Subscribe Us

आई माझी मायेचा सागर-कवि गंगाधर हरणे

 आई माझी मायेचा सागर-कवि गंगाधर हरणे

आई माझी मायेचा सागर-कवि गंगाधर हरणे


मा.गंगाधर नरहरी हरणे,पांगरा सती,ता.वसमत जि.हिंगोली येथील ते रहिवासी,त्यांचे 

शिक्षण बीए.डि.एड झालेले असून वसमत तालुक्यातील पुयणी बु. येथे ते जिल्हा परिषद शिक्षक आहेत.

तसेच शीघ्र कवी म्हणून वसमत तालुक्यामध्ये प्रसिध्द आहेत.दहावीत असतांनापासून त्यांना लिखाणाची आवड निर्माण झाली.कुसुमाग्रज यांच्या कवितांनी ते प्रेरीत झाले.आई वडिलांचे शेतातले जगणं, त्यांची मेहनत,कष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतांना त्यांना खूप वाईट वाटायच.एवढे कष्ट करून सुद्धा बापाची झोळी सदैव रिकामीच राहायची,आईने डोळ्यात लपवलेले आश्रू काळीज चीरायचे.त्या वेळी हतबल असलेल्या कविच्या हळव्या मनात 

कूठेतरी ही वेदना सलत होती,त्या सलणा-या शब्दांना कागदावर मांडतांना २००५ साली त्यांना"आई माझी मायेचा सागर" ही कविता सुचली.आणि ती आज संपुर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे हे विशेष!

     "आई माझी मायेचा सागर"या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहामध्ये महाराष्ट्राच्या घराघरात निनावी पोहचलेली कविता समाविष्ट आहे. एक दोघांनी या कवितेला स्वतःचे नाव लावण्याचा प्रयत्न केला असला तरी तो अयशस्वी झाला.खरं,तर आई विषयी जेवढ बोललं,जेवढ लिहिल तेवढ कमी आहे.आई...मायेची पखरण करणारी एकमेव स्त्री असते!"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी"यातुन आई या शब्दाची महानता व्यक्त होते.आई वडिल हेच आपले खरे दैवत आहेत.कवि गंगाधर हरणे यांची आईच महत्व विशद करणारी कविता-


"आई माझी मायेचा सागर"


आई वडील माझे थोर 

काय सांगू त्यांचे उपकार

जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार 

आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार ।।धृ।।


तळपत्या उन्हात,

रखरखत्या रानात

न्हाहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात

कधी मिळे मूठभर घास

कधी घडे तुला उपवास

ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास ।।१।।


थंडीचा तो वारा गार पावसाच्या धारा बसून बाबांच्या पाठीवर ओलांडले मी पुरा माझे कपडे ठेवाया पंग तुमचे फाटकेच राहिले अंग पेरणीमध्ये औतामागे गायीले तुकयाचे अभंग ।।२।।


नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर 

शीतल तुझी छाया गं मज हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेखाली  उभं आयुष्य जगेन जन्मा जन्मासाठी आई मी तुलाच गं मागेन ।।३।।


(कवि-गंगाधर नरहरी हरणे)

----------------------

रुपाली वागरे/वैद्य

नांदेड

९८६०२७६२४१

Post a Comment

0 Comments