Subscribe Us

शासकीय कर्मचारी/ अधिकारी यांच्या सेवापुस्तिकेत आवश्यक असणार्‍या नोंदी.Required Entries in Service Book.

 


✳️ शासकीय कर्मचारी/ अधिकारी  यांच्या सेवापुस्तिकेत आवश्यक असणार्‍या नोंदी.

Required/Imp Entries in Service Book.

🔰 Service Book/सेवा पुस्तक :-

🔰 शासकिय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक म्हणजे त्याच्या सेवेचा आरसा असतो. अशा सेवापुस्तकामध्ये Service Book वेळोवेळी नोंदी करणे आवश्यक असते. जर सेवापुस्तकात Service Book Sevapustak avashyak asanaryanondi नोंदी केलेल्या नसतील तर पदोन्नती सेवानिवृत्ती अथवा यासारखे लाभ घेताना अडचणी येवू शकतात. मग सेवा पुस्तकात कोणकोणत्या नोंदी असायला हव्यात "सेवापुस्तकात आवश्यक असणार्‍या नोंदी" याविषयी जाणून घेऊया.

🔰 सेवापुस्तक Service Book हे अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवेचा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. हा अभिलेख 'अ' वर्गात मोडत असल्याने तो प्रदिर्घ कालावधी पर्यंत जतन करून ठेवणे व सुस्थितीत ठेवणे ही त्या संबंधित कार्यालयाची जबाबदारी आहे. सेवापुस्तक Service Book अपूर्ण असेल काही आक्षेप असतील तर संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांना निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात, तरी सेवापुस्तकास Service Book आक्षेपच लागू नयेत या करीता सेवापुस्तकात आवश्यक असणार्‍या नोंदी खालील बाबींची पूर्तता कर्मचारी सेवेत कार्यरत असतांनाच करुन घेण्याची कार्यवाही कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. सेवापुस्तक अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने सेवापुस्तकात Service Book खालील बाबांच्या नोंदी असणे आवश्यक आहे,

1) प्रथम नियुक्तीचा तपशिल : शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक.
2) कार्यालयाचे नाव व पदनाम.
3) प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत.
4) वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सेवापुस्तकास जोडलेले असावे
5) चारित्र्य पडताळणीची नोंद
6) प्रथम पृष्ठावरील जन्मतारीख/ पडताळणी केली आहे काय ?
7) जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद (Caste Validity)
8) स्वग्राम जाहीर केल्याची नोंद
9) सेवेत कायम करण्यात आल्याची नोंद.
10) परोविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याची नोंद
11) विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
12) विवाहानंतरच्या नांव बदलाबाबतची नोंद
13) संगणक परीक्षा उत्तीर्ण (एमएससीआयटी व इतर.)
14) संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण
15) प्रथम पानावरील प्रत्येक पाच वर्षांनी प्रमाणित केली आहे का ?
16) पाठीमागील पानावरील सेवा प्रमाणित आहे काय? वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन केल्याबाबतची नोंद
वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करून मुदत पूर्व सेवानिवृत्त केले असल्यास त्याबाबतची नोंद
17) सेवाअंतर्गत प्रशिक्षण नोंद
18) वार्षिक वेतनवाढ मंजुरी नंतर रकाना क्रमांक ८ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी.
19) मानीव दिनांक नोंद

सेवापुस्तक संपूर्ण माहिती मार्गदर्शक व्हिडीओ पाहा.

🔰 अशाप्रकारे शासकिय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तकामध्ये आवश्यक असणाऱ्या वरील नोंदी करणे गरजेचे असते. आपण जर वरील प्रमाणे नोंदी केलेल्या नसतील तर त्या करून घ्याव्यात व त्यावर सक्षण अधिकाऱ्याची सही व शिक्का घ्यावा.

✳️ सेवापुस्तिचा ऑनलाइन करण्यासाठी मोबाईल App.👇


✳️ सेवापुस्तिचा ऑनलाइन करण्यासाठी वेबसाईट.👇

https://ehrms.nic.in


🔰 WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

#zppstech




Post a Comment

0 Comments