Subscribe Us

APJ Abdul Kalam biography | apj abdul kalam jayanti

 

.पी.जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) 


A P J ABDUL KALAM, ZPPS TECH GURUJI
A P J ABDUL KALAM

🔰 ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे वर्णन 👇

.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक होते. त्यांनी डी.आर डी.. मध्ये कार्य केले भारताच्या अग्नी-, अग्नी- आणि अग्नी- प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

▶️ जन्मतारीख : १५ ऑक्टोबर, १९३१                              

▶️ जन्मस्थळ : रामेश्वरम

▶️ मृत्यूची तारीख : २७ जुलै, २०१५                                   

▶️ मृत्यूस्थळ : शिलॉंग

▶️ पूर्ण नाव : अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम

▶️ पुरस्कार : भारतरत्‍न, हूवर पदक, पद्म विभूषण, वीर सावरकर पुरस्कार

.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक इंजिनिअर होते. त्यांनी डी.आर डी.. मध्ये कार्य केले भारताच्या अग्नी-अग्नी- आणि अग्नी- प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना मिसाईल मॅन असेही म्हणतात. २००२ मध्ये कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि पाच  वर्षांच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेत परत गेले.

🔰 ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिक्षण 👇

अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून अवकाशसंशोधन(एरोनाटिक्स)चा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. , त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

🔰 ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य 👇

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

🔰 ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा गौरव 👇

▶️ अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी            दिवस म्हणून पाळला जातो.


▶️ भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' १९९८ मध्ये 'भारतरत्' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

🔰 ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निधन 👇

 २७ जुलै २०१५ रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटले, परंतु थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले. संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देताना ते स्टेज वरून कोसळले. त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; आगमनानंतर त्यांच्यात नाडी किंवा जीवनाची इतर चिन्हे दिसली नाहीत. आयसीयू युनिट मध्ये ठेवण्यात आले तरी कलाम यांना ७-४५ला मृत घोषित करण्यात आले. 


तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments