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक
शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह
|
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन
अधिकारी |
वरीलप्रमाणे जिल्हा, राज्य
स्तरावरील नियोजन असणार आहे. जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य
पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा
शिक्षण व प्रशिक्षण संस्था असणार आहे. |
पारितोषिके स्वरूप -
अ.क्र. |
स्तर |
क्रमांक |
बक्षिसाचे स्वरूप |
०१ |
तालुका स्तर |
प्रथम क्रमांक |
(रू. ३००० /- रोख व प्रमाणपत्र) |
|
|
द्वितीय क्रमांक |
( रू. २००० /- रोख व प्रमाणपत्र) |
|
|
तृतीय क्रमांक |
( रू. १५०० /- रोख व प्रमाणपत्र) |
०२ |
जिल्हा स्तर |
प्रथम क्रमांक |
( रू.१०,००० /- रोख व प्रमाणपत्र) |
|
|
द्वितीय क्रमांक |
( रू.९०००/- रोख व प्रमाणपत्र) |
|
|
तृतीय क्रमांक |
( रू. ८०००/- रोख व प्रमाणपत्र) |
०३ |
राज्य स्तर |
प्रथम क्रमांक |
( रू. ५०,००० /- रोख व प्रमाणपत्र) |
|
|
द्वितीय क्रमांक |
( रू. ४०,००० /- रोख व प्रमाणपत्र) |
|
|
तृतीय क्रमांक |
( रू. ३०,००० /- रोख व प्रमाणपत्र) |
उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष -
💥व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा.
💥लिंग समभाव, शासकीय ध्येय धोरणाशी सुसंगत आशय असावा.
💥व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.
💥व्हिडीओ ची साईज ही विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.
💥निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.
💥व्हिडिओमधील मजकूर चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.
💥शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बार्बीना महत्व असेल.
💥आवाजात सुस्पष्टता असावी, आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह- अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बँकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बँकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.
व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी -
💥शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे.
💥वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक
💥व्हिडिओ बनविणाऱ्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा.
💥व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.
💥घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.
💥व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.
💥व्हिडीओ फॉरमॅट MP4 असावा.
💥व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची. व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी, उल्लेख नसावा.
💥व्हिडीओ मधील मजकूर व आशयाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे, याची नोंद घ्यावी
💥व्हिडीओ मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त (Creative Commons) असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. कॉपीराईटची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी. याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जबाबदार असतील.
💥राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडीओजच्या creator ला तो व्हिडीओ त्यांनीच तयार केला आहे हे सिद्ध करावे लागेल. अन्यथा तो व्हिडीओ स्पर्धेतून बाद करण्यात येईल...
💥शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जानुसार शिक्षकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल व सदरच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओज हे त्याच्या creator च्या नावासह शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
💥स्टॉक शॉट्स किंवा कोणतेही कॉपीराइट केलेले ग्राफिक्स / इमेज संकलित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील.
💥एका स्पर्धकाने एका गटासाठी फक्त एकच व्हिडिओ पाठवावा.
💥सर्व नोंदींची एक प्रत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राखून ठेवली जाईल.
💥पुरस्कार विजेत्या व्हिडिओचे प्रसारण DIKSHA/OER आणि SCERT द्वारे व्यवस्थापित इतर वेबसाइट्स/पोर्टलवर अपलोड करण्यात येतील.
💥तालुका / जिल्हा/ राज्य स्तरावरील स्पर्धांचे निकाल तालुका/ जिल्हा/ राज्य निवड समिती मार्फत अंतिम केला जाईल (स्वतंत्रपणे ऑडिओ आणि अॅनिमेशन/इमर्सिव्ह ई-कॉन्टेंट/ डिजिटल गेम्स आणि अॅप्लिकेशन श्रेणीसाठी) ज्युरीने घोषित केलेले निकाल बंधनकारक असतील.
व्हिडिओ रद्द करण्याचे अधिकार -
💥वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक, खिया किंवा लिंग पूर्वाग्रहाचे समर्थन करणारी सामग्री व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,
💥कोणत्याही प्रकारची हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अमली पदार्थांचा वापर यांचा व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,
💥तांत्रिक त्रुटी असल्यास ( उदा. सुरु न होणे, मध्येच बंद होणे),
💥कोणत्याही कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन असल्यास,
💥साहित्यिक चोरीचा (plagiarism) समावेश असल्यास,
असे व्हिडीओ पडताळणी अंती कोणत्याची स्तरावर बाद करण्यात येतील, यावर स्पर्धकाचा कोणताही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही.
निवड समितीची रचना -
वरीलप्रमाणे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. सदर उत्कृष्ट शिक्षकांना उपरोक्तप्रमाणे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवांकीत करण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धक यांनाही सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. सदर निवड करण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यास शासन मान्यता देत आहे.
उपरोक्त उपक्रमाच्या अनुषंगाने येणारा सर्व खर्च राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या "प्रशिक्षण" या लेखाशिषांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीमधून भागविण्यात यावा. सदर स्पर्धेबाबत / उपक्रमाबाबत सविस्तर सूचना संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यानी निर्गमित करण्यात याव्यात. सदर स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना असतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५१११८४८३०४३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
IMTIYAZ
MUSHTAQUE KAZI
(इ.मु. काझी)
सह सचिव, महाराष्ट्र शासन
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments