संचमान्यते करिता कार्यरत पदांची माहिती भरणेबाबत | zpps tech guruji
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व
२. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई ( उत्तर पश्चिम दक्षिण)
• विषय :- सन २०१९-२० व २०२०-२१ च्या संचमान्यते करिता कार्यरत पदांची माहिती भरणेबाबत.
वरील विषयानुसार सन २०१९-२० व २०२०-२१ संचमान्यता उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही एनआयसी पुणे यांचेस्तरावरुन सुरु आहे. तथापि आपल्या जिल्हयातील बर्याचशा शाळांनी कार्यरत पदांची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करून अंतिम (फायनलाईज) केली नसल्याने सदर शाळांच्या २०१९-२० व २०२०-२१ च्या संचमान्यता जनरेट होऊ शकलेल्या नाहीत.
संचमान्यते करिता कार्यरत पदांची माहिती कशी भरावी, येथे क्लिक करा.
२०१९-२० व २०२०-२१ संचमान्यतेकरिता कार्यरत पदांची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करून अंतिम (फायनलाईज) करणेबाबत आपणास वारंवार व्ही.सी. द्वारे घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार १६६७० माध्यमिक शाळांपैकी १२२१६ शाळांनी वकींग पोस्ट माहिती फायनलाईज केल्याने त्यांना सन २०१९-२० व २०२०-२१ च्या संचमान्यता मिळाल्या आहेत. तथापि वारंवार सूचना देऊनही अद्यापही राज्यातील २७१९ माध्यमिक शाळांकडून सन २०१९-२० ची व ४५३० माध्यमिक शाळांकडून २०२०-२१ ची वर्कींग पोस्टची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करून अंतिम (फायनलाईज ) करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. वर्कींग पोस्ट भरण्याची सुविधा ही शाळास्तरावर मुख्याध्यापक लॉगीनला असून ती संबंधित शाळा मुख्याध्यापक यांचेकडून भरून अंतिम होणे आवश्यक आहे. तथापि संबंधित शाळा मुख्याध्यापक यांचेकडून सदर जबाबदारी पार पाडली जात नसल्याचे दिसून येत आहे. तरी २०१९-२० व २०२०-२१ संचमान्यतेकरिता वर्कींग पोस्टची माहिती भरुन सदर माहिती फायनलाईज करण्याची कार्यवाही सप्टेंबर २०२१ अखेर पूर्ण करणेबाबत आपल्या अधिनस्त माध्यमिक शाळांना सूचना देण्यात यावी, याउपरही विहीत मुदतीत ज्या शाळेकडून वर्कींग पोस्ट फायनलाईज करण्याची कार्यवाही करण्यात येणार नाही त्या संबंधित शाळा मुख्याध्यापकाचे माहे ऑक्टोबर २०२१ चे वेतन अदा केले जाणार नाही याचीही पूर्वसूचना आपल्या अधिनस्त माध्यमिक शाळांना देण्यात यावी.
( द. गो. जगताप)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत. मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर,
0 Comments