Jagtik mahila din bhashan marathi 2023
jagtik mahila din bhashan marathi 2023 |
ज्याला स्त्री आई म्हणून कळली,
तो जिजाऊंचा शिवबा झाला..
आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला..
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली
तो राधेचा शाम झाला..
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली
तो सीतेचा राम झाला..
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो तसेच जागतिक महिला दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनीनो...!
आज 8 मार्च, आज आपण येथे सर्व जन जागतिक महिला दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी आणि लेकीची भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या तमाम महिलाना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणार्या राजमाता जिजाऊ. मैं मेरी झांशी कभी नही दुंगी, असे ठनकावून इंग्रजां सोबत संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई तसेच स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलीना शिक्षणाची दारे खुली करून देणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रीयांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते.
8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी रुटगर्स चौकात जमून दहा तास काम व काम करतो तिथे सुरक्षितता या मागण्या साठी ऐतिहासिक निदर्शने केली. याचबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि सर्व प्रौढ स्त्रियांना पुरुषांप्रमाणे मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी केली. अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी केलेल्या ह्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारून साजरा करावा असा ठराव मांडला आणि तो पासही झाला. तेव्हा पासून 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करतात .
8 मार्च महिला दिवस जवळ आला की ह्या दिवशी काय करायचं याच्या तयारीला लागतात. परंतु या दिवसाचा मुख्य हेतू हा महिला सबलीकरण करणे. परंतु तो साध्य होताना दिसतोय का ? आपल्या जवळची कोणती स्त्री सबला झाली आहे का ? हे प्रश्न स्वत:ला विचारा. आहोत का आपण सबला ? थोडा विचार करा एखादा दारु पिणारा नवरा बायकोला आजही रोज मारतो. कारण तिच्या पैशातून त्याला दारु पिऊन मजा करायची असते. पण आपण जातो का तिच्या मदतीला कधी ? नवऱ्यानं सोडून दिलेल्या बायकोला आपल्या समाजात आहे का स्थान ? विधवा झालेल्या स्त्रीला मिळतो का कधी सन्मान ? उलट आपणच तिच्याकडे तिनेच तर मारले नसेल तिच्या नवऱ्याला अश्या नजरेने बघतो. दर वर्षी होणाऱ्या हळदीकुंकूवाला एखाद्या विधवा स्त्रीला बोलवण्याची हिम्मत कोण करते का ? अहो घरात शुभकार्य असलं की अजूनही विधवा स्त्री ला बोलवाव की नाही यावर चर्चा होतात. एखाद्या स्त्रीचा विनयभंग किवा बलात्कार, अँसिड हल्ला झालेल्या मुलीला आपण सन्मान कधी देऊ ?
स्त्रियांच्या बाबतीत समाजाची मानसिकता आजही बदलेली नाही. महिला दिवस साजरा करण्याचा मूळ हेतूच अजून पर्यंत यशस्वी झालेला नाही. उलट ज्या स्त्रियांना हा महिला दिवस साजरा करायचा त्यांनी स्वत:च्या सोयीने त्या दिवसाचा अर्थ काढलाय हे खरच खूप भयंकर आहे.
एखादी स्त्री असून आपण दुसऱ्या स्त्रीच्या भावना कधीच समजू शकत नाही का ? तिच्या अडचणीत त्या स्त्रीला मदत करू शकत नसूतर हा दिवसच का साजरा करायचा ? आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा मौजमजा मस्ती करण्यासाठी असतो अशी जर तुमची समजूत असेल तर का करायचा हा दिवस साजरा ? पुरुषा पेक्षा आणि पुरुषा शिवाय पण महिला समर्थपणे नाहीतर त्याच्यापेक्षा उत्तमरितीनं कुटुंब चालवतात हे मी स्वतः बघितले आहे .
खरच अशा महिलांकडे पाहिलं की मनात वाटतं जागतिक महिला दिनाचं उद्दिष्ट थोडं का होईना साध्य झालं आहे आणि होत आहे .शेवटी एवढेच म्हणेन......
नारी हीच शक्ती आहे नराची…
नारीच हीच शोभा आहे घराची…
माझ्या आयुष्या मधील सर्व महिला स्त्री वर्गाला तसेच माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायेची, सुरक्षिततेची पांघरण घालून माझे हे आयुष्य सुंदर बनवल्या बद्दल शतश: नमन करते........
धन्यवाद माझ्या सर्व महिला भगिनींनो .
जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.
0 Comments