शालेय पोषण आहार योजना | शासन निर्णय | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2021, zpps tech guruji
✳️ शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत.
🔰शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
▶️ सांकेतांक क्र- 202111151530003121
▶️ शासन निर्णय दि .15-11-2021
✳️ शासन निर्णय :-👇
केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेत उघडण्यास खालील अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे हे शालेय पोषण आहार योजनेकरिता सिंगल नोडल एजन्सी म्हणून काम पाहतील.
i. कोणतेही अतिरिक्त शुल्क खाजगी बँकेमार्फत आकारण्यात येणार नाही.
ii. T+ १ पेक्षा जास्त कालावधीसाठी बँकेमध्ये निधी पडून राहणार नाही.
iii. बँकेने महिनाभरात झालेल्या व्यवहारांची माहिती दरमहा शालेय शिक्षण व क्रिडा विभाग तसेच वित्त विभागास सादर करावी.
iv. शालेय पोषण आहार योजनेसंबंधित शिक्षण संचालक (प्राथ.). प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधित बँकेशी करारनामा करावा.
V. शालेय पोषण आहार या योजनेचे खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँक खात्याचे विभागाच्या चार्टट अकाऊंट मार्फत ऑडीट करुन शिल्लक रक्कम त्वरीत नवीन बँक खात्यात जमा करावी.
Vi. प्रस्तुत योजनेच्या संदर्भात शासनाने वेळोवळी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे संबंधित बँकेस बंधनकारक राहील.
२. शिक्षण संचालक (प्राथ.), यांनी तात्काळ सिंगल नोडल एजन्सी (SNA) बँक खाते उघडून ते PFMS ला जोडण्याची कार्यवाही करावी. तसेच, याबाबत राज्य शासन व केंद्र शासनास अवगत करावे.
३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.८४/कोषा प्रशा-५, दि. १५ सप्टेंबर, २०२१ अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
४. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२११११५१५३०००३१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
✳️शासन निर्णय पहा.👇
✳️ आपणास हे ही आवडेल 👉अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2021-22 कसा भरावा ?
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती Fresh / Renewal अर्ज कसे करावे.?
✳️ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा झाली का नाही चेक करा.सोप्या पध्दतीने.
आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://youtube.com/c/ZPPSTECH
0 Comments