Udise Plus 2020-21 माहिती भरण्याबाबत शाळास्तर,केंद्रस्तरावरील मार्गदर्शक सूचना 
Udise Plus 2021-22
✳️ Udise Plus 2020-21 माहिती भरण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना:-

🔶 U-DISE plus प्रपत्रातील माहिती भरण्यासंदर्भातील शाळास्तरावरील मार्गदर्शक सूचना वाचा:-
➡️ शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या User Name व Passward द्वारे शाळेतील बदल झालेल्या सोयी सुविधांची माहिती "Udise Plus" प्रणालीमध्ये 15 मे 2021 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. सदर माहिती प्रणालीमध्ये अद्यावत करणे पूर्ण झाल्यानंतर माहिती अचूक असल्याचे "Self Declaration" प्रमाणपत्र Upload करावे.
➡️ Udisr Plus प्रणालीमध्ये सन 2019-20 या वर्षाची शाळेतील सर्व सोयी सुविधांची माहिती भरून ऑनलाईन पध्दतीने सादर केलेली आहे. सन 2020-21 या वर्षाकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या User Name व Passward द्वारे सोयी सुविधांमध्ये बदल झाल्यास, विद्यार्थी संख्येत बदल झाले असल्यास, शिक्षकांच्या माहिती मध्ये बदल असल्यास त्याच माहितीमध्ये बदल करण्यात यावा व इतर माहिती पुन्हा यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविण्याची गरज नाही.
➡️ शाळेच्या मुध्यापकांनी शाळेची माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर School Report Card व भरलेले यु-डायसचे प्रपत्र माहितीसाठी डाऊनलोड करुन घ्यावे.
➡️ शाळेची माहिती भरताना मुख्याध्यापकांना अडचणी येत असल्यास त्यांनी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, राज्य/ जिल्हा / तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर / MIS Co-ordinator / Data Entry Operator यांच्या मदतीने Udise Plus प्रणालीमध्ये माहिती नोंदविण्याचे काम पूर्ण करून घेण्यात यावे.
✳️ U-DISE प्रपत्रातील माहिती भरताना केंद्रस्तरावर कोणती कार्यवाही करावी.?
➡️ केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांची माहिती Udise Plus प्रणालीमध्ये मुख्याध्यापकामार्फत नोंदविल्याची माहिती खात्री करून घ्यावी.
➡️ केंद्र प्रमुखांनी Udise Plus प्रणालीमधली माहिती अचूक, वस्तुनिष्ठ, त्रुटीविरहीत, प्रपत्रातील सर्व माहिती PGI मधील सर्व माहिती अचूक भरण्याकरिता त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करावे.
➡️ मुख्याध्यापकांना ऑनलाईन पध्दतीने माहिती भरण्यास अडचणी येत असल्यास त्यांच्या अडचणी समजून घेवून गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सोडविण्यात याव्यात.
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
वाचा 👉 UDISE PLUS माहिती कशी भरावी
वाचा 👉कोणत्याही शाळेचा Udise नंबर कसा शोधायचा
✳️ Udise Plus संबंधी सर्व मार्गदर्शक व्हिडीओ पाहा.👇
धन्यवाद.🙏💐🙏
Stay Home. 🏫💒
Stay Safe. 😊👍✌️
#zppstech
0 Comments