उपशिक्षक ते उपशिक्षणाधिकारी –आभाळ कवेत घेणारा शैक्षणिक प्रवास
आदरणीय श्री. सुरेश सोनुने सर...🙏🙏
_काही लोकांचं आपल्या जीवनात येणं भाग्याचं असतं, तर काहींच्या रूपाने दुर्भाग्य आपल्या जीवनात चालून येतं. काहीचं आपल्या जीवनात असणं जीवनाला आनंदयात्रा बनवतं, तर काहींचं आस्तित्व जीवनाच्या सुंदर उपवनाला स्मशान बनवतं. आपलं माझ्या जीवनातील स्थान वसंत ऋतूसारखं आहे. माऊली म्हणतात, ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे । आपल्या सहवासाच्या सुगंधाने माझ्या जीवनालाही कर्तृत्वाचा दरवळ प्राप्त झाला._
_2017 साली बिट वसमत येथे आपली नियुक्ती शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून झाली तेंव्हा पासून विद्यार्थी व शिक्षणाविषयी आपली तळमळ, उपक्रमशीलता आणि सकारात्मक ऊर्जा जवळून पाहता आली..! वसमत बिटामध्ये आपण विद्यार्थी हिताचे असंख्य उपक्रम राबवले. माझ्या सारख्या अनेक शिक्षक बांधवाना वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा दिली. आपल्यापुरता प्रकाश निर्माण करणारे काजवे सर्वच असतात, पण सूर्य बनून उजेड पेरणारे आपल्यासारखे विरळच._
_लॉकडाऊन काळातील शाळा बंद पण शिक्षण चालू, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान, We Learn English, भाषा आणि गणित विषयात अतिशय कच्चा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला LBL हा प्रायोगिक प्रकल्प अतिशय उपयुक्त आणि परिणामकारक ठरला. असे अनेक उपक्रमांची जंत्रीच आपण राबवलीत. आपल्या कल्पक नेतृत्वात आजही त्याच क्षमतेने ते उपक्रम क्रियाशील आहे...!_
_आपण बिट वसमत येथे असताना गुणवत्ता वाढीसाठी कुमठे बिट, ISO मानांकित शाळा जरेवाडी, तरोडा शाळा भेटी घडवून आणल्या, शिक्षण परिषदेत विविध मार्गदर्शन सत्रे राबवली. त्यावेळची आपली धडपड आम्हाला प्रेरणा देते._
_वसमत, कळमनुरी, औंढा, हिंगोली या चार तालुक्यांचा गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पण यशस्वीरित्या सांभाळला._ _जबाबदारीचे ओझे असूनही आपले समर्पण आणि कार्यतत्परता अजोड अशीच आहे._
_वरील सर्व शैक्षणिक कार्य करत असताना राजकीय व प्रशासकीय अडचणी पण आपणा समोर आल्या पण आपण यात कुठेही तडजोड केली नाही. *"सत्य परेशान हो सकता पराजित नहीं !"* आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे; तिच्यातून धडे घेण्याची तयारी ठेवा." "ज्यांच्याकडे स्वप्न आणि ध्येय असते, ते कधीच हार मानत नाहीत." "खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना आनंद देणे या वाक्यांच्या अर्थ आपल्याकडे पाहून कळला._
_"कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण कष्टाचे यश मात्र पूर्ण जगाला दिसते." आज शिक्षण व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाच्या उपशिक्षणाधिकारी पदी आपली पदोन्नती झाली याचा अतिशय आनंद माझ्यासारख्या अनेक शिक्षक बांधवाना झाला._
_प्रदीर्घ काळ अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत आपले योगदान नक्कीच विद्यार्थी तसेच शिक्षण प्रक्रियेला गुणात्मक दिशा देणारे आहे..!_
_वसमत बीट अंतर्गत असंख्य शाळा आणि शिक्षकांच्या गुणवत्तेत वृद्धी करण्याचे उत्तम कार्य आपले मार्गदर्शनाखाली करता आले. त्यापैकी विशेषत: गिरगाव केंद्रात केलेल्या कार्याची आठवण सदैव संस्मरणीय ठरेल._
_आपली उपशिक्षणाधिकारी पदी पदस्थापना निश्चितच विद्यार्थी आणि हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण प्रशासनाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. विद्यार्थ्यांची गुणवत्ता एका नव्या उच्च विक्रमाच्या शिखरावर विराजमान होईल..!_
_"मंजिलें उन्हीं को मिलती हैं, जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।" ऐतरेय ब्राह्मण असे म्हणते की,_
चरैवेति, चरैवेति !
चरन् वै मधु विन्दति चरन् स्वादुमुदुम्बरम्।
सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न तन्द्रयते चरन्॥
_चालणाऱ्यालाच मध मिळते, त्यालाच चविष्ट फळे मिळतात. सूर्याकडे पहा, जो कधीही न थकता सतत चालत राहतो. आपण कायम यशाची वाट चालत राहावी. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो. आपल्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा..._ 🙏🌹🌹
✒️✒️
गजानन चौधरी

0 Comments