देखो अपना देश २४ ऑक्टोबर २०२१ | dekho apana desh 24 october 2021 | zpps tech guruji
वेबिनार मालिका भाग - १५
प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य,
प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक विद्यालय (सर्व),
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे दिनांक १८ जुलै २०२१ पासून प्रत्येक रविवारी सुरु केलेल्या देखो अपना देश या वेबिनार मालिकेतील भाग - 15 घेऊन येत आहोत.
Webinar on "Punjab – Beyond The Brochure"
पर्यटन मंत्रालय, भारत सरकार द्वारा लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अध्ययन सतत सुरू राहण्याच्या उद्देशाने देखो अपना देश या वेबिनार मालिकेचे प्रसारण झालेले आहे.
सदर मालिका ही इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रसारित झाली असून त्यात ८९ वेबिनार्सचा समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रवास घडवून पर्यटनाचा आनंद व माहिती यांचा खजिना आपल्यापर्यंत पोहचविण्यात आलेला आहे.
या मालिकेअंतर्गत आपल्या देशातील विविध ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक स्थळे/शहरे व तेथील लोकसंस्कृतीची माहिती रंजक स्वरूपात देण्यात आलेली आहे. या माहितीचा उपयोग विद्यार्थी ज्ञानात वाढ होण्यास उपयुक्त ठरणार आहे. तसेच शिक्षकांचे अध्यापन समृद्ध होण्यास मदत होणार आहे. यातील पंधराव्या वेबिनार मध्ये Punjab – Beyond The Brochure या अंतर्गत पंजाबमधील नृत्य, खाद्य संस्कृती तेथील परंपरा, संस्कृतीचा इतिहास व त्याच बरोबर अमृतसरचे सुवर्णमंदिर, वाघा बॉर्डर यासह अनेक सुंदर वास्तूंची व ठिकाणांची माहिती अतिशय ओघवत्या स्वरूपात मांडलेली आहे.
चला तर मग नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अनोख्या पंजाबचा अनुभव आभासी सफरीच्या माध्यमातून घेऊया, त्यासाठी खलील वेबिनार विडियो पाहा.
सदर वेबिनार लिंक सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांना उपलब्ध करून देण्यात यावी.
एम. डी. सिंह (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिकसंशोधन व
प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 1
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 2
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 3
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 4
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 5
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 6
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 7
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 8
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments